प्राकाश वाहक या नात्याने आपल्या आदर्शाचे अनुकरण करणे
१ “मी जगाचा प्राकाश आहे,” असे येशूने स्वतःच्या बाबतीत घोषित केले. त्याच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यामुळे येशूचे अनुयायी देखील “जगाचा प्राकाश” ठरले. (मत्त. ५:१४) “जगाचा प्राकाश” या नात्याने येशू म्हणू शकला की, त्याचे अनुकरण करणाऱ्यांना “जीवनाचा प्राकाश” मिळेल. (योहा. ८:१२) यामुळे आपण आध्यात्मिक प्राकाश वाहक बनतो ज्यांनी हा प्राकाश कोणत्याही गोष्टीपासून लपवून किंवा दृष्टिआड ठेवण्यास अनुमती देऊ नये.
२ यहोवाची संघटना आपण प्राभावी प्राकाश वाहक कसे व्हावे हे दाखविण्यासाठी प्राशिक्षण पुरवते. आपल्याला मिळणारा सल्ला आणि मार्गदर्शन यांचे आपण तंतोतंत अनुकरण केल्यास राज्य सत्याविषयी सर्व लोकांना प्राकाशमान करण्यासाठी आपल्याला शक्य होईल. (१ तीम. ४:६) प्राकाश वाहक या नात्याने सेवा करण्यामध्ये, प्रात्येक संधीच्या वेळी सत्याची बोलणी करणे एवढेच नव्हे तर ख्रिस्ती या नात्याने चांगली वर्तणूक राखणे देखील समाविष्ट आहे. आपल्या आदर्शाची वर्तणूक निर्दोष होती. त्याचे अनुयायी या नात्याने ख्रिस्ती विश्वास आपल्या दैनंदिन जीवनाचा मार्ग असल्याचे आपण दाखविले पाहिजे. (इफिस. ५:९; तीत. २:७, ८, १०) आपण उत्तम कामे केली पाहिजेत ज्यामुळे इतर लोक ती कामे पाहून देवाची स्तुती करण्यास प्रावृत्त होतील.—मत्त. ५:१६.
३ एका साक्षीदाराला घरोघरी जात असताना एक विलक्षण विनंती करण्यात आली. घरमालक आणि त्याची पत्नी फारच आजारी असून त्यांना बँकेत काही रक्कम जमा करावयाची होती. हे काम करण्यासाठी त्यांनी साक्षीदाराला विचारले. या कामास तो तयार झाल्यानंतर २,००० अमेरिकन डॉलरची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी त्याला देण्यात आली! साक्षीदाराने परतल्यानंतर विचारले: “तुम्ही मला ओळखत नसतानाही माझ्यावर विश्वास कसा ठेवला?” उत्तर: “आम्हाला ठाऊक आहे आणि प्रात्येकाला माहीत आहे की, यहोवाचे साक्षीदारच केवळ विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत.” बायबलच्या नैतिक तत्त्वांना पूर्णपणे जडून राहिल्यामुळे देवाचे गौरव करणारे, असा नावलौकिक आपल्याला मिळू शकतो, याबद्दल आपण कृतज्ञ असू शकतो!
४ इयत्ता पहिलीच्या बाईंनी त्यांच्या वर्गाला, एका सहा वर्षांच्या विद्यार्थी साक्षीदाराने हॅलोईन संबंधीचे रेखाचित्र रंगवण्यास नकार का दिला, याचे स्पष्टीकरण दिले. ती जो विश्वास करते त्यामुळे इतरांपासून वेगळे असण्याचे धैर्य तिच्याकडे होते आणि या गोष्टीचा बाईंना फार अभिमान होता, असे त्यांनी सांगितले. आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवत असल्यास तिचे आपण समर्थन केले पाहिजे. त्या रात्री बाईंनी त्यांच्या विश्वासाचे परीक्षण केले आणि त्यांना हे कबूल करावे लागले की, त्यांच्या मतांचे समर्थन करण्याचे त्यांनी धैर्य दाखविले नव्हते. दुसऱ्या दिवशी बाईंनी घोषणा केली की, येथून पुढे ठराविक सुटीचे दिवस साजरे करण्यामध्ये त्यांच्या वर्गाला त्या सहभागी करणार नाहीत आणि त्यापैकी काहींवर त्यांचा स्वतःचाच विश्वास नव्हता!
५ यहोवाचे लोक कोठेही असले तरी त्यांचा प्राकाश प्राकाशविण्यासाठी उत्सुक आहेत. शाळेतील तरुणांच्या उदाहरणीय वर्तनाने शाळासोबत्यांना आणि शिक्षकांना अनुकूलरित्या प्राभावीत केले आहे. प्रौढ साक्षीदार आसपास उत्तम वागणूक प्रादर्शित करत असल्यामुळे अनेकजण राज्याच्या संदेशाविषयी अनुकूलरित्या बोलत आहेत. विविध परिस्थितीतील अनौपचारिक साक्षकार्यामुळे अधिक शिकण्याची इच्छा असणारे प्रामाणिक लोक आकर्षित होत आहेत. नोकरी करताना आपले परिश्रम आणि प्रामाणिकपणा सुद्धा साक्ष देतात. होय, आपण कोठेही असलो किंवा काहीही करत असलो तरीसुद्धा आपण सत्याबद्दलची आस्था वाढवू शकतो.
६ आपल्या थोर आदर्शाच्या निर्दोष जीवनक्रमावर दृष्टी लावल्याने त्याचे अनुयायी या नात्याने आपण आपल्या कौशल्यात निरंतर प्रागती करू शकतो. आपला प्राकाश ‘सर्व लोकांवर प्राकाशित होतो’ या गोष्टीची खात्री त्याच्या उदाहरणाची नक्कल केल्याने मिळेल.—मत्त. ५:१५; १ पेत्र २:२१.