वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९५ पृ. १
  • शाळेतील ख्रिस्ती वर्तणूक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शाळेतील ख्रिस्ती वर्तणूक
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिकरित्या बलवान व्हा आणि यहोवाच्या सेवेसाठी शुद्ध असा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ख्रिस्ती तरुणांनो विश्‍वासात दृढ राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • तुमचा विश्‍वास मजबूत असेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ८/९५ पृ. १

शाळेतील ख्रिस्ती वर्तणूक

१ तुम्ही अद्यापही शाळकरी ख्रिस्ती युवक आहात, तर तुम्हाला तुमचे सत्त्व टिकवून ठेवण्यास मजबूत विश्‍वासाची आवश्‍यकता आहे. तुम्ही कुसंगतीत तसेच तुमच्या विश्‍वासाची परीक्षा घेतली जाऊ शकते अशा परिस्थितींच्या संपर्कात आहात. तेव्हा, “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, . . . त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे,” हा पेत्राचा सल्ला तुम्ही लागू करावा हे महत्त्वाचे आहे. (१ पेत्र २:१२) ह्‍या आव्हानाला तोंड देण्यास तुम्हाला धैर्याची व दृढनिश्‍चयाची गरज आहे.

२ शाळेत किंवा बाहेर, विवाहापूर्वीचे लैंगिक संबंध, अश्‍लील भाषा, तंबाखू व मादक औषधांचा दुरूपयोग यांच्या दूषित करणाऱ्‍या प्राभावांचा भडिमार तुम्हावर होत असतो. तुमच्या चांगल्या वर्तणुकीच्या पूर्वेतिहासाला धोका संभावणाऱ्‍या पाशांना तुम्ही दररोज सामोरे जात असता. तुम्हाला अशा परीक्षांना तोंड द्यावयाचे आहे, तर प्रौढांप्रामाणे तुम्ही ‘विश्‍वास राखण्यास फार झटले पाहिजे.’—यहू. ३; जुलै १५, १९९१, वॉचटावर, पृष्ठे २३-६ पाहा.

३ शाळेमध्ये, देशभक्‍तीचे समारंभ व जगिक सुट्या असतात. तुमच्या शाळेत कोणत्या राष्ट्रीय व धार्मिक सुट्या पाळल्या जातात हे तुम्हाला ठाऊक आहे का? आव्हानात्मक परिस्थिती उद्‌भवते तेव्हा, “तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्‍यांनी लज्जित व्हावे” ह्‍यासाठी तुम्ही ‘चांगला विवेकभाव’ राखू शकता का?—१ पेत्र ३:१६.

४ तुम्हाला कदाचित, शाळेचे खेळ किंवा सामाजिक मेळावे यांच्या आकर्षणाचा मोह वाटेल. या सुखकर वाटणाऱ्‍या कार्यहालचाली तुमच्या विश्‍वासासोबत कशी हातमिळवणी करू शकतात हे ओळखण्यास तुम्ही दक्ष असले पाहिजे. तुम्ही ज्यांच्यासोबत ‘उत्तेजनाची देवाणघेवाण’ करू शकता असे सोबती निवडण्याची गरज आहे. अशा प्राकारे प्रात्येक जण एकमेकांच्या विश्‍वासाने उभारला जाईल.—रोम. १:१२.

५ यहोवाच्या मदतीने तुम्ही टिकून राहू शकता: सैतान निरंतर तुमच्या विश्‍वासाची परीक्षा घेत आहे. तुम्हाला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या परीक्षा कठीण असतील परंतु, मिळणाऱ्‍या प्रातिफळांमुळे हे सर्व सहन करण्यायोग्य बनते. (१ पेत्र १:६, ७) तुम्ही स्वतःच्या जोरावर यशस्वीरित्या तोंड देऊ शकणार नाही; तुम्ही यहोवाकडे मदतीसाठी पाहिले पाहिजे. येशूने त्याच्या शिष्यांना आर्जवले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्त. २६:४१) शिस्त व आत्म-संयम अत्यावश्‍यक आहेत.—१ करिंथ. ९:२७.

६ तुमच्या वर्तणुकीबद्दल तुम्ही यहोवाला जबाबदार आहात हे नेहमी लक्षात ठेवा. (उप. ११:९) तुमच्या कृत्यांचे निरीक्षण इतर करत नसले, तरी तुम्ही काय करता याविषयी यहोवाला ठाऊक आहे व तो तुमचा न्याय करील. (इत्त्वी. ४:१३) त्याला खूष करण्याच्या प्रामाणिक इच्छेने तुम्हाला “भीत व कापत आपले तारण साधून” घेण्यास प्रावृत्त केले पाहिजे. (फिलिप्पै. २:१२) देवाचे वचन दररोज वाचणे फार मदतीचे आहे. ते अनुकरण करण्याजोगा सर्वोत्तम सल्ला व उत्तम उदाहरणे यांनी ओतप्रोत भरलेले आहे.—इत्त्वी. १२:१-३.

७ पालकहो, तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावता. तुम्हाला तुमच्या मुलांवर देखरेख करण्याची, ते सामना करत असलेल्या समस्या जाणण्याची व आवश्‍यकता भासते त्यावेळी मदत पुरवण्याची गरज आहे. तुमच्या मुलांसोबत तुमचा सलगीचा संबंध आहे का? देवाच्या नियमांची व तत्त्वांची कृतज्ञतापूर्वक समज तुम्ही त्यांच्यामध्ये रुजवली आहे का? दबावांना व मोहपाशांना तोंड द्यावे लागते तेव्हा, तुमची मुले खंबीर असतात की पटकन माघार घेतात? समवयस्कांपेक्षा वेगळे राहावे लागत असल्यामुळे ते निरुत्साहित होतात का? पालक या नात्याने, त्यांना मदत करण्याची तुमची जबाबदारी आहे. (अनु. ६:६, ७) तुम्ही आपले काम चांगल्यारितीने पार पाडले, तर त्यांना विश्‍वासाचा लढा देण्यामध्ये विजयी होण्यास मदत करू शकता.—नीति. २२:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा