वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९५ पृ. १
  • यहोवा सामर्थ्य देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा सामर्थ्य देतो
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्ता सादरता—प्रार्थनाशील पद्धतीने
    आमची राज्य सेवा—१९९०
  • निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवा सामर्थ्य देतो
    आमची राज्य सेवा—२००१
  • आध्यात्मिकरित्या बलवान व्हा आणि यहोवाच्या सेवेसाठी शुद्ध असा
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ६/९५ पृ. १

यहोवा सामर्थ्य देतो

१ यहोवाचे लोक या नात्याने, आपल्याला “परराष्ट्रीयांत” आपले आचरण “चांगले” ठेवून, सुवार्तेचा प्राचार करण्याची नेमणूक देण्यात आली आहे. (१ पेत्र २:१२; मत्त. २४:१४) कठीण दिवस तसेच आपल्या स्वतःच्या कमतरता व चूका यांना लक्षात घेता, आपल्याला हे कार्य स्वतःच्या शक्‍तीवर कधीच साध्य करता आले नसते. (२ तीम. ३:१-५) आपण यहोवाकडे मदतीसाठी पाहू शकतो ही गोष्ट आपल्याकरता किती आनंदाची आहे!

२ प्रोषित पौलाने पुष्कळ संकटे सहन केली. (२ करिंथ. ११:२३-२७) तो यांना तोंड देऊन त्याचे नेमलेले कार्य कसे पूर्ण करू शकला? यहोवाने त्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले. (२ करिंथ. ४:७) “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे,” असे पौलाने लिहिले तेव्हा त्याने ईश्‍वारी मदत कबूल केली. (फिलिप्पै. ४:१३) यहोवा आपल्यालाही त्याचप्राकारे मदत करील. आपण हे साहाय्य कसे मिळवू शकतो?

३ निरंतर प्रार्थना केल्याने: येशूने आपल्याला हार न मानता, ‘मागत राहण्यास, शोधत राहण्यास व ठोकत राहण्यास’ आर्जवले. (लूक ११:५-१०) प्रार्थना करीत राहिल्याने, आपली मोठी चिंता, तीव्र इच्छा व खरा हेतू आहे हे यहोवाला दाखवले जाते. (स्तोत्र ५५:१७; ८८:१, १३; रोम. १:९-११) पौलाने आपल्याला “निरंतर प्रार्थना” करण्यास आर्जवले तेव्हा त्याने प्रार्थना करीत राहण्याचे महत्त्व ओळखले. (१ थेस्सलनी. ५:१७) यहोवाची मदत मिळवण्याच्या अनेक मार्गांपैकी एक प्रामुख मार्ग प्रार्थना आहे.

४ ईश्‍वारशासित निर्देशन अनुसरल्याने: “ईश्‍वारकृत” म्हणजे प्रीती असणाऱ्‍या “देवाचे शासन.” मोठ्या तसेच लहान बाबींमध्ये त्याच्या अधिकाराचा स्वीकार केल्याने व त्याच्या सूचना अनुसरल्याने आपल्याला त्याच्या शासनाचा लाभ होतो. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ पृथ्वीवरील ईश्‍वारशासित आधिपत्याचे प्रातिनिधीत्व करतो. (मत्त. २४:४५-४७) आपल्याला यहोवाचा आशीर्वाद मिळवावयाचा असल्यास, “दास” ज्या संघटनेचा उपयोग करत आहे तिला सहकार्य देणे महत्त्वाचे आहे. (पडताळा इत्त्वीयांस १३:१७.) उचित वेळी आवश्‍यक सामर्थ्य पुरवून, यहोवाला दाखवलेली निष्ठा व त्याचे नियम पाळण्याची आपली स्वेच्छा यांना तो प्रातिफळ देईल.—इत्त्वी. ४:१६.

५ आपल्या बांधवांच्या समीप असल्याने: प्रीती ही येशूच्या शिष्यांचे ओळख चिन्ह आहे. (योहा. १३:३४, ३५) व्यक्‍तिमत्त्वांमध्ये विविधता असून, वैयक्‍तिक भिन्‍नातेमुळे आपल्यामध्ये खटके उडू शकतात. आपण कनवाळू असले पाहिजे व एकमेकांना क्षमा केली पाहिजे. (इफिस. ४:३२) यामुळे ख्रिस्ती विश्‍वासातील आपल्या बांधवांच्या समीप राहण्यास व संकटात ते खंबीरतेने टिकून राहतात त्याकरवी उत्तेजित होण्यास शक्य होते. ‘जगातील आपल्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत, हे माहीत असल्याने,’ आपल्याजवळ अशाच दबावांचा सामना करावयास देवाने दिलेले सामर्थ्य आहे.—१ पेत्र ५:९.

६ व्यक्‍तिगत अभ्यासाचा नित्यक्रम राखल्याने: आध्यात्मिकरित्या आपले मन व अंतःकरण बळकट केल्याने आपल्याला सैतानाचा हल्ला चुकवण्यास मदत मिळते. (१ पेत्र ५:८) व्यक्‍तिगत अभ्यासाचा चांगला नित्यक्रम, आपल्या ईश्‍वारी ज्ञानाचा साठा वाढवील. दररोजच्या आव्हानांना तोंड देत असताना आपण यातून लाभ मिळवू शकतो. पौलाने जोर देऊन सांगितले, की तारण प्राप्त करण्यात ‘परिपूर्ण ज्ञान’ अत्यावश्‍यक भूमिका पार पाडते. (१ तीम. २:३, ४) नियमितपणे आध्यात्मिक अन्‍ना घेणे आवश्‍यक आहे.

७ आपल्याला मजबूत होण्यास मदत देणाऱ्‍या सर्व तरतूदी ख्रिस्ती मंडळीद्वारे उपलब्ध आहेत. तिच्या कार्यांना संपूर्ण अंतःकरणाने पाठिंबा दिल्यास, आपण ‘चाललो तरी थकणार नाही’ याची आपल्याला हमी मिळेल.—यश. ४०:२९-३१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा