जगाच्या प्रकाशाला अनुसरा
“जो मला अनुसरतो . . . त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”—योहान ८:१२.
१. प्रकाश किती महत्त्वपूर्ण आहे?
प्रकाशा विना आम्ही काय केले असते? वर्ष भरातील प्रत्येक दिवशी डोळे उघडताच २४ तासांसाठी अंधार असल्याची जरा कल्पना करा. अशा एका जगाची कल्पना करा जेथे रंगच नाहीत कारण प्रकाशाविना कोणताच रंग असू शकत नाही. खरोखर जर प्रकाश अस्तित्त्वातच नसता, तर आपाणही नसतो! का नसतो? कारण, प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत, आम्ही जे अन्न—कडधान्य, पालेभाज्या, आणि फळे खातो ते बनवण्यासाठी हिरवी रोपे प्रकाशाचा उपयोग करतात. हे खरे की आपण काही वेळा प्राण्यांचे मांसही खातो. परंतु त्या प्राण्यांनी देखील पाला किंवा इतर प्राण्यांना खाल्ले जे पाला खाणारे होते. यास्तव, आमचे भौतिक जीवन पूर्णपणे प्रकाशावर अवलंबून आहे.
२. प्रकाशाचे कोणते शक्तीशाली उगम आहेत, व ते आम्हाला यहोवाबद्दल काय सांगतात?
२ आमच्याकडे येणारा प्रकाश, सूर्याकडून येतो जो एक तारा आहे. आमचा सूर्य इतका प्रचंड प्रकाश देत असला तरी तो एक मध्यम आकाराचा तारा आहे. यापेक्षाही अनेक प्रचंड आहेत. आणि आम्ही तारांच्या ज्या घोळ्यात राहात आहोत त्या आकाशगंगेत दहा हजार कोटीपेक्षा जास्त तारे आहेत. यासोबतच, संपूर्ण विश्वात, अगणित आकाशगंगा आहेत. ताऱ्यांची किती ही प्रचंड रचना! त्यांच्यातून किती प्रचंड प्रकाश बाहेर पडत असेल! ज्याने हे सर्व बनविले त्या प्रकाशाचा यहोवा किती शक्तीशाली उगम आहे! यशया ४०:२६ घोषित करते: “आपले डोळे वर करुन पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करुन त्यास बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.”
दुसऱ्या प्रकारचा प्रकाश
३. यहोवाकडून येणारा आध्यात्मिक प्रकाश किती महत्त्वपूर्ण आहे?
३ यहोवा आणखी एका प्रकारच्या प्रकाशाचा ही उगम आहे, जो आध्यात्मिक दृष्टी, ज्ञानप्रसार मिळण्यासाठी मदत करतो. एक शब्दकोश “प्रज्वलित” याची व्याख्या अशारितीने करतो: “ज्ञान पुरविणे; शिकवणे; आध्यात्मिक सूक्ष्म दृष्टी देणे.” “प्रज्वलित होण्याची” व्याख्या अशी करतो की: “पूर्वग्रह आणि लोकभ्रम यातून मुक्त.” त्याचे वचन, पवित्र शास्त्र याच्या अचूक ज्ञानाकरवी यहोवाकडून आध्यात्मिक प्रज्वलितपणा पुरविला जातो. त्यामुळेच तर आपण देव कोण आहे व त्याचे उद्देश काय आहेत हे जाणू शकतो. “अंधकारातून उजेड प्रकाशित होईल; असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतकरणात प्रकाशला आहे.” (२ करिंथकर ४:६) तथापि, देवाच्या वचनातील सत्य आम्हाला पूर्वग्रह आणि लोकभ्रम यातून मुक्त करते. येशूने म्हटले: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.”—योहान ८:३२.
४, ५. यहोवाकडून येणारे ज्ञान आमच्या जीवनामध्ये प्रकाशाची भूमिका कसे पार पाडते?
४ खऱ्या आध्यात्मिक प्रज्वलितपणाचा उगम, यहोवा, “ज्ञानाने परिपूर्ण” असा आहे (ईयोब ३७:१६ पंडिता रमाबाई भाषांतर) स्तोत्रसंहिता ११९:१०५ देखील देवाविषयी असे घोषित करते: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.” यास्तव तो आमच्या जीवनाच्या पुढील पावलांकरताच नव्हे तर आमच्यासमोर असलेल्या मार्गासाठी सुद्धा आध्यात्मिक प्रकाश देऊ शकतो. त्याच्या शिवाय, आमचे जीवन एका मोटार कार प्रमाणे होईल जिला दिवे नाहीत व आजूबाजूला कोठेच दिवे नाहीत आणि एका अंधाऱ्या रात्री घाटातून ती चालवित आहोत. देवाकडून मिळणाऱ्या आध्यात्मिक प्रकाशाची तुलना मोटार कारच्या पुढे बसविलेल्या प्रखर प्रकाशाच्या दिव्यांसोबत करू शकतो. हा प्रकाश मुख्य रस्त्याला प्रकाशित करत असल्यामुळे आपण कोठे जात आहोत हे स्पष्टरित्या पाहू शकतो.
५ यशया २:२-५ मधील भविष्यवाणी दाखवते की ज्या लोकांना आध्यात्मिक प्रज्वलितपणा पाहिजे अशा सर्व राष्ट्रातील लोकांना तो एकत्रित करत आहे ज्यामुळे ते खरी भक्ती शिकतील व आचरतील. वचन ३रे म्हणते: “तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” वचन ५वे सत्य शोधकांना आमंत्रण देते: “चल ये, आपण परमेश्वराच्या [यहोवा न्यू.व.] प्रकाशात चालू.”
६. यहोवाकडचा प्रकाश आम्हाला हळूवारपणे कोठे निरवील?
६ यास्तव जीवनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दोन: भौतिक आणि आध्यात्मिक प्रकाशांचा यहोवा उगम आहे. ७०, ८० किंवा याहीपेक्षा अधिक वर्षे जीवंत राहण्यासाठी भौतिक प्रकाश आम्हाला आमच्या भौतिक शरीरिला मदत करतो. परंतु आध्यात्मिक प्रकाश आम्हाला पृथ्वीवरील नंदनवनातील अनंतकाळ जीवनाकडे निरवितो. देवाला प्रार्थना करताना येशूने जे म्हटले त्याप्रमाणे हे आहे: “सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
आध्यात्मिक अंधकारात असलेले जग
७. पूर्वी कधीही एवढी गरज भासली नाही तितकी आज आध्यात्मिक प्रज्वलितपणाची गरज का आहे?
७ यापूर्वी, जितकी गरज भासली नाही तितक्या आध्यात्मिक प्रकाशाची आम्हाला आज गरज आहे. मत्तय २४ अध्याय आणि २ तीमथ्य ३ अध्यायातील भविष्यवाण्या दाखवून देतात की आम्ही युगाच्या समाप्तीच्या अगदी निकट आहोत. आम्ही “शेवटल्या दिवसात” जगत आहोत हे ह्या आणि इतर भविष्यावाण्यांनी आमच्या काळात भयभीत घटनांना भाकीत केले होते ते आपल्याला कळून येते. भविष्यवाणींच्या अनुषंगाने, ह्या शतकाने एकावर एक आपत्तीचा अनुभव घेतला आहे. गुन्हा आणि हिंसा भीतिदायक प्रमाणात वाढली आहे. युद्धाने दहा कोटीपेक्षा अधिक जीवांचा बळी घेतला आहे. एडस् सारख्या भयंकर आजाराने लाखोंवर झडप घातली आहे, याशिवाय फक्त अमेरिकेतच एडस्मुळे १,६०,००० जण मरण पावले. वैवाहिक जीवन मोडकळीस आले आहेत आणि लैंगिक नैतिकतेकडे जुनी पद्धत ह्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
८. कोणती परिस्थिती आज मानवजातीच्या समोर आहे, व का?
८ संयुक्त राष्ट्राचे भूतपूर्व जनरल-सचीव हॉवीयेर परेज डे वेओर म्हणाले: “गरीबी ही समाजातील परस्परांचे आकर्षण नष्ट करीत असल्याचा जागतिक परिस्थिती प्रचंड पुरावा देते.” त्यांनी हे निरक्षिले की १०० कोटी लोक पूर्ण गरीबीत जगत आहेत व यामुळे हिंसाचारी झगड्यांना खाद्य मिळाले आहे.” “या गंभीर पीडा,” ते म्हणतात, “सरकार अवलंबित असलेल्या उपचारांना पार उद्ध्वस्त करतात.” एका प्रख्यात संस्थेच्या प्रमुखांनी म्हटले की, “समाजावर ताबा राहिलेला नाही, हीच समाजापुढे असणारी केंद्रिय समस्या आहे.” स्तोत्रसंहिता १४६:३ मधील हे शब्द किती खरे आहेत की: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”
९. मानवजातीला पूर्ण झाकून टाकणाऱ्या अंधकाराला कोण जबाबदार आहेत, व ह्या प्रभावापासून कोण आमची मुक्तता करील?
९ आजची परिस्थिती ही यशया ६०:२ ने भाकीत केल्यानुसार आहे: “पाहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे.” यहोवाकडून येणाऱ्या प्रकाशाला आत्मसात न केल्यामुळे ह्या काळोखाने पृथ्वीच्या बहुसंख्य राहिवाश्यांना झाकून टाकले आहे. प्रकाशाच्या पित्याचे मुख्य शत्रू दियाबल सैतान व त्याचे दूत हे त्यांच्या आध्यात्मिक अंधकाराचे मूळ कारण आहे. ते “काळोखातील जगाचे अधिपती” आहेत. (इफिसकर ६:१२) दुसरे करिंथकर ४:४ म्हणते, त्याप्रमाणे दियाबल “ह्या युगाचे दैवत” आहे ज्याने “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” कोणतेही मानवी सरकार सैतानाच्या प्रभावाखालच्या जगाला मुक्त करू शकत नाही. केवळ देवच करू शकतो.
“मोठा प्रकाश”
१०. आमच्या काळात मानवजातीवर प्रकाश चमकेल याबद्दल यशया संदेष्ट्याने कसे भाकीत केले?
१० अद्यापपर्यंत, बहुसंख्य मानवजातीला निबिड काळोखाने झाकले असता, देवाच्या वचनाने यशया ६०:२, ३ मध्ये ही भविष्यवाणी केली की: “तुजवर परमेश्वर [यहोवा न्यू.व.] उदय पावत आहे, त्याचे तेज तुजवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील.” हे यशया २ऱ्या अध्यायाच्या अनुषंगाने आहे जेथे असे अभिवचन दिले आहे की यहोवाची प्रज्वलित खरी भक्ती शेवटल्या दिवसात स्थापिली जाईल आणि जसे २ आणि ३ वचन म्हणते, “देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला, आपण परमेश्वराच्या [यहोवा न्यू.व.] पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ’” म्हणजेच त्याच्या उच्च खऱ्या भक्तीकडे. यास्तव, हे जग सैतानाच्या अधिपत्याखाली असले तरी, देवाकडचा प्रकाश प्रकाशिला जात आहे आणि तो काळोखापासून मोठ्या संख्येच्या लोकांना मुक्त करीत आहे.
११. यहोवाचा प्रकाश प्रतिबिंबित करण्यात कोण प्रमुख होणार होता व शिमोनाने त्याची ओळख कशी दिली?
