राज्याची घोषणा करा
१ इब्री लोकांस १०:२३ येथे आपल्याला ‘आपल्या आशेचा पत्कर दृढ धरण्यास’ आर्जवले गेले आहे. आपली आशी ही देवाच्या राज्यावर केंद्रित आहे. येशूने असे स्पष्टपणे आज्ञापिले की राज्याची सुवार्ता सर्व राष्ट्रांत गाजविली पाहिजे. (मार्क १३:१०) सेवेत सामील होताना ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे.
२ आपण लोकांना भेटतो, तेव्हा त्यांना आवडेल अशा अथवा त्यांना चिंताग्रस्त करणाऱ्या विषयाचे संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न आपण करतो. बहुधा, ते जाणून असलेल्या गोष्टींबद्दल जसे की, शेजारच्या परिसरातील गुन्हेगारी, तरुण लोकांच्या समस्या, उदरनिर्वाह करण्यासंबंधाने असणाऱ्या चिंता किंवा जागतिक कारभारांतील संकटप्रसंग अशांचा उल्लेख आपण करतो. बहुतांश लोकांची मने या ‘संसाराच्या चिंतांवर’ एकवटली असल्यामुळे आपल्याला काळजी वाटते व आपण समजून घेण्याची वृत्ती प्रदर्शित करतो तेव्हा सहसा लोक आपल्या मनातील गोष्टी सांगतील. (लूक २१:३४) याद्वारे आपल्या आशेबद्दल इतरांना सांगण्याचा मार्ग कदाचित मोकळा होईल.
३ पण आपण बेसावध असल्यास, आपले संभाषण नकारात्मक गोष्टींभोवती इतपत फिरत राहील की शेवटी आपल्या भेटीचा उद्देश पूर्ण करण्यास, अर्थात राज्य संदेशाचा प्रचार करण्यास आपण अपेशी ठरू. विपत्ती आणणाऱ्या वाईट परिस्थितींकडे आपण लक्ष वेधत असलो, तरी जे राज्य सरतेशेवटी मानवजातीच्या सर्व समस्यांचे निरसन करील त्याकडे लक्ष आकर्षित करणे हे आपले ध्येय आहे. आपल्याजवळ खरोखरच एक अद्भुत आशा आहे जिच्याकडे लोकांनी कान द्यावा हे अगत्याचे आहे. तेव्हा, सुरवातीला आपण ‘कठीण दिवसांच्या’ एखाद्या पैलूविषयी चर्चा करू लागलो, तरी आपण आपल्या मुख्य संदेशाकडे म्हणजेच ‘सार्वकालिक सुवार्तेकडे’ लगेचच लक्ष वेधले पाहिजे. अशा तऱ्हेने आपण आपली सेवा चोखपणे पूर्ण करू.—२ तीम. ३:१; ४:५; प्रकटी. १४:६.