सुवार्ता सादरता—प्रार्थनाशील पद्धतीने
१ प्रेषित पौलाने फिलिप्पैकरांना हे प्रोत्साहनपर शब्द लिहिलेः “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तीमान आहे.” (फिलिप्पै. ४:१३) आम्ही देखील धैर्याने आम्हाला सुवार्ता सांगता यावी यासाठी यहोवावर शक्तीकरता पूर्णपणे विसंबून राहण्यास हवे. हे आम्हाला कसे करता येईल?
२ “आम्ही सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये,” ह्याविषयीची गरज येशूने जोरदारपणे सांगितली. (लूक १८:१) पौलाने बोध केलाः “निरंतर प्रार्थना करा.” (१ थेस्स. ५:१७) होय, प्रार्थनेमुळे बळ मिळते. आम्ही सुवार्तेची सादरता देखील प्रार्थनाशीलपणे केली पाहिजे. आम्हाला इतरांना साक्ष देता यावी, घरोघरच्या कार्यात सूज्ञान व समंजसपणा मिळावा यासाठी, तसेच आमच्या पवित्र शास्त्र अभ्यासाच्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणाप्रत पोहंचता यावे म्हणून प्रार्थना करता येईल. शेवट होण्याआधी राज्याची सुवार्ता प्रसारीत करण्याची तातडीची गरज असल्यामुळे जागतिकपणे राज्य आस्थेची वाढ होण्यासाठी देखील आम्ही प्रार्थना केली पाहिजे. (मत्तय २४:१४) आध्यात्मिकरितीने पेंगता येऊ नये तसेच यहोवाच्या उद्देशाविषयी इतरांना बोलण्याविषयीच्या हक्काची रसिकता अधिक वाढवली जावी यासाठी आपण प्रार्थना करण्यासाठी ‘सावध असावे.’—कलस्सै. ४:२; वॉ.६२ पृ. ४९७.
पवित्र शास्त्र अभ्यासात
३ पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याच्या बाबतीत प्रार्थना इतकी महत्त्वाची का असते? अभ्यासाची सुरवात प्रार्थनेने करण्यामुळे आम्हाला सुरवातीपासून योग्य मनोवृत्तीत राखता येते व त्यामुळे विद्यार्थ्याला देखील, ज्याविषयीची चर्चा होत आहे त्याचे महत्त्व वाटू लागते. तो देखील मार्गदर्शनासाठी यहोवाकडे बघण्यास सुरवात करतो. विद्यार्थ्याला आमच्या उदाहरणामुळे प्रार्थना कशी करावी ते शिकायला मिळते.—लूक ११:१.
४ घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासामध्ये प्रार्थना करताना कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या जाऊ शकतात? येशूची नमुनेदार प्रार्थना तसेच पौलाने फिलिप्पैच्या बांधवासाठी केलेली प्रार्थना उत्तम उदाहरण आहेत. (मत्तय ६:९-१३; फिलि. १:९-११) आमच्या प्रार्थना प्रदीर्घ असू नयेत; तर त्या आमच्या विशिष्ट गोष्टींसाठी असाव्यात. यहोवाने जी अगणित कृत्ये केली आहेत त्याविषयी त्याची स्तुती करणारे बोल प्रार्थनेत समाविष्ट करणे योग्य आहेत. त्याची थोरवी, भव्यता, आणि परिपूर्ण गुण याची मान्यता आम्ही प्रार्थनेत दाखवू शकतो. (स्तोत्र. १४५:३-५) पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांचे नाव प्रार्थनेत घेणे, कदाचित त्याच्या परिस्थितीचा उल्लेख करणे आणि त्याची आध्यात्मिक प्रगती घडावी यासाठी प्रार्थना करणे लाभदायक ठरते. तो प्रगति दाखवू लागतो तसे त्याने सभांना उपस्थित राहण्याच्या केलेल्या प्रयत्नांवर आणि तो जे शिकत आहे त्याची इतरांसोबत सहभागी करण्यामध्ये त्याच्यावर आशीर्वाद यावा याविषयी आम्ही प्रार्थनेत विनंति करू शकतो. याचप्रमाणे, यहोवाने जागतिक प्रचार कार्यावर आशीर्वाद पाठवावा अशी याचनाही समाविष्ट करावी.
आमच्या बंधु-भगिनींसाठी
५ यहोवाचे सर्व लोक आमचे सहकारी आहेत. (१ करिंथ ३:९) या कारणास्तव जेव्हा प्रापंचिक अधिकारी आमच्या सुवार्तेच्या प्रचाराच्या कामी अडखळणे उपस्थित करतात तेव्हा आम्ही “राजांसाठी व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता” प्रार्थना करावी. ते कशासाठी? “आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.” (१ तीम. २:१, २) अशा या प्रार्थना आमच्या जगभरातील बंधुवर्गासाठी असतात. आमची हीच प्रार्थना असावी की अधिकाऱ्यांना आमच्या कामाविषयी पसंती राहावी.
६ आमचे जे बांधव कठीण परिस्थितीत राहून प्रचारकार्य करीत आहत त्यांना बळ मिळावे यासाठी तसेच जे आध्यात्मिकदृष्ट्या आजारी आहेत अशांनी उपाध्यपणात अधिक सहभाग घ्यावा म्हणून आपल्याला प्रार्थना करता येईल. (२ थेस्स. ३:१, २) मंडळीतील वडील, फिरते देखेखे आणि नियमन मंडळ, हे जे सर्व “तुम्हामध्ये श्रम करीत आहेत” त्यांजसाठी प्रार्थना करणे चांगले आहे.—१ थेस्स. ५:१२.
७ आम्ही सर्वदा आपली चिंता यहोवावर टाकावी. (स्तोत्र. ५५:२२; १ पेत्र ५:७) आम्हाला याची खात्री देण्यात आली आहे की, त्याच्या इच्छेप्रमाणे असणाऱ्या ज्या गोष्टींची आपण विनंति करीत राहू त्याविषयी तो आमचे नक्कीच ऐकेल. (१ योहान ५:१४) या कारणास्तव जर आपण आमचे उपाध्यपण पूर्ण करता यावे यासाठी यहोवाच्या मदतीकरिता प्रार्थना करीत आहोत तर तो आमचे ऐकून घेईल व आमचा मार्ग यशस्वी बनवील याविषयी आम्ही निर्श्चित राहू शकतो.—२ तीम. ४:५.