आपला प्राकाश सतत प्राकाशू देणे
१ प्राकाश काय आहे? “ज्याने काही पाहणे शक्य होते असे काही तरी” अशी व्याख्या शब्दकोश करतो. परंतु खरे म्हणजे, प्रागत तंत्रज्ञान असूनही, ईयोब ३८:२४ मध्ये नमूद केल्याप्रामाणे यहोवाने मांडलेल्या प्राश्नाचे उत्तर मानवाला अद्यापही पूर्णपणे माहीत नाही. आपण प्राकाशाविना राहू शकतो का? प्राकाशाविना आपण अस्तित्वात राहू शकलो नसतो. प्राकाश आपल्या शारीरिक दृष्टीसाठी आवश्यक आहे आणि बायबल म्हणते, की आध्यात्मिक अर्थी “देव प्राकाश आहे.” (१ योहान १:५) आपल्याला जो ‘प्राकाश देतो’ त्याच्यावर आपण पूर्णपणे विसंबून आहोत.—स्तोत्र ११८:२७.
२ हे शारीरिक बाबतीत खरे आहे, पण आध्यात्मिक बाबतीत ते अधिक सत्य आहे. खोट्या धर्माने लोकांची दिशाभूल केली आहे, त्यांना ‘अंधळ्यासारखे भिंत चाचपण्यास’ आध्यात्मिक अंधकारात सोडून दिले आहे. (यश. ५९:९, १०) यहोवा आपली सर्वोत्कृष्ट प्रीती व दया यांनी प्रावृत्त होऊन ‘आपला प्राकाश व आपले सत्य प्रागट करतो.’ (स्तोत्र ४३:३) ‘अंधकारातून अद्भुत प्राकाशात पाचारण करणाऱ्या’ अक्षरशः लाखो प्राशंसात्मक जणांनी प्रातिसाद दिला आहे.—१ पेत्र २:९.
३ हा प्राकाश जगात आणण्यामध्ये येशू ख्रिस्त एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. तो म्हणाला: “जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्राकाश असा आलो आहे.” (योहान १२:४६) त्याचा सर्व वेळ, त्याची शक्ती आणि साधने सत्याचा प्राकाश माहीत करून देण्यावर केंद्रित करण्यात आली होती. त्याने त्याच्या मातृभूमीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अक्षरशः प्रात्येक शहरात आणि गावात प्राचार व शिकवण्यासाठी प्रावास केला. त्याने चोहोकडून अविरत छळ सहन केला, पण सत्याचा प्राकाश फैलावण्याच्या त्याच्या कामगिरीत तो दृढ राहिला.
४ येशूने एक विशिष्ट ध्येय मनात राखून शिष्यांची निवड करण्यावर, त्यांना प्राशिक्षण देण्यावर व संघटित करण्यावर लक्ष केंद्रित केले. मत्तय ५:१४-१६ मध्ये त्याने त्यांना दिलेल्या सूचना आपण वाचतो: “तुम्ही जगाचा प्राकाश आहा . . . तुमचा प्राकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” येशूप्रामाणेच, सत्याचा प्राकाश सर्वत्र फैलावण्याकरता त्यांना ‘जगामध्ये ज्योतीसारखे’ व्हावयाचे होते. (फिलिप्पै. २:१५) त्यांनी ती जबाबदारी त्यांच्या जीवनातील मुख्य उद्देश समजून आनंदाने स्वीकारली. थोड्या काळानंतर, पौल म्हणू शकला की, सुवार्तेची “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत . . . घोषणा झाली” होती. (कलस्सै. १:२३) ते महान कार्य साध्य करण्यामध्ये संपूर्ण ख्रिस्ती मंडळी एकवटलेली होती.
५ आपण “अंधकाराची कामे टाकून” दिलेल्यांपैकी झालो आहोत याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. (रोम. १३:१२, १३) येशूने आणि गतकाळातील विश्वासू ख्रिश्चनांनी मांडलेले उदाहरण अनुसरून आपण आपली गुणग्राहकता दाखवू शकतो. इतरांनी सत्य ऐकावे हे अत्यंत निकडीचे आणि मानवी इतिहासातील कोणत्याही काळापेक्षा आता अधिक महत्त्वपूर्ण आहे. या कार्याची निकड आणि त्याच्या दूरगामी फायद्यांच्याबाबतीत त्याच्याशी इतर कोणत्याही कार्यहालचालीची तुलना होऊ शकत नाही.
६ आपण ज्योतीसारखे कसे चमकू शकतो? राज्य प्राचार कार्यात भाग घेतल्याने आपला प्राकाश चमकू देण्याचा तो एक प्रामुख मार्ग आहे. प्रात्येक मंडळीत नेमलेल्या क्षेत्रात प्राचार करण्यासाठी नियमित, संघटित व्यवस्था आहेत. मोठ्या प्रामाणात साहित्य, विविधतेत आणि अनेक भाषांमध्ये उपलब्ध केले जाते. सभांद्वारे विस्तृत शिक्षण पुरवले जाते आणि अनुभवी असलेले लोक इतरांना व्यक्तिगतरित्या प्राशिक्षण देण्यासाठी साहाय्य करतात. सहभाग घेण्याची संधी पुरुष, स्त्रिया, वृद्धजन आणि मुलांना देखील आहे. मंडळीतील प्रात्येक व्यक्तीला तिच्या क्षमता किंवा परिस्थिती अनुमती देतात तितका सहभाग घेण्यास आमंत्रण दिले जाते. मंडळीतील सर्व कार्यहालचाली प्राचारावर केंद्रित आहेत व प्रात्येक सदस्याने कोणत्या ना कोणत्या प्राकारे भाग घेण्यासाठी मदत करणाऱ्या तरतुदी आहेत. मंडळीशी नियमित, जवळचा सहवास राखणे हा आपला प्राकाश चकाकत राहण्याची खात्री करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.
७ मुखाने साक्ष देण्याचे समाविष्ट नसेल अशा प्राकारांनी आपण प्राकाशू शकतो. केवळ आपल्या वर्तणुकीद्वारे आपण इतरांचे लक्ष आकर्षित करू शकतो. “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की . . . त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे,” असे पेत्राने आर्जवले तेव्हा त्याच्या मनात हेच होते. (१ पेत्र २:१२) अनेकजण एखाद्या कामाविषयी किंवा संघटनेविषयी त्यांचे मत, त्याजशी सहवास असणाऱ्यांच्या वर्तनावरून व्यक्त करतात. जेव्हा निरीक्षक नैतिकरित्या शुद्ध, प्रामाणिक, शांतीमय व कायद्याचे पालन करणाऱ्या लोकांना पाहतात तेव्हा, ते अशा लोकांना वेगळे समजतात व बहुतांश जण अनुसरत असलेल्या दर्जांपेक्षा असे लोक उच्च पातळीच्या दर्जांनुरूप जगतात असा निष्कर्ष काढतात. म्हणून, एखादा पती आपल्या पत्नीला प्रोमळपणाने सन्मान देतो किंवा काळजी घेतो तेव्हा तो आपला प्राकाश प्राकाशू देत असतो; पत्नी देखील आपल्या पतीच्या मस्तक पदाला आदर देऊन तेच करते. मुले आपल्या पालकांच्या आज्ञेत राहतात, लैंगिक अनैतिकता आणि मादक औषधांचा उपयोग टाळतात तेव्हा ते वेगळे दिसतात. जो कर्मचारी आपल्या कामाबद्दल जाणीवपूर्वक, प्रामाणिक आणि इतरांविषयी विचारशील आहे त्यास खूप मौल्यवान समजले जाते. हे ख्रिस्ती गुण प्रादर्शित केल्याने आपण आपला प्राकाश प्राकाशू देत आहोत व इतरांना आपल्या जीवनशैलीचे अनुकरण करण्याची शिफारस करत आहोत.
८ आपण देवाच्या वचनातून जे शिकतो त्याविषयी इतरांशी बोलणे यास प्राचार म्हणतात. ते जाहीर व्यासपीठावरून किंवा दारोदारी केले जाते, परंतु ते मुळीच अशा प्रासंगांपुरते मर्यादित नाही. आपल्या दररोजच्या कार्यहालचालींमुळे आपण हजारो लोकांच्या संपर्कात येतो. तुमच्या शेजाऱ्यांशी तुम्ही दिवसातून किती वेळा बोलता? तुमच्या घराचे दार किती वेळा ठोठावले जाते? खरेदी करताना, बसमध्ये प्रावास करताना किंवा तुमच्या ऐहिक कामाच्या ठिकाणी काम करताना किती विविध प्राकारचे लोक तुमच्या संपर्कात येतात? तुम्ही शाळेत जाणारी तरुण व्यक्ती असल्यास, प्रात्येक दिवशी किती व्यक्तींशी बोलता त्यांची संख्या तुम्ही मोजू शकता का? इतरांशी बोलण्याची संधी प्रात्यक्षात अमर्यादित आहेत. तुम्हाला केवळ काही शास्त्रवचनीय विचार मनात ठेवणे, एक बायबल आणि काही पत्रिका तुमच्या जवळ बाळगणे व संधी मिळेल त्यावेळी बोलण्यास पुढाकार घेणे एवढेच करण्याची गरज आहे.
९ अनौपचारिक साक्ष देणे साधे असले तरी देखील काहीजणांना प्रायत्न करण्यास संकोच वाटतो. ते अबोल असतील, ते अनोळखी व्यक्तींशी बोलण्यास फार बुजरे किंवा अतिशय अस्वस्थ आहेत असे सांगत राहतील. कदाचित, स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्याचे किंवा कठोर प्रातिसाद मिळण्याचे भय त्यांना वाटेल. अनौपचारिक साक्षकार्यात जे अनुभवी आहेत ते, चिंता करण्याचे बहुधा काही कारण नाही असे तुम्हाला सांगू शकतात. इतरजण मूलतः आपल्यासारखेच असतात; त्यांच्या अशाच गरजा असतात, अशाच चिंता असतात व त्यांना स्वतःकरता आणि त्यांच्या कुटुंबांकरता अशाच गोष्टी हव्या असतात. अधिकांश लोक आनंदी स्मित किंवा एखाद्या मैत्रिपूर्ण अभिवादनाला चांगल्यारितीने प्रातिसाद देतील. सुरवात करण्यासाठी, तुम्हाला ‘धैर्यवान व्हावे लागेल.’ (१ थेस्स. २:२) पण तुम्ही एकदाची सुरवात केल्यावर, तुम्हाला परिणाम पाहून आश्चर्य वाटेल आणि आनंद होईल.
१० आपण आपला प्राकाश प्राकाशू देतो तेव्हा आशीर्वादित होतो: अनौपचारिक साक्षकार्यातून परिणीत झालेल्या काही तजेलादायक अनुभवांची येथे उदाहरणे आहेत: एक ५५ वर्षीय स्त्री, रस्ता ओलांडण्याचा प्रायत्न करीत होती. एक कार तिला धडक देणार इतक्यात, एका बहिणीने तिचा हात धरून तिला सुरक्षित स्थानी खेचले व म्हटले: “जरा सांभाळून. आपण धोक्याच्या काळात जगत आहोत!” त्यानंतर हा काळ इतका धोकादायक का आहे याचे स्पष्टीकरण तिने दिले. त्या स्त्रीने विचारले, “तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात का?” त्या स्त्रीला तिच्या बहिणीकडून आपले एक पुस्तक मिळाले होते व तिला एखाद्या यहोवाच्या साक्षादाराशी भेट घ्यावयाची होती आणि या प्रासंगाने ते शक्य झाले.
११ एका बहिणीने डॉक्टरच्या दफ्तरातील प्रातिक्षालयात असलेल्या एका स्त्रीशी संभाषण सुरू केले. त्या स्त्रीने लक्षपूर्वक ऐकले आणि मग म्हटले: “काही काळापासून मी यहोवाच्या साक्षीदारांना भेटत होते; पण भवितव्यात मी स्वतः एक यहोवाची साक्षीदार बनले तर तुम्ही मला जे सांगितले त्याचा हा परिणाम असेल. तुमचे ऐकणे हे अंधारात प्राकाश पाहू लागण्यासारखे आहे.”
१२ चांगुलपणाचे एक कृत्य, इतरांना सत्य शिकवण्यात मदत करण्याचे एक पाऊल असू शकते. क्षेत्र सेवेतून घरी चालत येत असताना, दोन बहिणींनी एका आजारी वृद्ध स्त्रीला बसमधून उतरताना पाहिले. त्यांनी थांबून त्या स्त्रीला मदत हवी का असे विचारले. पूर्णपणे अनोळखी असणाऱ्यांनी तिच्याबद्दल इतकी आस्था दाखवल्याचे पाहून त्या स्त्रीला इतके आश्चर्य वाटले, की अशा चांगुलपणाचे कृत्य करण्यास ते कशामुळे प्रावृत्त झाले हे जाणण्याचा आग्रह तिने धरला. यामुळे साक्ष देण्याची संधी प्राप्त झाली. त्या स्त्रीने लागलीच तिचा पत्ता दिला आणि तिला भेट देण्यास त्यांना स्नेहपूर्ण आमंत्रण दिले. एक अभ्यास सुरू झाला. लवकरच ती स्त्री सभांना उपस्थित राहू लागली आणि आता ती इतरांसोबत सत्याची सहभागिता करत आहे.
१३ एक वयोवृद्ध बहीण पहाटे समुद्र किनाऱ्यावर साक्षकार्य करण्याचा फायदा घेते. तिला किनाऱ्यावर सकाळी फेरफटका मारायला येणारे लोक, जसे घरातील मोलकरणी, लहान मुलांची देखभाल करणारे, बँकेतील कारकून व इतरजण भेटतात. वाळूजवळील बाकांवर बसून ती बायबल अभ्यास चालवते. अनेक लोकांनी तिच्याकडून सत्य शिकले आहे आणि ते आता यहोवाचे साक्षीदार आहेत.
१४ एका बहिणीच्या कामाच्या ठिकाणी, एक सहकर्मचारी तिला एका राजकीय पक्षाविषयी सांगत होती व तो पक्ष जगाच्या सर्व समस्या सोडवील असा तिचा विश्वास होता. त्यानंतर त्या बहिणीने देवाचे राज्य काय करील त्या अभिवचनांविषयी सांगितले. कामाच्या ठिकाणी केलेल्या या चर्चेमुळे, त्या सहकर्मचारिणीच्या घरात नियमित बायबल अभ्यास घेतला जाऊ लागला व कालांतराने ती व तिचा पती साक्षीदार बनले.
१५ तुम्ही साक्षीदार असल्याचे कधीच विसरू नका! येशूने आपल्या शिष्यांचे वर्णन “जगाचा प्राकाश” असे केले तेव्हा, त्यांनी इतरांना देवाच्या वचनातील आध्यात्मिक प्राज्वलितपणाचा लाभ घेण्याकरता मदत केली पाहिजे अशी कारणमीमांसा त्याने केली. येशूचा सल्ला अनुसरल्यास आपण आपल्या सेवेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहू?
