वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९६ पृ. १
  • वेळेचा सदुपयोग कसा करावा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वेळेचा सदुपयोग कसा करावा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • वाचन व अभ्यासाकरता वेळ काढणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • आपण आपल्या वेळेचा कसा उपयोग करतो त्यावर कडक नजर ठेवा
    आमची राज्य सेवा—२००४
  • वेळेचा सदुपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • यहोवाची सेवा जीवनात केंद्रस्थानी ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km १०/९६ पृ. १

वेळेचा सदुपयोग कसा करावा

१ यहोवाच्या सेवेत अधिकाधिक करण्यात तत्पर असल्यामुळे आपण सहसा कार्यव्यग्र असतो! (१ करिंथ. १५:५८) वैयक्‍तिकपणे व कुटुंब या नात्याने अभ्यास करणे, दररोज बायबल वाचणे, मंडळीच्या सभांची तयारी करून त्यांस उपस्थित राहणे तसेच क्षेत्र सेवेत नियमितपणे सहभाग घेणे अत्यावश्‍यक आहे हे आपण जाणतो. पर्यवेक्षकांना मेंढपाळकत्वाच्या जबाबदाऱ्‍या असतात व ते मंडळीची इतर कर्तव्ये देखील पार पाडतात. काहींना महत्त्वाच्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍या असतात किंवा ते विविध गोष्टींसाठी इतरांचे बांधील असतात. ही सर्व कार्ये पूर्णपणे पार पाडण्यासाठी, संतुलन व उत्तम वैयक्‍तिक सुव्यवस्था प्रत्येकालाच आवश्‍यक असते.

२ प्राथमिकता ठरवा: ‘आपल्या वेळेचा सदुपयोग’ यशस्वीपणे करणे हे आपल्या समजबुद्धीवर व सुज्ञपणावर अवलंबून असते. (इफिस. ५:१५, १६) कोणत्या गोष्टी “श्रेष्ठ” आहेत हे ठरवून आपण त्यांना आपल्या प्राथमिकतांच्या यादीत वरचे स्थान द्यावे. (फिलिप्पै. १:१०) एका जोडप्याने त्यांच्या ईश्‍वरशासित कुटुंबाबद्दल असे म्हटले: “आम्ही सत्याने जणू आमचं जीवन भरून टाकतो . . . सत्य आमच्या जीवनाचा एक भाग नव्हे तर, तेच आमचं जीवन आहे. ते इतर सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी आहे.” जीवनात यहोवाच्या उपासनेला व सेवेला सर्वप्रथम स्थान देणे अगत्याचे आहे.

३ वेळखाऊ गोष्टी ओळखा: प्रत्येक आठवड्यात १६८ तास असतात व उपलब्ध असलेल्या वेळेचा आपण सुज्ञपणे उपयोग करण्यास हवा. ईश्‍वरशासित कार्यहालचालींसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून आपण वेळखाऊ गोष्टी ओळखून त्यांवर बंधन घालणे आवश्‍यक आहे. एका सर्वेक्षणातून दिसून आले की संयुक्‍त संस्थानांतील सर्वसाधारण प्रौढ व्यक्‍ती दर आठवडी टी. व्ही. पाहण्यात ३० पेक्षा अधिक तास घालवते! इतरांच्या बाबतीत पाहू जाता, त्यांचा पुष्कळसा वेळ जगिक साहित्य वाचण्यात खर्च होतो. आणखी काहींना दिसून येईल की सामाजिक कार्ये, छंद, मनोरंजन किंवा संगणकासंबंधी विशिष्ट कामांसाठी ते अत्याधिक वेळ देत आहेत. आपल्या वेळेचा अधिक चांगला उपयोग कशाप्रकारे करता येईल हे ठरवण्यासाठी आपल्याला कदाचित आपला नित्यक्रम बारकाईने पडताळून पाहावा लागेल. सुज्ञपणाच्या अनुषंगाने, अनावश्‍यक कार्यांसाठी आपण किती वेळ देतो यावर मर्यादा घालणे अनिवार्य आहे.

४ उत्तम नित्यक्रम विकसित करा: आपल्या वैयक्‍तिक परिस्थिती काहीही असल्या तरीसुद्धा, आपल्यापैकी प्रत्येकजण आध्यात्मिक कार्यांसाठी वेळेचा सदुपयोग करू शकतो. काहींना असे आढळले आहे की दररोज नेहमीपेक्षा लवकर कार्य सुरू केल्यास त्यांना अधिक साध्य करणे शक्य होते. कार्यस्थळी ये-जा करण्यासाठी किंवा कोणाची वाट पाहण्यात आपला बराचसा वेळ जात असल्यास, आपण त्या वेळेतील काही वेळ बायबल वाचन करण्यासाठी, सभांची तयारी करण्यासाठी किंवा संस्थेने ऑडियो कॅसेटवर पुरवलेले साहित्य ऐकण्यासाठी उपयोगात आणू शकतो. एकत्र बसून अभ्यास करण्यासाठी नियमित व निश्‍चित वेळ राखून ठेवल्याने कुटुंबांना अत्याधिक लाभ प्राप्त होतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्य कौटुंबिक अभ्यासासाठी वेळेवर आला तर सर्वांचाच वेळ वाचतो.

५ मावळणाऱ्‍या प्रत्येक दिवसागणिक, “काळाचा सक्षेप करण्यात आला आहे,” याची आपल्याला आणखी प्रकर्षाने जाणीव होण्यास हवी. (१ करिंथ. ७:२९) आपल्या हाती शिल्लक असलेल्या मोलवान वेळेचा आपण कशाप्रकारे उपयोग करतो, यावर आपले जीवन अवलंबून आहे. राज्य आस्थांना आपल्या जीवनात सर्वप्रथम स्थानी ठेवता येईल अशाप्रकारे वेळेचा सदुपयोग केल्यास, आपण उदंड आशीर्वादांचे मानकरी होऊ!—मत्त. ६:३३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा