मुक्तता करणारे चिन्ह
१ यहोवा त्याचा धार्मिक न्यायदंड बजावण्यापूर्वी नेहमीच चेतावणी देतो आणि नम्र लोकांना सुटकेचा मार्ग पुरवतो. यहेज्केलच्या दिवसांमध्ये, होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करणारे लोक होते. यहोवाने अशा पात्र लोकांना सुटकेसाठी चिन्हांकित केले आहे. (यहे. ९:४-६) आपल्या आजच्या प्राचार कार्याद्वारे हाच हेतू साध्य केला जातो. आपण एक प्रामुख भूमिका पार पाडू शकतो.
२ प्रामाणिक लोकांचा शोध घेणे हे केवळ पहिले पाऊल आहे. आपण पुनर्भेटीची तयारी करतो. पहिल्या भेटीतील सादरता आणि चर्चा करण्यात आलेला विषय यांना लक्षात ठेवून पुनर्भेटीची तयारी केली जाते. आपण परत जातो तेव्हा जे बोलण्यास व करण्यास तयार असतो त्यावर आपल्या नंतरच्या पुनर्भेटीचे यश अधिककरून अवलंबून असेल.
३ “टेहळणी बुरूज” सादर केल्यानंतर परत जाता तेव्हा तुम्ही त्याच्या मुख्य शीर्षकावर लक्ष केंद्रित करू शकता:
▪ “टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरील ‘यहोवाच्या राज्याचा प्राकाशक’ या विधानाकडे लक्ष द्या. देवाचे राज्य जगाच्या समस्यांचे एकमेव समाधान असल्याची घोषणा हे नियतकालिक करते त्यामुळे ते अनन्य साधारण आहे. देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण होईल तेव्हा देवाचे राज्य काय करील याबद्दल ते वर्णन करते. ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, असे येशूने सांगितले.” मत्तय २४:१४ वाचा आणि टेहळणी बुरूज नियमितपणे प्राप्त करून व्यक्तिगत बायबल अभ्यासासाठी कसे वापरले जाऊ शकते, ते सांगा.
४ कदाचित तुम्हाला बायबलवरच लक्ष केंद्रित करण्यास आणि ते नियमितपणे वाचण्याच्या गरजेवर जोर देण्यास आवडेल. तुम्ही म्हणू शकता:
▪ “असे दिसून येते की, आपण ज्या लोकांना आळखतो असे सर्व लोक सामान्यपणे दररोजच्या जीवनातील समस्या हाताळणाऱ्या व्यावहारिक सल्ल्याची कदर करतील. आपण विश्वास ठेवू शकतो असा सल्ला आपल्याला कोठे मिळू शकतो? [प्रातिसादासाठी वाव द्या.] मित्रांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांची किंवा पेशेवाईक सल्ल्यासाठी किंमत मोजणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. त्याउलट, ज्यावर विश्वास ठेवू शकतो असा योग्य सल्ल्याचा एकमेव उगम बायबल असल्याचे लाखो लोकांना आढळून आले आहे. आपल्या एखाद्या समस्येला कसे तोंड द्यावे याविषयी बायबल मार्गदर्शन करते. [२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.] तुम्हाला बायबलचे आकलन होण्यास कठीण जात असल्यास, तुम्ही बुद्धिमान सल्ल्याच्या कोश-गृहाला कसे उघडू शकता, हे दाखवण्याची मला मुभा द्या.” त्यानंतर तुम्ही न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या मागील बाजूस असणाऱ्या “निर्देशांकित बायबल शब्द” यातील “प्रीती” या सदराखाली पाहा आणि दुसऱ्यांबरोबर असणारे मतभेद मिटविण्यासाठी प्रीती कशी मदत करू शकते हे दाखविणाऱ्या काही संदर्भांचा उल्लेख करा.
५ बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने “तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल,” या पुस्तकाचा वापर करण्याचे कदाचित तुम्ही निवडाल:
▪ “आपल्या कुटुंबावर आपण प्रोम करतो आणि त्यांना उत्तम गोष्टी मिळाव्यात असे आपल्याला वाटते. अशाप्राकारच्या जगात राहिल्याने तुमच्या कुटुंबाला कसा लाभ मिळेल?” पृष्ठे १५६-७ वरील चित्र दाखवा. या पृष्ठांवर उद्धृत केलेल्या एक किंवा दोन शास्त्रवचनांना वाचा तसेच हे यहोवाचे अभिवचन आहे आणि तो खोटे बोलू शकत नाही, याचे वर्णन करा. पृष्ठे ५-६ वरील प्राकरणांचा संदर्भ घ्या आणि घरमालकाला कोणत्या विषयात सर्वात अधिक आस्था आहे, ते विचारा; त्याने निवडलेले प्राकरण उघडा आणि त्यातील एक किंवा दोन परिच्छेदांवर चर्चा करा.
६ एखाद्याला मुक्ततेकरता चिन्हांकित करण्यासाठी मदत करण्यास तुम्हाला आवडेल का? चांगल्याप्राकारे तयारी करून शोधलेल्या आस्थेवाईकांची लवकरच पुनर्भेट घेतल्याने ‘आपली सेवा पूर्ण करण्यामध्ये’ यश आहे.—२ तीम. ४:५.