११ यशया ९:२ मधील भविष्यवादाने भाकीत केले, की त्याचा प्रकाश प्रतिबिंबित करण्यासाठी देव कोणाला तरी जगात पाठवणार आहे. ते म्हणते: “अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे.” हा “मोठा प्रकाश” यहोवाच्या वतीने बोलणारा येशू ख्रिस्त आहे. येशूने म्हटले: “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” (योहान ८:१२) येशू जेव्हा बालक होता तेव्हाही काहींना हे ठाऊक होते. लूक २:२५ म्हणते की शिमोन नावाचा एक पुरुष “नीतिमान व भक्तीमान” होता व “त्याच्यावर पवित्र आत्मा होता.” जेव्हा शिमोनाने त्या येशू बालकाला, पाहिले, त्याने देवास प्रार्थनेत म्हटले: “माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड असे आहे.”—लूक २:३०-३२.
१२. येशूने लोकांना झाकून टाकणारा अंधकाराचा पडदा कधी व कशारितीने काढण्यास सुरवात केली?
१२ येशू त्याच्या बाप्तिस्म्यानंतर काही काळाने, मानवजातीवरचा अंधकाराचा पडदा काढू लागला. यशया ९:१, २ मध्ये म्हटले आहे की “मोठा प्रकाश” आध्यात्मिक अंधकारात चालणाऱ्या लोकांवर चमकण्यास आरंभ होईल व हे पूर्ण झाल्याबद्दल मत्तय ४:१२-१६ आम्हाला सांगते. मत्तय ४:१७ म्हणते: “तेव्हा पासून येशू घोषणा करीत सांगू लागला की, ‘पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केल्याने येशूने लोकांना देवाच्या उद्देशांविषयी प्रज्वलित केले. त्याने “सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशीता ही प्रकाशित केली आहेत.”—२ तीमथ्य १:१०.
१३. येशूने स्वत:चे वर्णन कसे दिले, व तो असे इतक्या निश्चितपणे कसे करू शकला?
१३ येशूने विश्वासूपणे देवाचा प्रकाश प्रतिबिंबित केला. त्याने म्हटले: “जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे . . . मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे, त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे.”—योहान १२:४४-५०.
“त्याच्याठायी जीवन होते”
१४. योहान १:१, २ मध्ये येशूची ओळख कशी दिली आहे?
१४ होय, यहोवाने त्याच्या पुत्राला पृथ्वीवर प्रकाश होऊन, सार्वकालिक जीवनाचा मार्ग लोकांना दाखवण्यासाठी पाठविले. योहान १:१-१६ मध्ये याचे कसे वर्णन दिले आहे याकडे लक्ष द्या. पहिले आणि दुसरे वचन असे वाचण्यात येते: “प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता.” येथे योहान मानवपूर्व येशूसाठी “शब्द” ही संज्ञा वापरतो. ह्यामुळे त्याने यहोवा देवाचा प्रवक्ता म्हणून जे काम केले त्याची स्पष्टपणे ओळख देते. आणि जेव्हा योहान असे म्हणतो की: “प्रारंभी शब्द होता” तेव्हा त्याचा अर्थ होतो की तो शब्द देवाच्या सृष्टीतला पहिला “देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’” होता. (प्रकटीकरण ३:१४) देवाच्या प्राण्यांमधील त्याचे सर्वोत्कृष्ठ स्थान त्याला “देव,” किंवा समर्थ म्हणण्यास खरा आधार पुरविते. यशया ९:६ त्याला सर्वसमर्थ देव नव्हे, तर “समर्थ देव” असे संबोधते.
१५. योहान १:३-५ मध्ये येशूबद्दलची आणखी कोणती अधिक माहिती मिळते?
१५ योहान १:३ स्पष्ट करते: “सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही.” कलस्सैकरास १:१६ म्हणते की: “आकाशात व पृथ्वीवर असलेले सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.” योहान १:४ म्हणते की: “त्याच्याठायी जीवन होते; व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.” यास्तव, शब्दाच्या द्वारे सर्व प्रकारचे जीवन निर्मिले गेले; आणि त्याच्या पुत्राच्याकरवी मर्त्य आणि पापी मनुष्यजातीसाठी देव सार्वकालिक जीवन साध्य करुन देतो. निश्चितच यशया ९:२ ज्याला “मोठा प्रकाश” असे म्हणते तो येशू समर्थ आहे. आणि योहान १:५ म्हणते: “तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.” प्रकाश सत्य आणि धार्मिकतेला चित्रित करतो, उलटपक्षी, अंधकार चूक आणि अधार्मिकतेला चित्रित करतो. तथापि, योहान दाखवतो की अंधकार प्रकाशावर जय मिळवू शकणार नाही.
१६. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूच्या कामाचा विस्तार कसा दाखवून दिला?
१६ योहान आता ६ ते ९ वचनात तर्क करतो: “देवाने पाठविलेला एक मुनष्य प्रगट झाला; त्याचे नाव योहान [बाप्तिस्मा करणारा]. तो साक्षीकरीता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरीता आला; ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा [योहान] तो प्रकाश नव्हता, तर तो प्रकाशाविषयी [येशू] साक्ष देण्याकरीता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करितो तो जगात येणार होता.” येणाऱ्या मशीहाकडे योहानाने अंगुली दर्शविली व त्याच्या शिष्यांना त्याच्याकडे वळविले. त्यावेळेत, सर्व प्रकारच्या लोकांना प्रकाशाचा स्वीकार करण्यासाठी संधी दिली होती. यास्तव, येशू केवळ यहूद्यांच्या फायद्यासाठीच आला नाही तर सर्व मानवजात—श्रीमंत किंवा गरीब, कोणत्याही वंशाचा असो, सर्वांच्या फायद्यासाठी आला.
१७. येशूच्या दिवसातील यहूद्यांच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल योहान १:१०, ११ आम्हाला काय सांगते?
१७ वचन १० आणि ११ पुढे म्हणते: “तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही, जे त्याचे स्वत:चे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.” त्याच्या मानवपूर्व इतिहासात, येशू, तोच होता ज्याच्याद्वारे सर्व मानवजातीला बनवण्यात आले. पृथ्वीवर असताना, त्याच्या स्वत:च्याच लोकांनी, यहूद्यांनी त्याचा अव्हेर केला. त्यांचे दुषकृत्य आणि ढोंगीपणा उघड व्हावा असे त्यांना वाटत नव्हते. प्रकाशाच्या ऐवजी त्यांनी अंधकार पसंत केला.
१८. काही जण खास वारसाने देवाचे पुत्र बनतील हे योहान १:१२, १३ आम्हाला कसे दाखवते?
१८ योहान १२ आणि १३ वचनात म्हणतो: “परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.” ही वचने दाखवतात की, येशूचे शिष्य आरंभापासून देवाचे पुत्र नव्हते. ख्रिस्त पृथ्वीवर येण्यापूर्वी, मानवांसाठी अशाप्रकारचे पुत्रत्त्व किंवा स्वर्गीय आशा खुली नव्हती. परंतु ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर ज्यावर त्यांनी विश्वास प्रदर्शित केला, काही मानवांना पुत्रत्त्वासाठी दत्तक घेतले आणि देवाच्या स्वर्गीय राज्यात ख्रिस्तासोबत राजे म्हणून जीवनाची आशा प्राप्त झाली.
१९. योहान १:१४ मध्ये दाखवल्यानुसार देवाचा प्रकाश प्रतिबिंबित करण्यास येशू एका उत्तम पदावर का आहे?
१९ वचन १४वे तर्क करते: “शब्द देही झाला, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे.” पृथ्वीवर असताना, येशूने त्याचा एकुलता एक ज्येष्ठ पुत्र या नात्याने देवाचे गौरव प्रतिबिंबित केले. या कारणास्तव, एका अतुलनीय मार्गाने, तो देवाला व लोकांना त्याचे उद्देश प्रकट करण्यास पात्र ठरला.
२०. योहान १:१५ मध्ये नमुद केलेल्यानुसार बाप्तिस्मा देणारा योहान येशूविषयी आम्हाला काय सांगतो?
२० पुढे, प्रेषित योहान १५व्या वचनात लिहितो: “त्याच्याविषयी योहान [बाप्तिस्मा करणारा] साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो: जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे.” येशूचा मानव म्हणून जन्म होण्याआधी सहा महिने बाप्तिस्मा करणारा योहान जन्मला होता. परंतु योहानापेक्षा येशूने अधिक काम केले होते, म्हणूनच तो प्रत्येक मार्गात योहानापेक्षा पुढे होता. योहानाने हे कबूल केले की येशू त्याच्या पूर्वी अस्तित्त्वात होता, कारण येशूला मानवपूर्व अस्तित्त्व होते.
यहोवाकडून देणग्या
२१. आम्हा “सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे” असे योहान १:१६ का म्हणते?
२१ योहान १:१६ तर्क करते: “त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.” आदामापासून वारसाने मिळालेल्या पापात जरी मानवांचा जन्म झालेला असला तरी, यहोवाने ह्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करण्याचे, नव्या जगात लाखोंचा बचाव, मेलेल्यांचे पुनरुत्थान, आणि पाप आणि मरण काढून टाकण्याचे योजिले आहे ज्याचा परिणाम पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळ जीवन होईल. हे सर्व आशीर्वाद पापी मानवांनी कमवले नाहीत ते त्यापात्रतचेही नाहीत. ख्रिस्ताकरवी यहोवाकडून मिळालेल्या त्या देणग्या आहेत.
२२. (अ) देवाची सर्वात महान देणगी काय साध्य करून देते? (ब) पवित्र शास्त्राच्या शेवटल्या पुस्तकात कोणते आमंत्रण आम्हा सर्वांना दिले आहे?
२२ कोणती मोठी देणगी हे सर्व शक्य करून देते? “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) तथापि, ज्यांना आध्यात्मिक प्रकाश आणि सार्वकालिक जीवन हवे त्यांच्यासाठी देव आणि त्याचा पुत्र, जो “जीवनाचा अधिपति” आहे ह्यांचे अचूक ज्ञान महत्त्वपूर्ण आहे. (प्रे. कृत्ये ३:१५) यास्तव, पवित्र शास्त्राचे शेवटले पुस्तक, सर्व सत्यप्रेमींना आणि ज्यांना जीवन हवे आहे अशांना पुढील आमंत्रण देते: “ये, ऐकणाराही म्हणो, ये आणि ‘तान्हेला येवो’; ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी’ फुकट घेवो.”—प्रकटीकरण २२:१७.
२३. मेंढरासमान लोक जेव्हा प्रकाशाजवळ येतात तेव्हा ते काय करतील?
२३ नम्र, मेंढरासमान लोक जगाच्या प्रकाशाकडेच नुसते येत नाहीत तर त्याला अनुसरतील: “मेंढरे त्याच्या मागे चालतात कारण ते त्याच्या वाणीस [सत्याचा सूर] ओळखतात.” (योहान १०:४) खरेच, “त्याच्या पावलांवर पाऊल ठेऊन” चालण्यास त्यांना अतिशय आनंद होतो कारण त्यांना माहीत आहे की असे करण्याचा अर्थ त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन असा होतो.—१ पेत्र २:२१.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ कोणत्या दोन प्रक्रारचा प्रकाश यहोवाकडून येतो?
▫ आज आध्यात्मिक प्रज्वलितपणा इतका महत्त्वपूर्ण का आहे?
▫ कोणत्या मार्गाने येशू “मोठा प्रकाश” आहे?
▫ योहानाचा पहिला अध्याय आम्हाला येशूबद्दल काय सांगतो?
▫ जगाचा प्रकाश अनुसरणाऱ्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?
[चित्र]
शिमोनाने येशूबद्दल “परराष्ट्रीयांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड” असे म्हटले