ज्योती वाहक—कोणत्या उद्देशास्तव?
“मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे ठेविले आहे.”—प्रे. कृत्ये १३:४७.
१. प्रे. कृत्ये १३:४७ मधील आज्ञेचा प्रेषित पौलावर कसा प्रभाव झाला?
प्रेषित पौलाने म्हटलेः “प्रभूने [यहोवा न्यू.व.] आम्हास आज्ञा दिली आहे ती ही की मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे ठेविले आहे. यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण असे व्हावे.’” (प्रे. कृत्ये १३:४७) त्याने केवळ हे म्हटलेच नाही तर त्याची गंभीरता देखील ओळखली. ख्रिस्ती बनल्यानंतर, पौलाने ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याचे जीवन समर्पण केले. (प्रे. कृत्ये २६:१४-२०) ती आज्ञा आम्हालाही लागू होते का? असे आहे, तर ती आमच्या दिवसात महत्त्वपूर्ण का आहे?
जेव्हा मानवजातीसाठी ‘प्रकाश लुप्त झाला’
२. (अ) जगाने त्याच्या अंत समयात प्रवेश केला असता, काय घडल्यामुळे त्याच्या आध्यात्मिक व नैतिक परिस्थितीत परिणाम झाला? (ब) ऑगस्ट १९१४ मध्ये घडताना जे पाहिजे, त्यावर एका ब्रिटिश मुत्सद्याने कशी प्रतिक्रिया दाखवली?
२ आज जिवंत असलेल्या बहुतेक लोकांचा जन्म होण्याआधी, ह्या जगाने अंत समयात प्रवेश केला. एकामागून एक अशा अनेक मोठ्या घटना शीघ्र घडत गेल्या. आध्यात्मिक व नैतिक अंधकाराला प्रमुख कारणीभूत होणारा दियाबल सैतान पृथ्वीवर खाली टाकण्यात आला. (इफिसकर ६:१२; प्रकटीकरण १२:७-१२) मानवजातीने तिच्या पहिल्या महायुद्धात अगोदरच झेप घेतली होती. ऑगस्ट १९१४च्या अगोदर, जेव्हा युद्ध अटळ दिसले, तेव्हा राज्यातील विदेशी कामकाज पाहणारे ब्रिटिश सचिव, सर एडवर्ड ग्रे लंडनमधील आपल्या ऑफिसच्या खिडकीत उभे राहिले आणि म्हणालेः “सर्व युरोपभर दिव्यांचा प्रकाश मिणमिणीत होत आहे; आम्ही त्याला आमच्या जीवनकाळात पुन्हा प्रखर झालेला पाहणार नाही.”
३. मानवजातीसाठी उज्ज्वल रागरंग आणण्याच्या प्रयत्नात जागतिक नेत्यांना कोणते यश आले?
३ तो प्रकाश पूर्ववत आणण्याच्या प्रयत्नात, १९२०मध्ये लीग ऑफ नेशन्स्ला कार्यरत केले गेले. परंतु हा प्रकाश नुकताच लुकलुकला. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी, जागतिक नेत्यांनी यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे पुन्हा प्रयत्न केला. आणखी एकदा हा प्रकाश चमकला नाही. अधिक अलिकडील घटनांना पाहता, जागतिक नेते “एका नव्या जगाची” बोलणी करीत आहेत. परंतु त्यांनी म्हटलेल्या नव्या जगाने शांती व सुरक्षितता आणली असे कदापि म्हटले जाऊ शकत नाही. उलटपक्षी, शस्त्रामधील मतभेद वंशझगडे, गुन्हे, बेरोजगारी, दारिद्य्र, वातावरणातील प्रदूषण आणि आजारपण या सर्वामुळे लोकांचा आनंद हरपत आहे.
४, ५. (अ) मानवी परिवारावर केव्हा व कशाप्रकारे अंधकार आला? (ब) मुक्तता मिळण्यासाठी काय आवश्यक आहे?
४ खरे म्हणजे, १९१४च्या फारच आधी मानवजातीसाठी प्रकाश लुप्त झाला. ते ६०००वर्षाआधी एदेन बागेत घडले, ज्यावेळी आमच्या पहिल्या पालकांनी देवाच्या विदित इच्छेला डावलून स्वतः निर्णय घेतला. तेव्हापासून मानवजातीच्या दुःखदायक अनुभवाला सुरूवात होऊन, पवित्र शास्त्र ज्याचा उल्लेख “अंधाराची सत्ता” असा करते त्याची मालिका सुरू झाली. (कलस्सैकर १:१३) दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली येऊन पहिला माणूस, आदाम याने जगाला पापात टाकले; व आदामापासून पाप आणि मरण सर्व मनुष्यात पसरले. (उत्पत्ती ३:१-६; रोमकर ५:१२) अशाप्रकारे मानवजातीने यहोवा जो प्रकाश व जीवनाचा उगम आहे त्याची पसंती गमावली.—स्तोत्रसंहिता ३६:९.
५ कोणत्याही मानवावर प्रकाश पुन्हा चकाकण्यासाठी केवळ एकच मार्ग असेल तो म्हणजे मानवजातीचा निर्माणकर्ता यहोवा देवाची संमती प्राप्त करणे होय. यानंतर, “सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण,” पापामुळे फर्मावलेली शिक्षा काढली जाऊ शकते. हे कसे शक्य होईल?—यशया २५:७.
“राष्ट्रांस प्रकाशासारखा” दिलेला एक जण
६. येशू ख्रिस्ताद्वारे आमच्यासाठी यहोवाने कोणती महान आशा संभवनीय केली आहे?
६ आदाम आणि हव्वेला नंदनवनातून बाहेर काढून टाकण्यापूर्वीच, यहोवाने धार्मिकतेच्या प्रेमिकांना सुटका देणाऱ्या एका “संताना”विषयी भाकित केले. (उत्पत्ती ३:१५) त्या वचनदत्त संतानाच्या मानवी जन्मानंतर, यहोवाने यरुशलेमाच्या मंदिरात वृद्ध शिमोनाकरवी “विदेश्यांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड” अशी ओळख करून देण्यास प्रवृत्त केले. (लूक २:२९-३२) येशूच्या परिपूर्ण मानवी बलिदानावरील विश्वासाद्वारे, मानवांना जन्मताच मिळणाऱ्या पापाच्या शिक्षेपासून सुटका मिळू शकते. (योहान ३:३६) यहोवाच्या इच्छेनुसार, ते स्वर्गीय राज्याचा भाग असणाऱ्या परिपूर्ण अनंतकाळच्या जीवनाकडे किंवा पार्थिव पृथ्वीवर त्याची प्रजा म्हणून आता पुढे पाहू शकतात. खरोखर ती केवढी विस्मयकारक योजना आहे!
७. यशया ४२:१-४ मधील दोन्ही अभिवचने आणि त्यांची पहिल्या शतकातील पूर्णता आम्हाला आशेने भरून का टाकतात?
७ स्वतः येशू ह्या महान आशेच्या पूर्णतेचा हवाला देणारा आहे. येशूने पीडीत जनांना बरे करण्यासंबंधी, यशया ४२:१-४ मध्ये जे लिहिलेले आहे ते प्रेषित मत्तयाने त्याला लागू केले. त्या शास्त्रवचनाचा काही भाग म्हणतोः “पाहा! हा माझा सेवक, याला मी आधार आहे! पाहा माझा निवडलेला याजविषयी माझा जीव संतुष्ट आहे! याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांस न्याय प्राप्त करुन देईल.” आणि हेच सर्व राष्ट्रांतील लोकांना जरूरीचे नाही का? भविष्यवाणी पुढे कळवते: “तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यावरून पुकारा करणार नाही, चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणीत वात तो विझविणार नाही.” याच्या अनुषंगाने, जे आधीच पीडीत होते अशांबरोबर येशूने निष्ठूरतेने व्यवहार केला नाही. त्यांचा त्याला कळवळा आला, त्याने यहोवाच्या उद्देशाबद्दल त्यांना शिकवले आणि त्यांना बरे केले.—मत्तय १२:१५-२१.
८. येशूला यहोवाने “लोकांना करार व राष्ट्राला प्रकाश देणारा असे दिले” ते कोणत्या अर्थाने?
८ ही भविष्यवाणी देणारा स्वतः त्याचा दास येशू याला संबोधून म्हणतोः “मी परमेश्वराने [यहोवा न्यू.व.] न्यायानुसार बोलाविले आहे, मी तुझा हात धरला आहे; तू लोकांना करार व राष्ट्राला प्रकाश देणारा असे मी तुला करीन. अंधळ्याचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानास व अंधारात बसलेल्यांस कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.” (यशया ४२:६, ७) होय, अभिवचनात नमूद केलेल्या गंभीर हमीप्रमाणे यहोवाने येशू ख्रिस्ताला करार दिला आहे. हे किती उत्तेजनवर्धक आहे! पृथ्वीवर असताना येशूने मानवजातीसाठी खरी काळजी प्रकट केली; त्याने त्याचे जीवनदेखील मानवजातीसाठी दिले. सर्व राष्ट्रांवर अधिपत्य गाजवण्याची नेमणूक यहोवाने त्याला दिली आहे. यामुळेच यहोवाने त्याचा उल्लेख राष्ट्रांचा प्रकाश असा केला आहे यात काही नवल नाही. स्वतः येशूने म्हटलेः “मी जगाचा प्रकाश आहे.”—योहान ८:१२.
९. येशूने त्या काळात अस्तित्वात असणारी व्यवस्था सुधारण्यासाठी स्वतःला का समर्पित केले नाही?
९ येशूने जगाचा प्रकाश याप्रमाणे कोणत्या उद्देशाने सेवा केली? ते काही लौकिक किंवा भौतिकवादीपणाच्या उद्देशाने निश्चितच नव्हते. त्यावेळेची राजकीय व्यवस्था अस्तित्वात राहण्यासंबंधी व तिला पाठबळ देण्याचा प्रयत्न त्याने केला नाही, किंवा सैतानाकडून व लोकांकडून राज्याधिकार स्वीकारला नाही. (लूक ४:५-८; योहान ६:१५; १४:३०) पीडीतांसाठी येशूने मोठी दया दाखवली, आणि इतरजण आणू शकणार नाहीत अशा मार्गांनी त्याने त्यांची मुक्तता केली. अदृश्य दुष्ट आत्मिक शक्तीने लबाडीने हाताळलेला मानवी समाज जन्मताच पापामूळे मिळालेल्या ईश्वरी शिक्षाधीन होता यामुळे मानवी समाजाच्या रचनेत कायमची मुक्तता मिळू शकणार नव्हती हे त्याला माहीत होते. ईश्वरी सूक्ष्मदृष्टीने, येशूने देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे त्याचे संपूर्ण जीवन केद्रिंत केले.—इब्रीयांस १०:७.
१०. येशूने कोणत्या रितीने व कोणत्या उद्देशास्तव जगाच्या प्रकाशाप्रमाणे सेवा केली?
१० मग कोणत्या रितीने व कोणत्या उद्देशास्तव येशूने जगाच्या प्रकाशाप्रमाणे सेवा केली? त्याने स्वतःला देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याकरता वाहून घेतले. (लूक ४:४३; योहान १८:३७) यहोवाच्या उद्देशाबद्दल सत्याची साक्ष देऊन, येशूने त्याच्या स्वर्गीय पित्याच्या नामाची महिमा केली. (योहान १७:४, ६) आणखी, जगाचा प्रकाश असल्यामुळे, येशूने धार्मिक असत्यता उघड केली आणि जे पापाच्या बंधनाधीन होते त्यांच्यासाठी आध्यात्मिक मुक्तता प्रदान केली. स्वतःचा उपयोग करून घेण्यासाठी जे त्याला अनुमती देतात अशांना सैतान अदृश्य लबाडी करणारा आहे हे त्याने उघड केले. येशूने अंधकाराची कामे देखील उघड केली. (मत्तय १५:३-९; योहान ३:१९-२१; ८:४४) विशेषपणे, त्याने त्याचे परिपूर्ण मानवी जीवन खंडणी म्हणून देण्याद्वारे तो जगाचा प्रकाश आहे हे सिद्ध केले, व जे या योजनेवर विश्वास ठेवतात त्यांना पापाची क्षमा मिळण्यासाठी, देवाबरोबर मान्यताप्राप्त संबंधासाठी, आणि यहोवाच्या गोलार्धिक कुटुंबाचा भाग होऊन अनंतकाळच्या जीवनाच्या आशेचा मार्ग त्याने त्यांना उघडा करून दिला. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) आणि शेवटी, त्याच्या संपूर्ण जीवनात परिपूर्ण ईश्वरी निष्ठा राखल्यामुळे, येशूने यहोवाची सार्वभौमता उंचावली व दियाबलास लबाड सिद्ध केले, याद्वारे धार्मिकतेच्या प्रेमिकांना सार्वकालिक फायदे शक्य करुन दिले. परंतु फक्त येशूच ज्योती वाहक होता का?
