वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९५ पृ. १
  • ख्रिस्त हा युवकांचा आदर्श

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्त हा युवकांचा आदर्श
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • पायनियर या नात्याने तुम्ही यहोवाची सेवा करू शकता का?
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ६/९५ पृ. १

ख्रिस्त हा युवकांचा आदर्श

१ खूप वेळ बायबलची चर्चा केल्यावर, एक युवक म्हणाला: “येशू ख्रिस्ताच्या जोरदार व्यक्‍तिमत्त्वामुळे मी प्राभावीत झालो. मी भरवसा ठेवू शकतो असा हा नेता आहे.” हीच गोष्ट कोणत्याही राजनैतिक नेत्याविषयी किंवा खेळ व मनोरंजनाच्या नामवंत कलाकारांविषयी म्हटली जाऊ शकत नाही. जे उघडपणे, जगीक दर्जे आणि गैर-ख्रिस्ती जीवनशैलींना स्वीकारतात अशांना खरे ख्रिस्ती आदर्श मानत नाहीत.—स्तोत्र १४६:३, ४.

२ तरुणांना अशी खात्री दिली जाऊ शकते, की ते येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवतात तेव्हा ते स्वतःला देवाची मेंढरे म्हणून सादर करतात व येशू त्यांना ओळखतो. हा उत्तम मेंढपाळ त्यांची काळजी घेतो. (योहा. १०:१४, १५, २७) जे तरुण, त्यांचा आदर्श म्हणून ख्रिस्ताला अनुसरतात ते आशीर्वादित असतात.

३ सध्या ब्रुकलिन बेथेलमध्ये काम करणाऱ्‍या एका बांधवाने या सेवेच्या विशेषाधिकाराला वयाच्या आठ वर्षांपासून आपले ध्येय बनवले होते. प्रौढ झाल्यानंतर, बेथेल सेवा ख्रिस्ताचे उदाहरण अनुसरण्याचा व्यावहारिक मार्ग आहे, असा दृष्टिकोन बाळगण्यास त्याला उत्तेजन देण्यात आले होते. त्याच्या पालकांनी तसेच प्रावासी पर्यवेक्षकांनी त्याच्यासमोर हे ध्येय ठेवले होते. त्याकरता तयार होण्यासाठी, घरकाम केल्याने, राज्य सभागृहाची काळजी घेतल्याने व सेवेत कौशल्य प्राप्त केल्याने त्याला बेथेल कुटुंबाच्या एखाद्या सदस्याप्रामाणे मेहनतीने स्वतःचा उपयोग करण्यास त्यांनी उत्तेजन दिले. आता, पुष्कळ वर्षांपासून बेथेल सेवेचा आनंद घेतल्यावर, त्याने तरुणपणात ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रायत्न केला याची त्याला कदर वाटते.

४ येशूने जगीक ध्येयाचा पिच्छा पुरवला नाही; त्याने सेवाकार्याची निवड केली. एका तरुण बहिणीला शाळा पूर्ण केल्यावर पायनियरींग करावयाची होती, परंतु तिला अर्ध-वेळेची योग्य नोकरी न मिळाल्याने ती ते करण्यास मागेपुढे करत होती. ती सारखी विचार करू लागली: ‘पहिल्यांदा मी नोकरी शोधीन, त्यानंतर पायनियरींगचा अर्ज देईन.’ ती जितका अधिक वेळ थांबून राहील तितकाच पूर्ण-वेळेच्या नोकरीचा तिला मोह वाटेल कारण त्यावेळी नोकरी स्वीकारण्यापासून तिला कोणतीच गोष्ट रोखणार नाही, असे एका वडिलांनी तिला सांगितले. तिने म्हटले: “यहोवाने मला त्याच्या आत्म्याकरवी मार्गदर्शित करावे म्हणून मी प्रार्थना केली.” तिने ताबडतोब साहाय्यक पायनियर म्हणून नाव नोंदवले व नंतर नियमित पायनियर बनली. त्यानंतर, तिचा पायनियरींगचा आराखडा ज्यामध्ये मावत होता अशी नोकरी तिला अल्पावधीतच मिळाली.

५ येशूने सर्वांना राज्य संदेशाची घोषणा धैर्याने केली. (मत्त. ४:२३) तरुण ख्रिस्ती देखील इतरांकडून आपली हिंमत खचवून न घेता प्राचारात धैर्यशील होण्यास शिकू शकतात. एका १४ वर्षांच्या साक्षीदाराने सांगितले: “ख्रिस्ती या नात्याने माझी भूमिका काय आहे ती शाळेतील सर्वांना ठाऊक आहे. . . . त्यांना ती इतक्या चांगल्या रीतीने समजली आहे, की सेवाकार्य करत असताना मला एखादा वर्गसोबती भेटल्यास मला याची लाज वाटत नाही. बहुधा सहविद्यार्थी ऐकून घेतात व पुष्कळ वेळा साहित्य स्वीकारतात.”

६ ख्रिस्ताच्या उदाहरणाचा विचार केल्याने, तरुण लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल सुज्ञ निर्णय घेण्यास मदत मिळू शकते. जगीक ध्येयांचा मागोवा घेण्यामध्ये गढून जाण्याऐवजी, ते यहोवाच्या सेवेत आवेश दाखवून ‘त्यांच्या निर्माणकर्त्याला स्मरतात.’ (उप. १२:१) ख्रिस्त येशूप्रामाणे, ते “पित्याची प्रीति” विकसित करत आहेत ज्यामुळे त्यांना जगाकडून सादर केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक ईष्ट असणारे आशीर्वाद प्राप्त होतात. जुन्या जगासोबत ‘नाहीसे होण्याऐवजी’ ते ‘सर्वकाळ जगण्याची’ वाट पाहू शकतात.—१ योहा. २:१५-१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा