सर्व काही देवाच्या गौरवास्तव करा
१ आपल्या प्रिय बंधू व बहिणींसोबत सहवास राखणे किती तजेला देणारे आहे! (१ करिंथ. १६:१७, १८) आपण हे सभांमध्ये, संमेलनांमध्ये, अधिवेशनांमध्ये व क्षेत्र सेवेत करत असतो. अनौपचारिक प्रासंगी, जसे की, आपल्या घरी पाहुणे येतात त्या वेळी देखील आपण सहवास राखतो. अशा प्राकारे आपण पाहुणचार करतो व एकमेकांना उत्तेजन देतो. (रोम. १२:१३; १ पेत्र ४:९) विवाहाच्या समारंभांची योजना करताना, एप्रिल १५, १९८४ च्या टेहळणी बुरूज मधील उत्तम सल्ला लक्षात ठेवा. तेथे जमलेल्या लोकांची संख्या ठरवण्याबद्दल व सर्व काही देवाच्या गौरवास्तव घडण्यासाठी समूहावर नियंत्रण कसे राखावे याविषयी कृपया १९ व २० पृष्ठांवरील सल्ल्याची खासरितीने नोंद घ्या.
२ संघटित सामाजिक व्यवस्था: आपण ‘खातो, पितो किंवा जे काही करतो’ ते सर्व “देवाच्या गौरवासाठी” केले पाहिजे. (१ करिंथ. १०:३१-३३) काहीजण हा सल्ला अनुसरत नाहीत आणि देखरेख ठेवता येत नाही इतके मोठे सामाजिक मेळावे असल्यामुळे समस्या सतत वाढत जातात. काही प्रासंगी, भव्य समारंभांसाठी शेकडो लोकांना बोलावण्यात येते जेथे जगिक मनोरंजन असते. काहीवेळेस उपस्थित असणाऱ्यांना प्रावेश किंवा इतर शुल्क द्यावे लागते. असे मेळावे अगदी जगिक प्रासंगांसारखेच असतात; तेथील आत्मा, सभ्यता व बायबल तत्त्वांच्या सुसंगतेत नसतो.—रोम. १३:१३, १४; इफिस. ५:१५-२०.
३ अहितकारक व जगिक मनोरंजन असलेल्या व योग्य देखरेख नसलेल्या भाड्याच्या इमारतींमध्ये यहोवाचे साक्षीदार मोठ्या प्रामाणात एकत्र झाले आहेत असा अहवाल देण्यात आला आहे. “यहोवाचा साक्षीदार” सप्ताहांत असे घोषित केलेल्या अशाच कार्यहालचाली हॉटेल किंवा रिसोर्ट्समध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या समूहांवर योग्यपणे देखरेख करता न आल्यामुळे समस्या उद्भवल्या आहेत. असभ्यता, दारुबाजी, तसेच काहीवेळेस अनैतिकता देखील घडली आहे. (इफिस. ५:३, ४) अशी वर्तणूक जेथे दिसून येते असे सामाजिक मेळावे यहोवाचा सन्मान करीत नाहीत. त्या उलट, ते मंडळीच्या प्रातिभेवर कलंक लावतात व इतरांसाठी अडखळण बनतात.—१ करिंथ. १०:२३, २४, २९.
४ ख्रिश्चनांना पाहुणचार दाखवण्यास उत्तेजन दिले जाते, परंतु आध्यात्मिक गोष्टींची देवाणघेवाण करण्यावर अधिक जोर दिला पाहिजे. (रोम. १:११, १२) लहान मेळावे बहुतेकवेळा उत्तम असतात. आवर मिनिस्ट्री पुस्तक पृष्ठे १३५-६ वर म्हणते: “काहीवेळा, ख्रिस्ती सहवासासाठी अनेक कुटुंबांना एखाद्या घरी बोलावले असेल. . . . योग्यपणे, अशा प्रासंगी जे काही घडते त्याविषयी यजमानांना व्यक्तिगतरित्या जबाबदार असल्याचे वाटले पाहिजे. हे लक्षात ठेवून, समंजस ख्रिश्चनांनी अशा समूहांची संख्या व अशा मेळाव्यांचा अवधी मर्यादित ठेवण्यात किती सुज्ञता आहे ते पाहिले आहे.” आपल्या मित्रांना आध्यात्मिकरित्या उत्तेजन देण्याचा आपला हेतू असतो त्या वेळी थाटमाट करण्याची गरज नाही असे येशूने दाखवून दिले.—लूक १०:४०-४२.
५ सह-ख्रिश्चनांना पाहुणचार दाखवणे ही उत्तम गोष्ट आहे. तथापि, आपल्या घरातील सभ्य मेळावा व भाड्याच्या ठिकाणी जगिक आत्मा प्रादर्शित करणारा मोठा समारंभ यात पुष्कळ फरक आहे. तुम्ही इतरांना पाहुणे म्हणून निमंत्रण देता तेव्हा जे काही घडते त्याची पूर्ण जबाबदारी तुम्ही घेऊ शकता याची तुम्हाला खात्री असली पाहिजे.—ऑगस्ट १५, १९९२ चे टेहळणी बुरूज पृष्ठे १७-२० पाहा.
६ खरोखर, आपल्याला उत्तम कार्यांसाठी प्रावृत्त करणारे तजेला देणारे उत्तेजन ज्यांच्याकडून प्राप्त होते ते बंधुत्व बहाल करून यहोवाने आपल्याला आशीर्वादित केले आहे. (मत्त. ५:१६; १ पेत्र २:१२) सामाजिक कार्यहालचालींमध्ये, सभ्यता व समंजसपणा दर्शवल्याने, आपण नेहमीच आपल्या देवाला गौरव देऊ व इतरांकरता उभारणीकारक असू.—रोम. १५:२.