घोषणा
◼ साहित्य सादरता
सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी प्रायत्न केले पाहिजेत.
ऑक्टोबर: अवेक! किंवा टेहळणी बुरूज यांची वर्गणी. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी व पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी नाही.
नोव्हेंबर: शक्य असेल तेथे, द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स? या पुस्तकासह न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स ७५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जावे. पर्याय म्हणून, मॅनकाईंड्स सर्च फॉर गॉड हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जावे. घरमालकांना इंग्रजी समजत नसेल तेथे आमची राज्य सेवा यात आधी दिलेल्या खास सादरतेची पुस्तके म्हणून १९२ पृष्ठांच्या पुस्तकांपैकी कोणतेही एक ८.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. आमच्याजवळ अद्यापही उपलब्ध असलेल्या या प्राकारातील खालील पुस्तकांच्या यादीसाठी ऑगस्ट १९९५ ची आमची राज्य सेवा यातील घोषणा हा रकाना पाहा. विशिष्ट भाषांमध्ये या प्राकारातील पुस्तके आमच्याजवळ उपलब्ध नसल्याने बंगाली किंवा पंजाबी जाणणाऱ्या व्यक्तींना आपल्या समस्या अथवा “पहा!” ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात आणि नेपाळी जाणणाऱ्यांना जीवनाचा आनंद हे माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. मल्याळम भाषेत प्राकाशन हवे असणाऱ्या लोकांना युवर युथ—गेटींग द बेस्ट आऊट ऑफ इट! हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. कृपया याची नोंद घ्यावी की हे पुस्तक खास दरात सादर केले जाऊ नये.
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात. आळीपाळीने, माय बुक ऑफ बायबल स्टोरिझ किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक त्याच अनुदानात सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांना).
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-AB-14) यावर पाठवावी.
◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या कोणा एकाने सप्टेंबर १ रोजी किंवा होता होईल तितक्या लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे पूर्ण झाल्यावर मंडळीमध्ये याची घोषणा करावी.
◼ ऑक्टोबरमध्ये साहाय्यक पायनियरींग करू इच्छिणाऱ्या प्राचारकांनी त्यांचा अर्ज लवकर पाठवावा. यामुळे वडिलांना प्राकाशनांची आणि क्षेत्राची आवश्यक योजना करता येईल.
◼ कोणतीही बहिष्कृत व्यक्ती किंवा स्वतःला अलिप्त करून घेतलेली व्यक्ती परत येऊ इच्छिते त्यासंबंधाने एप्रिल १५, १९९१ वॉचटावरच्या पृष्ठे २१-३ वरील सूचनांचे पालन वडिलांनी करावे याची त्यांना आठवण करून देण्यात येत आहे.
◼ पुणे येथील “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनाच्या मुख्यालयाचा पत्ता आता बदलला आहे: श्री. पी. सूर्यवंशी, फ्लॅट एफ-२८, पिंपळे अपार्टमेंट्स, पोस्ट ऑफिसजवळ, कासरवाडी, पुणे, महा. ४११०३४.