१६ काम शोधत असताना काहीजण अर्ध-वेळेची नोकरी करण्याची निवड करतात. त्यासाठी ते किती वेळ आणि श्रम खर्च करतील यावर बंधने घालतात कारण लाभदायक वाटणाऱ्या कार्यहालचालींचा पिच्छा करण्यात त्यांचा पुष्कळसा वेळ घालवण्याची ते इच्छा करतात. आपल्या सेवेबद्दल आपण असाच दृष्टिकोन बाळगत आहोत का? ते आपले कर्तव्य आहे असे आपल्याला वाटत असले किंवा सेवेसाठी आपण वेळ बाजूला राखू इच्छित असलो, तरी आपल्या प्रामुख आवडीच्या गोष्टी इतर असल्या पाहिजेत का?
१७ अर्ध-वेळेचा ख्रिस्ती अशी कोणतीही गोष्ट नाही हे जाणून आपण आपले समर्पण केले, ‘स्वतःचा त्याग केला’ आणि “सतत” येशूचे अनुसरण करण्यास मान्य झालो. (मत्त. १६:२४, NW) जेथे कोठे लोक असतील तेथे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आपला प्राकाश प्राकाशू देण्याच्या प्रात्येक संधीचा फायदा घेऊन “जिवेभावे” असण्याची आपली इच्छा आहे. (कलस्सै. ३:२३, २४) आपण जगीक मनोवृत्तींचा प्रातिकार केला पाहिजे, आरंभीचा आपला आवेश राखला पाहिजे आणि आपला प्राकाश तेजस्वीरित्या चकाकत राहील याची खात्री केली पाहिजे. काहींनी त्यांचा आवेश थंड होऊ दिला असेल आणि त्यांचा प्राकाश जवळूनही दिसणार नाही इतका मंद होऊ दिला असेल. अशा व्यक्तीला सेवेबद्दल गमावलेला आवेश पुन्हा प्राप्त करण्यासाठी मदत हवी असेल.
१८ काहीजण कुचराई करतील कारण आपला संदेश पुष्कळांकरता अप्रिय आहे. पौलाने म्हटले की, ख्रिस्ताविषयीचा संदेश “ज्यांचा नाश होत आहे त्यांना . . . मूर्खपणाचा आहे.” (१ करिंथ. १:१८) परंतु, इतरांनी काहीही म्हटले, तरी त्याने जोरदारपणे असे घोषित केले: “मला सुवार्तेची लाज वाटत नाही.” (रोम. १:१६) जो लाजतो त्याला कनिष्ठ किंवा अयोग्य असल्याचे वाटते. आपण विश्वाचा सर्वश्रेष्ठ सार्वभौम व त्याने आपल्या सार्वकालिक आनंदासाठी केलेल्या अद्भुत तरतुदींविषयी बोलताना आपल्याला लाज वाटणे कसे शक्य आहे? आपण हे सत्य इतरांना सांगतो तेव्हा आपल्याला कनिष्ठ किंवा अयोग्य असल्याचे वाटणे अशक्य आहे. त्याऐवजी, अतोनात प्रायत्न करण्यास आपल्याला प्रावृत्त झाल्यासारखे वाटले पाहिजे, व आपल्याला ‘लाज वाटण्यास कसलेही कारण नाही’ अशी खात्री आपण प्रादर्शित केली पाहिजे.—२ तीम. २:१५.
१९ सबंध जगभरातील देशांमध्ये आता सत्याचा जो प्राकाश चकाकत आहे तो उत्साहाने परादीसमय नवीन पृथ्वीमध्ये सार्वकालिक जीवनाची आशा सादर करतो. आपला प्राकाश सतत प्राकाशू देण्याची सूचना आपण आत्मसात केली आहे हे आपण दाखवू या! आपण तसे केल्यास, ज्या शिष्यांनी प्रात्येक दिवशी ‘ख्रिस्त येशूविषयीची सुवार्ता गाजविण्याचे सोडले नाही,’ त्यांच्याप्रामाणेच आपल्याकडेही आनंद करण्याचे कारण असेल.—प्रो. कृत्ये ५:४२.