सामाजिक मनोरंजन—त्याचे लाभ मिळवा, पाश टाळा
“मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही.”—उपदेशक २:२४.
१. मनोरंजनाच्या बाबतीत देवाचे मार्गदर्शन त्याच्या लोकांना कशी मदत देत आहे?
यहोवाचे मार्गदर्शन त्याच्या सेवकांना खूप फायदे देते. ही गोष्ट आपल्याला मनोरंजनाच्या बाबतीत पाहायला मिळते. त्याचे मार्गदर्शन ख्रिस्ती लोकांना विविध दृष्टीकोणांचा अतिरेक टाळण्यात मदत देते. पेहराव व वागणूक याबाबतीत कठोर दृष्टिकोण बाळगणाऱ्या काही धर्माचरणाच्या लोकांना कोणतेही सुख पापच वाटते. पण तेच दुसरीकडे लोक अशाही सुखविलासाचा पाठपुरावा करीत राहतात जे यहोवाचे कायदे व तत्त्वे यांच्याविरुद्ध आहेत.—रोमकर १:२४-२७; १३:१३, १४; इफिसकर ४:१७-१९.
२. मनोरंजनाबद्दल देवाचा दृष्टिकोण आरंभालाच कसा प्रकट झाला?
२ पण, देवाच्या लोकांबद्दल काय? पवित्र शास्त्राचा नव्यानेच अभ्यास करू लागणाऱ्या पुष्कळांना हे बघून आश्चर्य वाटते की, देवाने मानवाची निर्मिती जीवनाच्या आनंदाचा उपभोग घेण्याच्या क्षमतेसह केली आहे. त्याने आपल्या पहिल्या पालकांस काम करण्यासाठी दिले—परंतु अपूर्ण मानवाच्या उदास व त्रासदायक वाटणाऱ्या कामासारखे ते नव्हते. (उत्पत्ती १:२८-३०) पृथ्वीवरील उद्यानात वास्तव्य करून असणाऱ्यांना आनंद कोणत्या हितकारी व विविध मार्गाने मिळू शकतो ते विचारात घ्या. त्यांना भीती नसणाऱ्या जंगली पशूंची हालचाल आनंद देते आणि विविध प्रकारची पाळीव जनावरे त्यांच्या दैनंदिन नित्य क्रमाचा भाग होऊ शकतात! तसेच ‘दिसण्यात सुंदर व स्वादिष्ट फळे देणाऱ्या सर्व जातीच्या झाडांपासून’ केवढा चांगला आहार मिळू शकतो!—उत्पत्ती २:९; उपदेशक २:२४.
३-५. (अ) मनोरंजनाने कोणता उद्देश साध्य होण्यास हवा? (ब) देवाने इस्राएलांना मनोरंजनापासून वंचित ठेवले नाही याची आम्ही कशी खात्री राखू शकतो?
३ अशा या हालचालींकडे खरे पाहता, मनोरंजन या दृष्टिकोणातून बघता येते; आणि याचा नंदनवनात असणारा उद्देश आजही तोच असू शकतोः पुढील फलदायी कामास लागणाऱ्या शक्तीची प्राप्ती देण्यासाठी टवटवीत करणे व तजेला देणे. जेव्हा मनोरंजन हा भाग साध्य करते तेव्हा ते लाभदायी ठरते. याचा असा अर्थ होतो का की, आज जरी खरे उपासक नंदनवनात राहात नसले तरी ते आपल्या जीवनात काही मनोरंजक गोष्टींसाठी जागा ठेवू शकतात? होय. यहोवाच्या प्राचीन लोकातील मनोरंजनाबद्दल इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स असे म्हणतेः
४ “पवित्र शास्त्र अहवालात इस्राएलातील मनोरंजन तसेच करमणूक यांची ठळकपणे माहिती देण्यात आली नाही. तरीपण, या गोष्टी राष्ट्राच्या धार्मिक तत्त्वांच्या सहमतात होत असताना त्या योग्य व हव्याशा आहेत असे भासवले गेले. मनोरंजनाचा प्रमुख प्रकार संगीतमय वाद्ये वाजवणे, गायन, नृत्य, संभाषण तसेच काही खेळ हे होते. कोडी घालणे तसेच अवघड प्रश्न टाकणे यालाही जागा होती.—शास्ते १४:१२.”—खंड १, पृ. १०२.
५ दाविद विजय मिळवून परतल्यावर विजयोत्सवात (इब्री, सा․चकʹ) इब्री स्त्रियांनी तंतुवाद्ये व डफ यांचा उपयोग करून आनंद व्यक्त केला. (१ शमुवेल १८:६, ७) इब्री शब्दाचा मूळ अर्थ “हसणे,” असा होतो आणि काही आवृत्त्या “नाचत” असा शब्दप्रयोग घालतात. (बाईंगटन, रॉदरहॅम, द न्यू इंग्लिश बायबल) कराराच्या कोशाचे स्थलांतर होताना “दावीद व इस्राएल घराण्याचे सर्व लोक . . . नानाविध वाद्ये . . . परमेश्वरापुढे [यहोवा, न्यू.व.] वाजवीत चालले.” दाविदाची बायको मीखल हिने याचा वेगळाच दृष्टिकोण धरला, कारण तिला दाविद या मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घेत असल्याचे आवडले नाही. (२ शमुवेल ६:५, १४-२०) बाबेलातून बाहेर पडणारे बंदिवान लोक देखील अशाच आनंदाने परत येतील असे देवाने भाकित केले.—यिर्मया ३०:१८, १९; ३१:४; पडताळा स्तोत्रसंहिता १२६:२.
६. मनोरंजनाच्या बाबतीत आपला दृष्टिकोण कसा असावा याबद्दल ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने आपल्याला कशी मदत देतात?
६ यास्तव आम्ही देखील मनोरंजनाच्या बाबतीत समतोलपणा राखण्याचे शिकून घेतले पाहिजे. येशू हा तपस्वी नव्हता याबद्दल आम्ही मान्यता दाखवतो का? त्याने, लेव्याने दिलेल्या “मोठ्या जेवणावळीतील” उत्तेजक आहाराचा लाभ घेण्यासाठी वेळ दिला. तसेच स्व-धार्मिक लोकांनी त्याला खादाड व मद्यपी असे म्हटले तेव्हा त्याने त्यांचा दृष्टिकोण व विचार यांना अव्हेरिले. (लूक ५:२९-३१; ७:३३-३६) शिवाय तो लग्नाला देखील गेला होता व त्याने तेथील उत्सवात सहभागिता घेतली होती. (योहान २:१-१०) येशूचा सावत्रभाऊ यहूदा याने ख्रिस्ती लोकात “प्रीतीभोजन” होत असल्याचा उल्लेख केला; या भोजनाचा स्वाद, आनंद व आरामदायी सहवास गरजवंत बांधव घेऊ शकत होते.—यहूदा १२.
सामाजिक मनोरंजनाला त्याच्या वेळेवर व जागेवर ठेवणे
७. मनोरंजनाच्या बाबतीत समतोल ठेवावा याबद्दल पवित्र शास्त्र कसे उत्तेजन देते?
७ “ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करितात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो.” असे उपदेशक १०:१९ संमतीकारकपणे म्हणते. यामुळे मनोरंजन हे मुळात चूक किंवा वाईट आहे असा अर्थ ध्वनित होत नाही, हो ना? असे असले तरी, तेच पुस्तक पुढे असे म्हणतेः “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोध करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:१, ४) योग्य मनोरंजनास न अव्हेरिता पवित्र शास्त्र आपल्याला काही दक्षता देते. यात सामाजिक मनोरंजन त्याच्या जागी, त्याच्या वेळेवर व त्याच्या प्रमाणात ठेवण्याची सूचना समाविष्ट आहे. मोठमोठ्या सामाजिक मेळाव्यात वारंवार जे धोके संभवतात त्याबद्दल देखील ते आपल्याला इशारा देते.—२ तीमथ्य ३:४.
८, ९. आम्ही ज्या काळात राहात आहोत त्याने व आम्हास मिळालेल्या देव-प्रणीत नेमणूकीने मनोरंजनाच्या बाबतीत कसे वर्चस्व राखले पाहिजे?
