वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९५ पृ. २
  • तुमची प्रागती दिसून येऊ द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची प्रागती दिसून येऊ द्या
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुमची प्रगती सर्वांना दिसून येऊ द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुमची प्रगती सर्वांस दिसून येऊ द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सेवाकार्यात प्रगतीशील असा
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km १२/९५ पृ. २

तुमची प्रागती दिसून येऊ द्या

१ तुम्ही राज्य संदेश पहिल्यांदा ऐकला त्या समयाची आठवण करा. साध्या सत्यांनी ज्ञान व समज मिळवण्याची तुमची इच्छा उत्तेजित केली होती. यहोवाचे मार्ग तुमच्या मार्गांपेक्षा खूप श्रेष्ठ असल्यामुळे लवकरच तुमच्या जीवनशैलीत काही तडजोडी करण्याची गरज तुम्ही ओळखू शकला. (यश. ५५:८, ९) तुम्ही प्रागती केली, तुमचे जीवन समर्पित केले आणि बाप्तिस्मा घेतला.

२ थोडी आध्यात्मिक प्रागती केल्यावरही, काही दुर्बलतांवर मात करावयाची होती. (रोम. १२:२) कदाचित तुम्हाला मनुष्याची भीती होती ज्यामुळे क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासाठी तुम्ही कुचराई करत होता. किंवा कदाचित देवाच्या आत्म्याची फळे दाखवण्यात तुम्ही कमी पडत होता. कचरण्याऐवजी स्वतःसाठी ईश्‍वारशासित ध्येये राखण्याद्वारे प्रागती करण्यास तुम्ही दृढनिश्‍चयी होता.

३ तुम्ही समर्पण केल्यापासून आता अनेक वर्षे उलटून गेली असतील. सिंहावलोकन केल्यास, तुम्हाला स्वतःमध्ये कोणती प्रागती केल्याचे दिसून येते? तुम्ही तुमच्या काही ध्येयांना साध्य केले आहे का? ‘आरंभी’ होता तोच आवेश तुम्हामध्ये आताही आहे का? (इत्त्वी. ३:१४) पौलाने तीमथ्याला “तुझी प्रागती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यांत गढून जा,” असे आर्जवले तेव्हा तो अनेक वर्षांचा अनुभव असलेला प्रौढ ख्रिस्ती होता.—१ तीम. ४:१५.

४ व्यक्‍तिगत परीक्षण आवश्‍यक: आपण आपल्या मागील मार्गाक्रमणाचा विचार करतो तेव्हा, आपण सुरवात केली होती त्यावेळेच्या काही दुर्बलता अद्यापही आहेत असे आपल्याला आढळून येते का? आपण राखलेली काही ध्येये गाठण्यात आपण अपयशी ठरलो आहोत काय? आहोत तर, का? आपले हेतू चांगले होते, तरी आपण दिरंगाई केली असावी. कदाचित जीवनाच्या चिंता किंवा या व्यवस्थीकरणाचे दबाव यांना आपल्याला मागे धरून ठेवण्यास आपण अनुमती दिली असावी.—लूक १७:२८-३०.

५ आपण गतकाळाविषयी काहीच करू शकत नसलो, तरी भवितव्याविषयी निश्‍चितच काहीतरी करू शकतो. आपण स्वतःचे प्रामाणिकपणे मूल्यमापन करू शकतो व आपण कोठे कमी पडत आहोत हे ठरवू शकतो आणि मग सुधारण्याकरता एकाग्रतेने प्रायत्न करू शकतो. आपल्याला देवाच्या आत्म्याची फळे, जसे की, आत्म-संयम, सौम्यता किंवा सहनशीलता ही प्रादर्शित करण्यात सुधारणा करण्याची गरज असेल. (गलती. ५:२२, २३) इतरांसोबत जुळवून घेण्यामध्ये किंवा वडिलांना सहकार्य दाखवण्यामध्ये आपल्याला अडचण असल्यास, आपण नम्रता आणि मनाची लीनता विकसित करावी हे महत्त्वाचे आहे.—फिलिप्पै. २:२, ३.

६ सेवेचे विशेषाधिकार प्राप्त करण्यासाठी आपण आपली प्रागती प्रागट करू शकतो का? जादा प्रायत्न केल्याने, बांधव सेवा सेवक किंवा वडील म्हणून पात्र ठरू शकतात. आपल्यातील काहीजण नियमित पायनियर या नात्याने नाव नोंदवू शकतील. आणखी अनेकांच्या बाबतीत, साहाय्यक पायनियरींग साध्य करण्याजोगे ध्येय असेल. इतरजण व्यक्‍तिगत अभ्यासाच्या सवयींमध्ये सुधार करण्याचा प्रायत्न करू शकतील, मंडळीतील सभांमध्ये अधिक सक्रियतेने सहभाग घेणारे किंवा मंडळीतील प्राचारक या नात्याने अधिक फलदायी बनतील.

७ अर्थात, आपल्याला कोठे प्रागती करायची आहे हे ठरवणे आपणातील प्रात्येकाची जबाबदारी आहे. “प्रौढतेप्रात जाण्याचा” आपला प्रामाणिक प्रायत्न आपल्या आनंदात अधिक भर घालेल आणि आपल्याला मंडळीतील फलदायी सदस्य बनवील.—इत्त्वी. ६:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा