वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९५ पृ. १
  • तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • तुमची ‘वाट पाहत राहण्याची’ वृत्ती आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • स्वतःला ‘निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत’ राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • “तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • ईश्‍वरी भक्‍तीविषयी येशूचे उदाहरण अनुसरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ८/९५ पृ. १

तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?

१ सर्व मानवजातीने जाब देण्याचा समय जवळ येत आहे. बायबल त्यास “देवाचा [यहोवा, NW] दिवस” म्हणते. तो वाईटांविरुद्ध ईश्‍वारी न्यायदंड बजावण्याचा समय आहे; त्याचप्रामाणे नीतिमानांकरता मुक्‍ततेचा समय देखील आहे. त्या वेळी जिवंत असणाऱ्‍या सर्वांकडून त्यांनी आपले जीवन कसे व्यतीत केले याचा जाब घेतला जाईल. ते लक्षात ठेवून, “तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे”? असा वेधक प्राश्‍न पेत्र विचारतो. तो ‘पवित्र वर्तणूक, ईश्‍वारी भक्‍ती व यहोवाचा दिवस लक्षात ठेवण्याच्या’ महत्त्वावर तसेच ‘निष्कलंक, निर्दोष व शांतीत असण्याच्या’ गरजेवर जोर देतो.—२ पेत्र ३:११-१४.

२ पवित्र वर्तणूक व ईश्‍वारी भक्‍ती: पवित्र वर्तणुकीत, बायबलच्या तत्त्वांना आदर देणाऱ्‍या उदाहरणीय कृत्यांचा समावेश होतो. (तीत २:७, ८) ख्रिश्‍चनाने, स्वार्थी, देहवासनेने प्रावृत्त होणारी जगिक वर्तणूक टाळली पाहिजे.—रोम. १३:११, १४.

३ ‘ईश्‍वारी भक्‍तीचे’ वर्णन “देवाच्या अपीलकारक गुणांबद्दल सखोल गुणग्राहकता असल्यामुळे, अंतःकरणातून निर्माण होणारी देवासोबतची वैयक्‍तिक सलगी” असे केले जाते. हा गुण प्रादर्शित करण्याचा उल्लेखनीय मार्ग आपल्या सेवेमधील आवेश आहे. प्राचार करण्याचा आपला हेतू, केवळ कर्तव्याची समज असण्याच्याही पलीकडे जातो; तो यहोवाबद्दल खोल रुजलेल्या प्रोमामुळे निर्माण होतो. (मार्क १२:२९, ३०) अशा प्रोमाने प्रावृत्त झाल्यामुळे आपण ईश्‍वारी भक्‍तीचे अर्थपूर्ण वक्‍तव्य या दृष्टिकोनातून आपल्या सेवकपणाकडे पाहतो. आपली भक्‍ती नित्य असली पाहिजे म्हणून, प्राचारकार्यात आपला निरंतर सहभाग असावयास हवा. तो आपल्या साप्ताहिक कार्यहालचालींच्या आराखड्याचा आवश्‍यक भाग असला पाहिजे.—इत्त्वी. १३:१५.

४ यहोवाचा दिवस ‘लक्षात ठेवण्याचा’ अर्थ आपल्या दररोजच्या विचारांमध्ये त्याला प्राधान स्थान देणे व त्यास सर्व गोष्टींच्या मागे टाकून क्षुल्लक स्थान न देणे होय. आपल्या जीवनात राज्य आस्थेला प्राथम स्थान देणे असा त्याचा अर्थ होतो.—मत्त. ६:३३.

५ निष्कलंक, निर्दोष व शांतीत असणे: मोठ्या लोकसमुदायाचा भाग या नात्याने, आपण “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले” आहेत. (प्राकटी. ७:१४) मग, “निष्कलंक” असणे म्हणजे, जगातील अशुद्धता आपल्या शुद्ध, समर्पित जीवनांवर छिडकली जाण्याविरुद्ध आपण खंबीरतेने सावध राहिले पाहिजे. आपले ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व, अभक्‍त, भौतिक ध्येयांकरवी विरूप होऊ देण्यास नकार देऊन आपण स्वतःला “निर्दोष” राखतो. (याको. १:२७; १ योहा. २:१५-१७) आपण इतरांशी करत असलेल्या सर्व व्यवहारामध्ये ‘देवाची शांती’ प्रातिबिंबित करून स्वतः ‘शांतीत’ असल्याचे दाखवतो.—फिलिप्पै. ४:७; रोम. १२:१८; १४:१९.

६ आपण जगिक प्रादूषणापासून यशस्वीरित्या सावध राहिल्यास, यहोवाने धिक्कारलेल्या ‘ह्‍या युगाबरोबर कधीही समरूप होणार नाही.’ त्याउलट, आपली चांगली कृत्ये इतरांना “देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा” यांच्यातील भेद पाहण्यास मदत करतील.—रोम. १२:२; मला. ३:१८.

७ यहोवा, विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी आपल्याला निरंतर तजेलादायक आध्यात्मिक अन्‍ना पुरवत राहतो व ते अन्‍ना ईश्‍वारी भक्‍ती प्रादर्शित करण्याची आपली इच्छा तीव्र करते. अनेक नवोदित ही इच्छा बाळगतात. ऑगस्ट दरम्यान क्षेत्र सेवेत त्यांना भाग घेण्यासाठी मदत करण्याद्वारे आपण एक आशीर्वाद ठरू शकतो.

८ आपण जाणीवपूर्वकतेने “सत्कृत्ये” करत राहिलो तर, यहोवाचे नाव महान केले जाते, मंडळी बळकट होते व इतरांना फायदा होतो. (१ पेत्र २:१२) आपण नेहमी तशा प्राकारची व्यक्‍ती असू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा