वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९७ पृ. १
  • समुदायांची भर पडत आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समुदायांची भर पडत आहे
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • पुढील प्रगतिसाठी निश्‍चयी हालचाल
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आध्यात्मिक प्रगती करीत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • नवे शिष्य बनवण्यात सर्वांचा सहभाग
    आमची राज्य सेवा—२००७
  • आध्यात्मिकरित्या बलवान व्हा आणि यहोवाच्या सेवेसाठी शुद्ध असा
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ४/९७ पृ. १

समुदायांची भर पडत आहे

१ सध्या ख्रिस्ती मंडळी अनुभवत असलेली वृद्धी, पहिल्या शतकात होती अगदी त्याचप्रमाणे उल्लेखनीय स्वरूपाची आहे. (प्रे. कृत्ये २:४१; ४:४) मागील वर्षी, ३,६६,५७९ इतक्या नवीन शिष्यांचा बाप्तिस्मा झाला, याचाच अर्थ प्रती दिवशी सरासरी १,००० हून अधिक! मागील तीन वर्षांत दहा लाखांपेक्षा अधिकांचा बाप्तिस्मा झाला आहे. निश्‍चितच, सत्य मानणाऱ्‍यांच्या समुदायांत यहोवा भर पाडत आहे.—प्रे. कृत्ये ५:१४.

२ ख्रिस्ती जीवनमानाचा अनुभव नसणाऱ्‍या कित्येक नवोदितांना, विश्‍वासात बळकट असणाऱ्‍यांकडून साहाय्य आणि प्रशिक्षणाची गरज असते. (रोम. १५:१) आरंभीच्या ख्रिश्‍चनांमध्ये असे काही होते जे त्यांच्या बाप्तिस्म्याच्या कित्येक वर्षांनंतरही, “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न” करण्यात मागे पडले होते. (इब्री. ५:१२; ६:२) म्हणूनच, इब्री लोकांस लिहिलेल्या आपल्या पत्रांत, पौलाने अशा क्षेत्रांवर अधिक भर दिला ज्यांत ख्रिश्‍चनांची आध्यात्मिकरित्या वृद्धी होण्यास हवी. ही कोणती क्षेत्रे आहेत आणि आवश्‍यक मदत कशी पुरवली जाऊ शकते बरे?

३ अभ्यासाच्या उत्तम सवयी आत्मसात करणे: पौलाने दिलेल्या सूचनेच्या एकवाक्यतेत, एक उत्तम विद्यार्थी असण्यात, सक्रियपणे शिकणे, पुनरावलोकन करणे व यहोवाच्या संघटनेमार्फत पुरवलेले “जड अन्‍न” ग्रहण करणे समाविष्ट आहे. (इब्री. ५:१३, १४; ऑगस्ट १, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठ २०-२५ पाहा.) सत्यातील नवोदितांना आध्यात्मिक संभाषणात गोवून घेतल्याने तसेच वैयक्‍तिक संशोधनामार्फत तुम्हाला गवसलेल्या सत्याच्या बहुमोल रत्नांची त्यांच्याबरोबर सहभागिता केल्याने अभ्यासाच्या उत्तम सवयी आत्मसात करण्याची चेतना तुम्ही कदाचित त्यांनाही प्रदान करू शकता. कदाचित, तुम्ही अधूनमधून एखाद्या नवोदितास तुमच्या व्यक्‍तिगत अथवा कौटुंबिक अभ्यासासाठी निमंत्रित करू शकता.

४ नियमितपणे सभांना उपस्थित राहणे: तुमचे विश्‍वासार्ह उदाहरण व प्रेमळ उत्तेजनपर शब्द, पौलाने उल्लेखिलेले चिंतेचे दुसरे एक क्षेत्र—ख्रिस्ती सभा चुकवण्याची काहींची ‘चाल’ न अनुसरण्यास मंडळीतील सदस्यांना मदत करतील. (इब्री. १०:२४, २५) सभा, मंडळीप्रत नेणारी आध्यात्मिक प्राणरक्षक दोर असल्याची जाणीव होण्यास त्यांना मदत करा. आपल्या बंधुवर्गाचा एक भाग या नात्याने ते स्वागतार्ह आहेत अशी त्यांना जाणीव करून देण्यास पुढाकार घ्या.

५ खात्रीने यहोवाकडे जाणे: शारीरिक दौर्बल्ये व व्यक्‍तिमत्त्वातील वैगुण्यांवर मात करण्यासाठी आपण प्रार्थनेमार्फत यहोवाकडे जाऊन आपले आंतरिक विचार आणि वैयक्‍तिक चिंता त्याच्याजवळ व्यक्‍त केल्या पाहिजेत. पौलाने आर्जवल्याप्रमाणे नवोदितांनी हे शिकण्यास हवे, की मदतीकरता यहोवाकडे याचना केल्याने ते अडखळणार नाहीत. (इब्री. ४:१५, १६; १०:२२) यासंबंधी तुमचे व्यक्‍तिगत अनुभव कथित केल्याने, एखाद्या नवोदिताची आणखी खात्री होईल, की मनापासून केलेल्या प्रार्थना यहोवा ऐकतो.

६ सेवेकरता वेळ नियोजित करणे: पौलाने हे देखील दाखवून दिले, की आपण ‘स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पण करतो’ तेव्हा आध्यात्मिकरित्या ते बळकटी आणणारे ठरते. (इब्री. १३:१५) क्षेत्र सेवेच्या तुमच्या साप्ताहिक योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही एखाद्या नवीन प्रचारकास आमंत्रित करू शकता का? कदाचित, तुम्ही दोघे तुमच्या स्वतःच्या प्रस्तुती तयार करू शकता अथवा नवोदिताने अद्याप अनुभवला नसेल अशा एखाद्या सेवेच्या प्रकाराचा तुम्ही विचार करू शकता.

७ समुदायांची भर, हेच हर्षाचे एक मूळ कारण आहे. मंडळीच्या नवीन सदस्यांना प्रशिक्षण देण्यात व बोध करण्यास स्वतःस वेचल्याने ‘त्यांच्या जिवांच्या तारणासाठी’ आवश्‍यक तो बळकट विश्‍वास विकसित करण्यास त्यांना मदत मिळेल.—इब्री. ३:१२, १३; १०:३९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा