आमच्या घडवणाऱ्याला सन्मान देण्यासाठी इतरांना मदत करणे
१ स्तोत्रकर्त्याने म्हटले, “हे परमेश्वरा [यहोवा, NW] . . . जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे,” असेच आम्हालाही वाटते का? (स्तोत्र. ३६:५, ९) यहोवाबद्दल गुणग्राहकता बाळगण्यास व सन्मान देण्यास आम्हीसुद्धा इतरांची मदत कशी करू शकतो? जून दरम्यान सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक सादर करून. ही पुस्तके खरोखरच उल्लेखनीय आहेत. यातील एक पुस्तक, देव आणि ख्रिस्त यांनी आपल्यासाठी जे केले आहे त्याबद्दल, त्यांच्यावर आधीच विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींची गुणग्राहकता वाढवते. तर दुसरे, देवाच्या अस्तित्वाचा भक्कम पुरावा पुरवते आणि उत्क्रांती ही खरी का असू शकत नाही हे स्पष्टपणे दाखवून देते. अशाप्रकारे, ही दोन्ही पुस्तके, पवित्र शास्त्रावर ते देवाचे वचन आहे असा विश्वास वाढवतात. निश्चितच देव, येशूच्या जीवन व सेवाकार्याद्वारे प्रकट झाला. तसेच, यहोवा देवाचा सन्मान, उत्क्रांतीने नव्हे तर निर्मितीने कशाप्रकारे घडतो हे सर्वांनी जाणावे अशी आमची इच्छा आहे.
२ येथे, सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाची एक साधी व सरळ सादरता आहे.
घरमालकाला अभिवादन केल्यावर तुम्ही विचारू शकता:
▪“तुम्ही, पुष्कळ लोकांप्रमाणे, येशू ख्रिस्त एक ऐतिहासिक व्यक्ती व चांगला मनुष्य होता असा विश्वास करता का? असे आहे तर, तुम्हाला त्याच्या जीवनाविषयी व शिकवणींविषयी अधिक शिकण्यास आवडेल का? पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे येशूने जे शिकवले व केले, यांना हे पुस्तक एका स्पष्ट समजण्याजोग्या पद्धतीत मांडते. आम्ही लोकांना ते ४०.०० रुपयांच्या किंमतीत देत आहोत.”
३ किंवा स्वतःचा परिचय केल्यावर, तुम्ही म्हणू शकता:
▪“येशू ख्रिस्ताने जे शिकवले त्याबद्दल तुम्हाला कदाचित काही कल्पना असेल. परंतु, आम्ही येशूच्या जीवन व सेवाकार्याकडे उत्सुकतेने पाहावे असे पवित्र शास्त्र म्हणते हे तुम्हाला माहीत होते का? [इब्रीयांस १२:२ वाचा.] हे यासाठी कारण येशूनेच स्वतः म्हटले की, तोच केवळ पित्याकडे जाण्याचा मार्ग आहे. शिवाय, त्याचे व त्याच्या पित्याचे अचूक ज्ञान घेतल्यावरच एखाद्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकते. [योहान १४:६ किंवा १७:३ दाखवा.] हे पुस्तक तुम्हाला असे जीवन-प्रदायक ज्ञान प्राप्त करण्यास मदत करील.”
४ “निर्मिती” पुस्तक सादर करताना, तुम्ही म्हणू शकता:
▪“आपले पहिले पूर्वज कसे दिसत होते असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] ते ह्या ‘आदि मानवासारखे’ दिसत होते का? [निर्मिती पुस्तकातील पृष्ठ ८३ काढा.] पवित्र शास्त्र प्रेषितांची कृत्ये १७:२६ मध्ये काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. [वाचा.] तर मग, ‘आदि मानवाची’ चित्रे कशावर आधारित आहेत?” पृष्ठ ८९ वरील चित्राखालील मथळ्याकडे लक्ष वेधवा. घरमालकाला या पुस्तकाचे वाचन केल्यावर आणि या प्रश्नाचे उत्तर कळाल्यावर लाभ मिळू शकतो हे त्याला सांगा.
५ दुसऱ्या एका प्रस्तावात, “निर्मिती” पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे दर्शवून असे म्हटले जाऊ शकते:
▪“मनुष्याची उत्क्रांती झाली की त्याला निर्माण केले, हा प्रश्न आज आम्ही आमच्या शेजाऱ्यांना विचारत आहोत. तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] पुष्कळ उच्च शिक्षित लोक उत्क्रांतीचा वास्तविक गोष्ट या नात्याने स्वीकार करत असले तरी, इतर उच्च शिक्षित लोक तसा विश्वास बाळगत नाहीत. पूर्वी अंतराळवीर असणाऱ्या एकाने काय निष्कर्ष काढला याकडे लक्ष द्या. [पृष्ठ १२२-३ वरील मुद्यांना ठळकपणे मांडा.] उत्क्रांतीवर की निर्मितीवर विश्वास ठेवावा हे पाहण्यासाठी आम्ही व्यक्तिगतपणे या पुराव्याचे परीक्षण केले पाहिजे.” घरमालकाने पुस्तक स्वीकारल्यास, तुमच्या पुढील भेटीमध्ये उत्तर देता येईल असा एखादा प्रश्न उपस्थित करा.
६ इतरांनी, आपला निर्माणकर्ता व त्याच्या निर्मितीबद्दलच्या प्रेमळ उद्देशाचे अद्भुत सत्य शिकावे म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही उत्कंठित आहात का? सर्वश्रेष्ठ मनुष्य व निर्मिती, ही पुस्तके तुम्हाला तसे करण्यास मदत करतील. ते आमचा महान निर्माणकर्ता, सार्वभौम प्रभू यहोवाच्या, कार्यांची खूप स्तुती करून व त्याच्या नावाच्या पवित्रीकरणाच्या व ख्रिस्ताच्या राज्याद्वारे मानवजातीला आशीर्वादित करण्याच्या आश्चर्यकारक उद्देशाची घोषणा करून त्याचा सन्मान करतात.