८ बाबेलातून परतलेल्या यहूद्यांना खूप कष्टाचे काम करायचे होते तरी त्यांना आनंदी मनोरंजनाचा लाभ मिळणार होता हे आपण आधी पाहिले आहे. तरीही, आधी यिर्मयाने असे म्हटलेः ‘विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही.’ (यिर्मया १५:१७) त्याला त्यावेळी खरे पाहता, येणाऱ्या शिक्षेबद्दलचा संदेश देण्याची ईश्वरी नेमणूक मिळाली होती, या कारणास्तव, ती वेळ त्याच्यासाठी आनंदात घालवण्याजोगी वेळ नव्हती.
९ आज ख्रिस्ती जनांना देखील देवाकडील आशेचा संदेश आणि सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेवर येणाऱ्या नाशाची घोषणा करण्याची नेमणूक आहे. (यशया ६१:१-३; प्रे. कृत्ये १७:३०, ३१) यामुळे हे स्पष्ट आहे की, आम्ही मनोरंजनाला आमच्या जीवनात अधिक प्राधान्य देण्याची मुभा देऊ नये. यासाठी आपण, जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या चिमूटभर मीठ किंवा खास मसाल्याचे उदाहरण घेऊ. तुम्ही ही रुचि इतकी मोठ्या प्रमाणात घालणार का की, ते प्रमाण जेवणापेक्षाही अधिक होईल? कदापि नाही. यास्तव, येशूने योहान ४:३४ व मत्तय ६:३३ मध्ये जे म्हटले आहे ते बघता, आम्हास प्रधान वाटणारी गोष्ट—आमचे अन्न—देवाच्या इच्छेप्रमाणे करणे ही असली पाहिजे. आणि मनोरंजन हे रूचि देणाऱ्या मसाल्यासारखे असले पाहिजे; त्याने आम्हाला तजेला व उत्साह दिला पाहिजे, थकवा किंवा चिरडून टाकल्यासारखे करता कामा नये.
१०. आम्ही मनोरंजनास जितका वेळ देत आहोत त्याबद्दल सर्वांनीच पुनर्निरिक्षण का केले पाहिजे?
१० थोडे थांबून जरा विचार कराः आम्ही मनोरंजनासाठी देत असलेला वेळ व लक्ष ही किफायतशीर आहेत असे लोक म्हणत नाहीत का? त्यांना दुसरे काही वाटले असते तर त्यांनी त्यात बदल केला असता. तर मग, यामुळे, आम्ही प्रत्येकाने थांबून गंभीर व स्पष्ट विचार करून, आमच्या जीवनात मनोरंजन वास्तविकपणे केवढे स्थान राखून आहे याबद्दल परिक्षण करून बघण्यास नको का? ते चोरून आमच्या जीवनात प्रधान जागा तर घेत नाही ना? उदाहरणार्थ, आपण घरी परतलो तर लागलेच दूरदर्शन लावतो का? आम्ही दर आठवडी मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या वेळेचा अधिक भाग, जसे की, शुक्रवारची किंवा शनिवारची रात्र दिलेली आहे का? आपण घरी आलो व त्यावेळी मनोरंजनाचा कोणताही कार्यक्रम नाही हे बघून आपल्याला निराश झाल्यासारखे वाटते का? आणखी दोन प्रश्नः एखादा मेळावा संपल्यावर आपण अधिक जागरण केल्याचे किंवा खूप प्रवास केल्यामुळे थकल्यासारखे वाटायला लागते का की, ज्यामुळे ख्रिस्ती सेवकपणात सहभागी होण्यासाठी किंवा मालकाला दिवसाचे चांगले काम भरून देण्यामध्ये खूपच गळाल्यासारखे वाटते? आमच्या मनोरंजनामुळे अशा प्रकारचा प्रासंगिक किंवा नेहमी परिणाम होत असला तर ते खरोखरीच योग्य व समतोल आहे का?—पडताळा नीतिसूत्रें २६:१७-१९.
११. आमच्या मनोरंजनाच्या प्रकाराची आम्ही उजळणी करणे हे का योग्य आहे?
११ याचप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीच्या मनारंजनाचा उपभोग घेत आहोत त्याची उजळणी करणे हेही चांगले असेल. आम्ही देवाचे सेवक आहोत म्हणून आमचे मनोरंजन योग्यच असेल अशी काही हमी देता येणार नाही. प्रेषित पेत्राने अभिषिक्त ख्रिश्चनांना जे लिहिले ते लक्षात घ्याः “विदेशी लोकांना आवडणारी कर्मे करण्यात म्हणजे, कामासक्ति, विषयवासना, मद्यासक्ति, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तिपूजा यात राहण्यात जितका काळ गेला, तितका पुरे.” (१ पेत्र ४:३) येथे तो जगातील लोक ज्या गोष्टी आचरीत होते त्याच गोष्टींचे आचरण त्याचे बांधव करीत होते या अर्थी तो त्यांच्याकडे अंगूली दाखवीत नव्हता. तथापि, ख्रिश्चनांनी (त्यावेळी तसेच आताही) सावध राहण्याची गरज आहे; कारण घातक मनोरंजनापुढे एखादा सहजपणे भक्ष्य बनू शकतो.—१ पेत्र १:२; २:१; ४:७; २ पेत्र २:१३.
पाशांच्या बाबतीत सावध असा
१२. पहिले पेत्र ४:३ कोणत्या प्रकारच्या पाशाला ठळकपणे सामोरे मांडते?
१२ आम्ही कोणत्या प्रकारच्या पाशांबद्दल सावध असण्यास हवे? पेत्राने म्हटले की, “विषयवासना, मद्यासक्ति, रंगेलपणा.” येथे वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दांचे स्पष्टीकरण देताना एक जर्मन भाष्यकार म्हणतात की, ते “मुख्यत्वे जेवणावळीच्या सामाजिकरित्या होणाऱ्या मद्यपानाला अनुलक्षून आहे.” एका स्विडीश प्राध्यापकाने म्हटले की, अशा प्रकारचे मेळावे त्या काळी सर्वसाधारण होते. ते पुढे म्हणतातः “ते वर्णन व्यवस्था आखण्यात आलेल्या मेळाव्यांसाठी किंवा नियमित भेटणाऱ्या गटांसाठी, जे वर देण्यात आलेल्या लज्जास्पद गोष्टी आचरीत, अशांसाठी अनुलक्षून असावेत.”
१३. मेळाव्याच्या ठिकाणी मद्यपान हे कशाप्रकारे पाश बनले आहे? (यशया ५:११, १२)
१३ मोठ्या सामाजिक मेळाव्यात मद्यपानाने पुष्कळांना पाशात पाडले आहे. पवित्र शास्त्र अशा पेयांचा माफक उपयोग करण्यास बंदी घालते असे नाही, ते घालत नाही. याचा पुरावा हा आहे की, येशूने काना गावी पाण्याचा द्राक्षारस केला. तेथे कोणी सारखेच पीत राहिले नसावे; कारण मद्यप्यांच्या जवळ उभे राहू नये अशा देवाच्या कायद्याला येशूने अशावेळी नक्कीच उंचावून धरले असते. (नीतिसूत्रें २३:२०, २१) पण हे वर्णन लक्षात घ्याः त्या जेवणावळीच्या कारभाऱ्याने हे म्हटले की, इतर लग्नाच्या मेजवानीत चांगला द्राक्षारस प्रथम देतात, आणि ‘लोक यथेच्छ प्याल्यावर मग नीरस वाढतात.’ (योहान २:१०) यास्तव, जेथे मुबलक द्राक्षारस उपलब्ध होता अशा ठिकाणी भरपूर पीत राहणे हे यहूद्यांसाठी सर्वसाधारण होते.
१४. मद्याची पेये जो पाश आणतात तो टाळण्यासाठी एखाद्या ख्रिस्ती यजमानास काय करता येईल?
१४ या कारणामुळेच काही ख्रिस्ती यजमानांनी पाहुणे किती प्रमाणात मद्य घेतील वा त्यांना दिले जाईल याची स्वतः देखरेख करून आपल्या मेळाव्यात द्राक्षारस, बीअर व इतर मद्यप्राशने ठेवली. वर नमूद केल्याइतका मोठा मेळावा असेल व त्यावर यजमानांना थेट नियंत्रण ठेवता येत नसेल तर तेथे मद्य घेण्याचे प्रमाण हे एक पाश बनू शकते. पिण्याची सवय असलेल्या पण आता त्यावर मात केलेला कोणीतरी तेथे आलेला असेल. त्यामुळे मद्य घेण्यासाठी मोकळा असणारा अनिर्बंधित प्रवेश हा त्याला अधिक मद्यप्राशन करण्यात आणि तो प्रसंग बिघडवून टाकण्यात मोह घालू शकतो. जर्मनीत देखरेखा असलेला एक पिता म्हणतो की, आपल्या सह विश्वासूंच्या सामाजिक मेळाव्यात त्याच्या कुटुंबाला आनंद मिळतो. त्यांनी पुढे म्हटले की, बीअर मोकळेपणाने पिऊ दिल्यास समस्या उद्भवण्याची अधिक शक्यता होते.
१५. सामाजिक मेळाव्यामध्ये योग्य मार्गदर्शन कसे साध्य केले जाऊ शकते?
१५ काना येथील लग्नात “जेवण कारभारी” होता. (योहान २:८) याचा अर्थ, एखाद्या कुटुंबाने आपल्या घरी एका गटाला जेवणासाठी किंवा सहवासाच्या आनंदासाठी निमंत्रित केले असल्यास तेथे कारभारी असलाच पाहिजे असे नाही. त्या प्रसंगी घरातील पती देखरेख ठेवतील. तथापि, तो गट केवळ दोन कुटुंबाचा किंवा त्यापेक्षा मोठा असो, तेथे जे काही घडत आहे त्याची काळजी घेणारा कोणीतरी आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. हीच गोष्ट पुष्कळ पालक, त्यांच्या मुलाला किंवा मुलीला दुसरीकडे आमंत्रण मिळते अशावेळी तपासून बघतात. ते यजमानांना भेटून त्या प्रसंगी कोण देखरेख ठेवील, शेवटपर्यंत कोणकोण राहतील याची माहिती मिळवतात. ख्रिस्ती पालकांनी आपल्या कामाच्या आराखड्यात बदल करून घेऊन ते या प्रसंगाला उपस्थित राहिले आहेत व यामुळे वयस्क तसेच तरुणांना एक सामायिक सहवास मिळू शकला.
१६. मेळाव्यातील उपस्थितीचा आकार केवढा राहावा याबद्दल कोणते विचार योग्य ठरतील?
१६ वॉचटावर संस्थेचे कॅनडातील शाखा दप्तर लिहितेः “सामाजिक मेळाव्याचा आकार मर्यादित ठेवावा याबद्दलच्या सूचनेचा काही वडीलांनी असा अर्थ घेतला आहे की, लग्नाच्या स्वागत समारंभाच्या वेळी जी प्रचंड उपस्थिती दिसते ती या सूचनेचा भंग करणारी आहे. त्यांनी म्हटले की, आपण मेळाव्यातील उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी अशी आपल्याला सूचना आहे तर मग, लग्नप्रसंगी २०० ते ३०० लोकांची उपस्थिती देखील चुकीची आहे.”a या मेळाव्यातील संख्या किती असावी यावर अधिक भर देण्यापेक्षा ती कितीही असली तरी देखरेखीकडे योग्य लक्ष दिले जाण्यास हवे हे महत्त्वाचे आहे. येशूने काना येथील लग्नात जो द्राक्षारस पुरविला तो, तेथे खूप माणसे आलेली होती असे दाखवतो, पण त्या सर्वांवर योग्य प्रकारची देखरेख ठेवण्यात आली होती. ही उपस्थिती जितकी अधिक तितकी आव्हानात्मक ठरते; कारण विपर्यास करण्याचा कल असलेल्या अशक्त लोकांना मोठी मोकळीक मिळत असते. जेथे काही देखरेख नसते अशा ठिकाणी ते प्रश्नार्थक हालचाली घडवून आणू शकतात.—१ करिंथकर १०:६-८.
१७. एखादा मेळावा आयोजित केला जातो तेव्हा ख्रिस्ती समतोल कसा दाखवला जाऊ शकतो?
१७ सामाजिक मेळाव्यातील सुंदर देखरेखीमध्ये त्याची योजना व तयारी यांचाही विषय येतो. याचा हा अर्थ नाही की, जगातील रिवाजाप्रमाणे आपणही काही करून दाखवावे की, ज्यामुळे त्या गोष्टी चट्कन लक्षात राहू शकतील. काही समारंभात मुखवटा घालून नाच करण्याचे प्रकार आयोजित असतात. वचनयुक्त देशात राहणाऱ्या विश्वासू इस्राएलांना मिसर किंवा इतर मूर्तिपूजक देशातील लोकांसारखे कपडे घालून आपला मेळावा भरवावा असे वाटल्याची कल्पना तुम्ही कधी करू शकाल का? तेथे ते विषयासक्त नृत्य तसेच मूर्तिपूजकांमध्ये प्रचलित असणारे हिनकस संगीत ठेवतील का? मागे ते सिनाय डोंगरापाशी असताना त्या काळी मिसरात प्रसिद्ध असणाऱ्या संगीतात व नाचात गुरफटले होते. अशा या मनोरंजनाबद्दल देवाला तसेच त्याच्या प्रौढ सेवकाला, मोशेला, काय वाटले होते ते आपणास माहीत आहे. (निर्गम ३२:५, ६, १७-१९) या कारणास्वत सामाजिक मेळाव्याच्या यजमानाने किंवा देखरेख्याने या प्रसंगी संगीत व नृत्य असेल काय हे आधी ठरवले पाहिजे. असेल तर ते ख्रिस्ती तत्त्वांशी सुसंगत आहे याची खात्री केली पाहिजे.—२ करिंथकर ६:३.
१८, १९. येशूला एका लग्नात आमंत्रित करण्यात आले होते यापासून आपल्याला कोणती अंतर्दृष्टि मिळते, आणि याचा अवलंब आपल्याला कसा करता येईल?
१८ शेवटी, “येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते” याचे आपल्याला स्मरण येते. (योहान २:२) हे मानता येईल की, कधी कधी एखादा ख्रिस्ती मनुष्य किंवा एखादे कुटुंब इतरांना सहज भेट देऊन उभारणीकारक वेळ घालवील. तथापि, योजना केलेल्या सामाजिक मेळाव्याबद्दल अनुभव असे दाखवतो की, तेथे कोण कोण येतील हे आधीच ठरवल्यामुळे समस्यांना आळा बसतो. याचे महत्त्व अमेरिकेमधील टेनिसी येथील एक वडील, ज्यांनी आपल्या मुलांची व मुलींची वाढ, त्यांनी पूर्ण वेळेच्या सेवेमध्ये जाईपर्यंत केली आहे, त्यांनी बोलून दाखवले आहे. ते म्हणतात की, ते किंवा त्यांची बायको एखाद्या मेळाव्याला जाण्याआधी तसेच त्यांच्या मुलांना कोठे पाठवण्याआधी ते यजमानांना भेटून कोणकोणत्या निमंत्रितांना तेथे बोलावले आहे याची खात्री करून घेतात. यामुळे त्यांच्या कुटुंबाला, सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या मेळाव्यात, मग ते एखादे जेवण, सहल किंवा चेंडूचा खेळ याप्रकारातील असो, त्यामध्ये काहींना जडलेल्या पाशांचा संसर्ग लागला नाही.
१९ येशूने आपल्या नातेवाईकांना, जुन्या मित्रांना किंवा आपल्याच वयाच्या व आर्थिक परिस्थितीतील लोकांनाच केवळ निमंत्रण देण्याबद्दल शिफारस दिली नाही. (लूक १४:१२-१४; पडताळा ईयोब ३१:१६-१९; प्रे. कृत्ये २०:७-९) तुम्ही ज्यांना निमंत्रण देणार अशांची काळजीपूर्वक निवड केल्यास त्यामध्ये विविध वयाच्या आणि परिस्थितीतील ख्रिश्चनांना समाविष्ट करण्याचे सोपे जाईल. (रोमकर १२:१३; इब्रीयांस १३:२) यापैकीचे काही आध्यात्मिकरित्या सबळ नसतील किंवा नवे असतील, अशांना प्रौढ ख्रिश्चनांच्या सहवासामुळे लाभ घडू शकतो.—नीतिसूत्रें २७:१७.
मनोरंजनाला त्याची जागा देणे
२०, २१. आमच्या जीवनात मनोरंजनाला योग्य स्थान का आहे?
२० आम्ही देवभिरू लोकांनी आमच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाबद्दल आस्थेवाईक असणे, तो कार्यक्रम योग्य आहे याची चिंता करणे आणि त्याबद्दल केवढा वेळ देत आहोत याबद्दल समतोल राहणे हे योग्य आहे. (इफिसकर २:१-४; ५:१५-२०) उपदेशकाच्या प्रेरित लेखकालाही असे वाटले होतेः “मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही. देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे, त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.” (उपदेशक ८:१५) असा हा समतोल आनंद शरीरास उत्साही करतो व सध्याच्या जगात ज्या समस्या व चिंता सर्वसाधारण आहेत त्यांना घालवतो.
२१ याचे एक उदाहरण म्हणून एका ऑस्ट्रीयन पायनियर सेविकेने तिच्या जुन्या मैत्रिणीला जे लिहिले ते विचारात घेऊ याः “आमची त्या दिवशी चांगली सहल झाली. फरलॅक या छोट्याशा गावी आम्ही साधारण ५० लोक गेलो होतो. ब्रदर बी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या मोटारीत तीन शेगड्या, दुमडणाऱ्या खुर्च्या, टेबल व टेबल-टेनिसचे टेबलही घेतले. आम्हाला खूप आनंद मिळाला. एका भगिनीने बाजाची पेटी आणली होती; त्यामुळे आम्हाला राज्याची खूप गाणी गाता आली. सर्व थरातील व वयोमानातील बंधूभगिनींना एकमेकांचा सहवास आवडला.” तिला, चांगल्या रितीने देखरेख केलेल्या आणि मद्याने धुंद होणाऱ्या तसेच स्वैराचार यापासून मुक्त असणाऱ्या अशा करमणूकीची दीर्घकाळ आठवण येत होती.—याकोब ३:१७, १८.
२२. सामाजिक मनोरंजनाचा आनंद घेताना, आमच्या विचारसरणीत कोणती सूचना आम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवावी?
२२ अपूर्ण शरीराच्या इच्छांना बळी पडू नये व मोहपाशासाठी स्वतःला उघडपणे देणाऱ्या योजनांत गुरफटू नये अशी पौलाने आर्जवाची विनंती केली. (रोमकर १३:११-१४) यात सामाजिक मनोरंजनाचा विषयही येतो. आम्ही पौलाच्या सूचनांचा अवलंब येथे केल्यास आध्यात्मिक नुकसान करणाऱ्या प्रसंगांना आम्ही टाळू शकू. (लूक २१:३४-३६; १ तीमथ्य १:१९) उलटपक्षी, आपण देवाशी आमच्या नातेसंबंधास बळकट करणाऱ्या हितकारी मनोरंजनाचीच निवड करू. अशाप्रकारे आपण अशा सामाजिक मनोरंजनाकडून लाभ मिळवू शकू, ज्याला आपल्याला ते देवाकडील एक देणगी आहे असे म्हणता येईल.—उपदेशक ५:१८.
[तळटीपा]
a एप्रिल १५, १९८४ च्या द वॉचटावरने लग्न व लग्नाची जेवणावळ याबद्दल समतोल सल्ला दिलेला आहे. भावी वधूवराने व त्यांना मदत देणाऱ्या लोकांनी लग्नविषयक योजना व व्यवस्था आखण्याआधी ह्या साहित्याची लाभदायक रितीने उजळणी करावी
आपण काय शिकलो?
◻ सामाजिक मनोरंजनाचा अनुभव घेण्याच्या बाबतीत कोणता समतोल दृष्टिकोण आपल्याला पवित्र शास्त्रात आढळतो?
◻ करमणूकीचा प्रकार व त्याची वेळ याबद्दल का विचार केला जाण्यास हवा?
◻ पाशापासून सुरक्षित राहण्यासाठी एखाद्या ख्रिस्ती यजमानाला काय करता येईल?
◻ मनोरंजन योग्य व समतोल प्रकारातील असले तर ते ख्रिस्तीजनांसाठी काय साध्य करू शकते?
[२७ पानांवरील चित्रं]
एखाद्या मेळाव्यात निमंत्रित कसल्याही पाशात अडकत नाहीत हे पाहण्याची जबाबदारी यजमानांवर किंवा तेथील कारभाऱ्यावर असते