“तुम्ही जगाचा प्रकाश आहा”
११. येशूच्या शिष्यांनी ज्योती वाहक असण्यासाठी, काय करण्यास हवे?
११ मत्तय ५:१४ मध्ये येशूने त्याच्या शिष्यांना म्हटलेः “तुम्ही जगाचा प्रकाश आहा.” त्यांना त्याच्या पावलाचे अनुकरण करावयाचे होते. त्यांच्या जीवनाच्या मार्गाक्रमणाद्वारे व प्रचारकार्याद्वारे, त्यांना खऱ्या प्रज्वलितपणाचा उगम असणाऱ्या यहोवाकडे इतरांना मार्गदर्शित करावयाचे होते. येशूचे अनुकरण करून त्यांनी यहोवाचे नाव कळविले पाहिजे आणि त्याच्या सार्वभौमत्वास उंचावून धरले पाहिजे. येशूने सांगितल्याप्रमाणे, मानवजातीसाठी एकमेव आशा या अर्थाने देवाच्या राज्याची घोषणा त्यांनी करण्यास हवी. त्यांनी धार्मिक लबाडपणा, अंधकाराची कामे, व यामागे असणारा दुष्ट याला उघड केले पाहिजे. येशू ख्रिस्ताद्वारे तारण या यहोवाच्या प्रेमळ योजनेविषयी ख्रिस्ताच्या अनुयायांनी सर्व लोकांना चोहोकडे सांगितले पाहिजे. ही नेमणूक आरंभीच्या ख्रिश्चनांनी यरुशलेम आणि यहुदियापासून प्रथम सुरूवात करून, नंतर शोमरोनपर्यंत येशूने आज्ञापिल्यानुसार किती आवेशाने पूर्ण केली!—प्रे. कृत्ये १:८.
१२. (अ) आध्यात्मिक प्रकाश कोणत्या मर्यादेपर्यंत पोहचणार होता? (ब) यशया ४२:६ बद्दल यहोवाच्या आत्म्याने पौलाला काय समजण्यास मदत केली आणि त्या भविष्यवाणीचा आमच्या जीवनावर कसा परिणाम होण्यास हवा?
१२ तथापि, सुवार्तेचा प्रचार करण्याचे त्या क्षेत्रापर्यंतच मर्यादित राहणार नव्हते. येशूने त्याच्या अनुयायांना “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य कर”ण्याची सूचना दिली. (मत्तय २८:१९) तार्ससच्या शौलाच्या परिवर्तनाच्या वेळी, (जो प्रेषित पौल झाला तो) केवळ यहुद्यांनाच नव्हे तर विदेश्यांनाही प्रचार केला पाहिजे हे प्रभूने खासपणे दर्शवले. (प्रे. कृत्ये ९:१५) पवित्र आत्म्याच्या मदतीने, पौलाने त्यात जे समाविष्ट होते त्याची गुणग्राहकता जाणली. यास्तव, त्याने ती यशया ४२:६ मधील भविष्यवाणी ओळखली, जिची थेट पूर्णता येशू ख्रिस्तामध्ये झाली, व सोबतच ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनाही त्यात आज्ञा सूचित आहे यामुळेच, यशयाचे अवतरण घेऊन प्रे. कृत्ये १३:४७ मध्ये पौलाने म्हटले: “कारण प्रभूने [यहोवा न्यू.व.] आम्हास आज्ञा दिली आहे, ती ही की ‘मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे ठेवले आहे, यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण असे व्हावे.’” तुमच्याबद्दल काय? ज्योती वाहकाच्या कर्तव्यास तुम्ही अंतःकरणापासून गंभीर मानले आहे का? येशू व पौलाप्रमाणे तुम्ही तुमचे जीवन देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी केंद्रित करीत आहात का?
आमचे नेतृत्व करण्यासाठी देवाकडून प्रकाश आणि सत्य
१३. स्तोत्रसंहिता ४३:३च्या अनुषंगाने, आमची कोणती कळकळीची प्रार्थना आहे, आणि हे कशापासून आम्हाला सुरक्षित ठेवील?
