सकारात्मक मनोवृत्ती राखून सुवार्ता प्रस्तुत करणे
१ आपणा सर्वांना आपण जे काही करतो त्यात, विशेषतः शिष्य बनवण्याच्या कार्यात आनंद व साध्यता मिळवण्यास आवडते. अशा प्रकारचे समाधान आपल्याला कशामुळे लाभते? इतरांना मदत करण्याच्या यथायोग्य कार्यात व्यग्र राहताना सकारात्मक मनोवृत्ती राखण्याने त्याची सुरवात होते. (नीति. ११:२५) सुवार्ता प्रस्तुत करण्याच्या आपल्या पद्धतीने हे दाखवण्यास हवे की आपण सांगत असलेल्या गोष्टींवर आपला खरोखर विश्वास आहे. आपण अगदी मनापासून बोलत असलो, तर आपली प्रामाणिकता व व्यक्तिगत खात्री त्यातून झळकेल. (लूक ६:४५) आपल्या प्रस्तुतीचा सराव केल्याने, क्षेत्रातील लोकांशी बोलताना आपल्याला आणखी आत्मविश्वास जाणवेल. हे, सप्टेंबर दरम्यान आपण तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करू तेव्हा विशेष मूल्याचे असेल. सकारात्मक मनोवृत्तीसह सुवार्ता प्रस्तुत करण्यामध्ये खालील सूचना मदतदायी आहेत असे तुम्हाला आढळून येईल.
२ “कौटुंबिक” पुस्तक सादर करताना प्रथम भेटीत तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “आपल्या शेजाऱ्यांशी बोलत असताना आम्हाला असं दिसून आलंय की पुष्कळ लोक त्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त आहेत. त्यांच्या सभोवताली असणाऱ्या व्यक्ती जे अनिष्ट गुण प्रदर्शित करतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर परिणाम होतोय एवढंच नव्हे तर हानी सुद्धा पोहंचत आहे असं त्यांना आढळतं. अनेक लोक अशा मनोवृत्ती प्रदर्शित करतात हे तुम्ही निरीक्षिलंय का? [२ तीमथ्य ३:२, ३ वाचा व प्रतिसादासाठी वाव द्या] अनेक लोक असे असतील हे बायबल दाखवत असलं, तरी आपण आपल्या सभोवताली समस्या असतानाही मजबूत व आनंदी कुटुंब कसं उभारू शकतो याविषयी ते व्यावहारिक सल्ला देखील देतं.” कौटुंबिक पुस्तकाच्या पृष्ठ १८२ वर सुरू होणाऱ्या ५ व ६ परिच्छेदांमधून निवडक वाक्ये वाचा व हे दाखवून द्या की योग्य सूचनांकरवी आपण अनंतकालचे भवितव्य असणारे कुटुंब उभारू शकतो. ते पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर करा.
३ तुम्ही ज्यांच्यासोबत कुटुंबाच्या भवितव्याची चर्चा केली त्यांना भेट देण्याकरता परतल्यावर तुम्हाला असे म्हणावेसे वाटेल:
◼ “माझ्या मागील भेटीत, सभोवतालच्या समस्यांना तोंड देऊ शकणारं दृढ कुटुंब कसं उभारू शकतो याविषयी आपण बोललो होतो. चांगलं दळणवळण असण्याची खात्री करणं हा दृढ कुटुंब उभारण्याचा एक मार्ग आहे. दळणवळणाला कुटुंबातील जीवनदायी रक्त असं संबोधण्यात आलंय. याबाबतीत बायबलचा सल्ला पाहा.” नीतिसूत्रे १८:१३ आणि २०:५ एकतर थेट बायबलमधून अथवा कौटुंबिक पुस्तकाच्या पृष्ठ ३४ वरून वाचा. हे पुस्तक बायबलमध्ये सापडणाऱ्या, विशिष्ट काळापुरतेच मर्यादित नसलेल्या बुद्धीचा व्यावहारिक अवलंब करते हे सांगा. प्रत्येक पानाच्या शेवटी असणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधवा आणि हे पुस्तक कसे अभ्यासले जाऊ शकते ते दाखवा. पुढील भेटीकरता वेळ ठरवा.
४ “अनंतकाल जगू शकाल” पुस्तक सादर करताना तुम्ही ही प्रस्तुती उपयोगात आणून पाहू शकता:
◼ “शेजारच्या लोकांशी बोलताना मी असं निरीक्षण केलंय की अनेकांना सुरक्षित समाज आणि शांतीमय जगाची उत्कट इच्छा आहे. अशा परिस्थिती साध्य करण्यात मानव अपयशी का ठरलाय याबद्दल तुमचं काय मत आहे? [प्रतिसादासाठी वाव द्या.] काही नेते प्रामाणिक असतील आणि थोडंफार चांगलं काम करत असतील पण बायबल सुज्ञपणानं काय सल्ला देतं हे पाहा.” स्तोत्र १४६:३, ४ वाचा; मग विचारा: “मानवाच्या गरजा भागवणारं कोणी आहे का?” ५ आणि ६ वचने वाचा. अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या १५६ ते १६२ पृष्ठांवरील चित्रे दाखवा आणि देवाच्या शासनाच्या लाभांकडे लक्ष वेधवा. पुस्तक सादर करा.
५ देवाच्या शासनाविषयी आधी चर्चा केली असल्यास, पुनर्भेटीच्या वेळी तुम्ही ही सूचना उपयोगात आणू शकता:
◼ “काही दिवसांआधी मी इथं आलो होतो तेव्हा, पृथ्वीवर खरी शांती आणण्यात मानव का अपेशी ठरला त्याबद्दल आपण चर्चा केली होती. अशा अपयशासाठी बायबल काय कारण देतं ते आपण शोधलं होतं हे तर तुम्हाला आठवत असेल. [स्तोत्र १४६:३ पुन्हा एकदा वाचा.] आपण मानवांवर आपल्या आशा आधारू नयेत असा सल्ला देव आपल्याला का देतो हे तुम्ही निरीक्षिलं का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] कदाचित तुम्ही याजशी सहमत असाल की कायमस्वरूपी उपायाची कोणतीही आशा ही देवाकडूनच आली पाहिजे. आपण अशी खात्री का बाळगू शकतो याचं कारण स्तोत्र १४६:१० इथं स्पष्ट केलंय. [वाचा.] आपल्याला देवाच्या राज्याची प्रजा व्हायचंय तर आपण काय केलं पाहिजे?” अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ २५० काढा, परिच्छेद २ वाचा आणि इब्री लोकांस ११:६ ठळकपणे मांडा. बायबलच्या अभ्यासाद्वारे लाखो जणांनी सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान कसे प्राप्त केले आहे हे प्रदर्शित करण्याविषयी सांगा. पुन्हा भेट घेण्याची योजना करा.
६ दुकाना-दुकानातले कार्य करताना तुम्ही “कौटुंबिक” पुस्तकाचा उपयोग करून हा संक्षिप्त प्रस्ताव वापरू शकता:
◼ “आज आम्ही समाजातील व्यापाऱ्यांसाठी एक खास सेवा सादर करत आहोत. आपल्या क्षेत्रात, घटस्फोट आणि बालअपराधाची वाढ पाहून सर्वांना चिंता वाटेतय. या चालीरितींना यशस्वीरित्या लढा देण्याचा एखादा मार्ग आहे असं तुम्हाला वाटतं का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] उपाय जरूर आहेत.” कौटुंबिक पुस्तकातील विषयसूची काढा आणि काही अध्यायांची शीर्षके वाचून दाखवा. या पुस्तकातील सल्ला मानवी तत्त्वज्ञानावर नव्हे तर एका उच्च उगमाकडून अर्थात मानवजातीच्या निर्माणकर्त्याकडून पुरवलेल्या उपायांवर आधारलेला आहे हे स्पष्ट करा. पुस्तक सादर करा.
७ तुम्ही “कौटुंबिक” पुस्तक दिलेल्या व्यापारी व्यक्तीला पुनर्भेट देताना असे म्हणू शकता:
◼ “माझ्या मागील भेटीत, मी हे सांगितलं होतं की कुटुंबात मस्तकपदाला अधीनता, दळणवळण, प्रशिक्षण आणि शिस्त या बाबींवरील देवाचा सल्ला अनुसरून अनेक कौटुंबिक समस्यांवर मात केली जाऊ शकते.” पृष्ठ ५ वरील पहिला परिच्छेद काढा आणि सुखी कुटुंबाचे काही लाभ कोणते आहेत ते वाचून दाखवा. या पुस्तकाचा अभ्यास केल्याने पुष्कळ कुटुंबे आनंदी बनली आहेत हे सांगा आणि पुस्तकाचा अभ्यास करण्याच्या आपल्या पद्धतीविषयी स्पष्टीकरण द्या. त्यांच्या व्यापाराच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी नियमितपणे भेट देऊन या पुस्तकातून मोफत अभ्यास चालवण्याविषयी सांगा.
८ “देवाचे सहकारी” या नात्याने, सुवार्ता प्रस्तुत करताना सकारात्मक असण्याकरता आपल्याजवळ कारण आहे. (१ करिंथ. ३:९) घरमालकाच्या गरजांनुसार विविध प्रस्तुती व प्रकाशने उपयोगात आणण्याविषयी आपण सकारात्मक असू या. अशी मनोवृत्ती राखल्याने आपल्याला यहोवाचा समृद्ध आशीर्वाद प्राप्त होईल.