पाहुणचार करण्याद्वारे इतरांना “चांगल्या गोष्टी” द्या (मत्त. १२:३५क, पं.र.भा.)
“आतिथ्य” करून किंवा पाहुणचार दाखवून इतरांना “चांगल्या गोष्टी” दिल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं. (रोम. १२:१३) मंडळीत येणाऱ्या पाहुण्या वक्त्याच्या जेवणाची व गाडीखर्चाची व्यवस्था करण्यात वडील सहसा पुढाकार घेतात. ‘आपली परिस्थिती इतकी काही चांगली नाही’ किंवा मग ‘आपलं घर इतकं काही चांगलं नाही,’ असा विचार करून कदाचित आपण पाहुणचार दाखवायला मागं-पुढं पाहू. अशा वेळी, येशूनं मार्थाला जो सल्ला दिला तो आपण आठवू शकतो. (लूक १०:३९-४२) पाहुणचारातील “चांगला वाटा” किंवा मुख्य गोष्ट म्हणजे, पंचपक्वान्नांचं जेवण किंवा छान सजवलेलं घर नव्हे तर एकमेकांसोबत घालवला जाणारा वेळ व एकमेकांना दिलेलं उत्तेजन ही आहे, असं येशूनं सांगितलं. या सल्ल्याचं पालन करून आपल्यालाही देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणं बांधवांना “चांगल्या गोष्टी” देता येतील.—३ योहा. ५-८.