१३ मानवजातीसाठी भवितव्य उज्ज्वल करण्याचा आम्ही आमच्या स्वतःच्या ‘बळावर ध्येयपूर्ती करण्याचा प्रयत्न केल्यास’, आम्ही ईश्वरप्रेरित वचनाचा मुद्दा गंभीरपणे हरवून बसू. सामान्यपणे जग काय करीत असते त्याकडे लक्ष न देता, खरे ख्रिस्ती यहोवा प्रकाशाचा उगम आहे त्याकडे पाहतात. त्यांची प्रार्थना स्तोत्रसंहिता ४३:३ मध्ये उद्धृत केल्याप्रमाणेच आहे, जी म्हणतेः “तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखवोत तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहचवोत.”
१४, १५. (अ) यहोवा आज कोणत्या मार्गांनी प्रकाश आणि सत्य देत आहे? (ब) देवाचा प्रकाश व सत्य आम्हाला खरेच निरवीत आहेत हे आम्ही कसे दाखवू शकतो?
१४ यहोवा त्याच्या निष्ठावान सेवकांच्या प्रार्थनांना सतत उत्तर देत आहे. त्याचा उद्देश घोषित करण्याद्वारे, त्याच्या सेवकांना समजण्यास साहाय्य करण्याद्वारे, व नंतर त्याने जे घोषित केलेले आहे त्याची पूर्णता घडवून आणण्याद्वारे तो त्यांना प्रकाश देतो. देवाला आम्ही प्रार्थना करीत असताना, ती पवित्रता भासविणारी केवळ एक करावी लागणारी गोष्ट नाही. स्तोत्र म्हणते त्याप्रमाणे, यहोवापासून येणारा प्रकाश आमचे नेतृत्व करो ही आमची कळकळीची इच्छा आहे. देव पुरवीत असलेल्या प्रकाशाचा स्वीकार करण्याची जबाबदारी आम्ही मान्य करतो. प्रेषित पौलाप्रमाणे, आम्ही ओळखतो की, यहोवाच्या वचनाची पूर्णता यामध्ये त्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी एक सूचित आज्ञा आहे. देवाने आम्हाला प्रदान केलेल्या त्या उद्देशानरूप राज्याची सुवार्ता सांगत नाही तोपर्यंत आम्ही इतर लोकांचे कर्जदार आहोत असे आम्हाला वाटते.—रोमकर १:१४, १५.
१५ आमच्या दिवसामध्ये यहोवाने पाठविलेला प्रकाश व सत्य येशू त्याच्या स्वर्गीय सिंहासनावरून कार्यशीलपणे राज्य करीत आहे त्यास प्रकट करते. (स्तोत्रसंहिता २:६-८; प्रकटीकरण ११:१५) येशूने भाकित केले की त्याच्या राजकीय उपस्थितीत, राज्याची ही सुवार्ता सर्व राष्ट्रात साक्ष व्हावी म्हणून गाजविली जाईल. (मत्तय २४:३, १४) ते कार्य आता होत आहे, आणि संपूर्ण गोलार्धभर अधिक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या कार्याला आम्ही आमच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान देऊ तर स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे, देवाचा प्रकाश व सत्य आमचे नेतृत्व करील.
यहोवाची महिमा प्रगट झाली
१६, १७. यहोवा देवाने १९१४ मध्ये त्याच्या स्त्रीसमान संस्थेवर त्याची महिमा कशी पाडली, आणि त्याने कोणती आज्ञा तिला दिली?
१६ शास्त्रवचने, आत्म्याला-चेतना देणाऱ्या भाषेत ईश्वरी प्रकाश सर्व लोकांवर कसा पसरत आहे त्याचे वर्णन करतात. यहोवाच्या “स्त्री”ला किंवा निष्ठावंत सेवकांनी मिळून बनलेल्या त्याच्या स्वर्गीय संस्थेस संबोधणारे यशया ६०:१-३ म्हणतेः “ऊठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुजकडे आला आहे परमेश्वराचे [यहोवा न्यू.व.] तेज तुजवर उदय पावले आहे. पाहा! अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे; पण तुजवर परमेश्वर [यहोवा न्यू.व.] उदय पावत आहे, त्याचे तेज तुजवर दिसत आहे. रा तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील.”
१७ येशू ख्रिस्त राजा असणाऱ्या मशीही राज्याचा जन्म, बऱ्याच कालावधीनंतर १९१४ मध्ये देवाच्या स्वर्गीय स्त्रीसमान संस्थेने घडविला तेव्हा यहोवाचे वैभव तिच्यावर प्रकटले. (प्रकटीकरण १२:१-५) सर्व पृथ्वीसाठी न्याय्य असलेल्या त्या सरकारावर यहोवाच्या मान्यतेसह त्याचा महिमायुक्त प्रकाश चकाकतो.
१८. (अ) यशया ६०:२ मध्ये भाकित केल्यानुसार अंधकाराने पृथ्वीला का झाकले आहे? (ब) पृथ्वीच्या अंधकारातून एखादा कसा मुक्त होऊ शकतो?
१८ याच्या विपरीत, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे आणि निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे. का बरे? कारण मानवी अधिपत्याला कृपापसंती दाखवून रा देवाच्या प्रिय पुत्राच्या सरकारचा विरोध करतात. त्यांना वाटते की एका मानवी सरकारपासून मुक्त होऊन दुसऱ्यास स्वीकारल्याने ते त्यांच्या समस्या सोडवू शकतील. परंतु यामुळे त्यांनी अपेक्षिलेली सुटका त्यांना मिळत नाही. आत्मिक क्षेत्रातून राष्ट्रांना अदृश्यपणे कोण फसवीत आहे हे पाहण्यात ते अपयशी ठरले आहेत. (२ करिंथकर ४:४) त्यांनी प्रकाशाच्या सत्य उगमाचा अव्हेर केल्यामुळे ते अंधकारात आहेत. (इफिसकर ६:१२) राष्ट्री काहीही करीत असली तरी, वैयक्तिकपणे त्या अंधकारातून आमची सुटका होऊ शकते. कशाप्रकारे? देवाच्या राज्यावर पूर्ण विश्वास ठेवून व त्याच्या अधीन राहण्याद्वारे.
१९, २०. (अ) येशूच्या अभिषिक्त अनुयायांवर का व कशाप्रकारे यहोवाची महिमा प्रकाशली? (ब) यहोवाने त्याच्या अभिषिक्तांना कोणत्या कारणामुळे ज्योती वाहक बनविले? (क) भाकित केल्याप्रमाणे “राजे” आणि “राष्ट्रे” कशाप्रकारे देवाने दिलेल्या प्रकाशाकडे वळले आहेत?
१९ ख्रिस्ती धर्मजगताने देवाच्या राज्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या अधीन राहिले नाही. परंतु येशूच्या आत्म्याने अभिषिक्त असलेल्या अनुयायांनी त्यावर विश्वास ठेवला आहे. परिणामस्वरूप, यहोवाचा ईश्वरी मान्यतेचा प्रकाश त्याच्या स्वर्गीय स्त्रीच्या दृश्य प्रतिनिधींवर प्रगट झाला व त्याची महिमा त्यांच्यावर व्यक्त झाली. (यशया ६०:१९-२१) जगातील राजनैतिक बदल किंवा आर्थिक परिस्थिती ते घेत असलेल्या आध्यात्मिक प्रकाशाचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. मोठ्या बाबेलातून यहोवाने त्यांची सुटका केली याचा त्यांनी अनुभव घेतला आहे. (प्रकटीकरण १८:४) त्यांनी यहोवाच्या शिस्तीचा स्वीकार केला व त्याच्या निष्ठावान सार्वभौमतेला उंचावल्यामुळे, ते त्याच्या अनुकूल सम्मतीचा आनंद घेतात. भविष्यासाठी त्यांची उज्ज्वल आशा आहे, व त्यांच्या समोर त्याने ठेवलेल्या आशेत त्यांना आनंद वाटतो.
२० परंतु कोणत्या उद्देशास्तव यहोवा त्यांच्यासोबत अशाप्रकारे वागला? त्याने स्वतः यशया ६०:२१ मध्ये म्हटल्याप्रमाणे, त्याचे “गौरव व्हावे,” त्याच्या नावाला सन्मान मिळावा व तो एकच सत्य देव असल्यामुळे त्याजकडे लोकांनी वळावे—आणि कायमचा फायदा त्यांनी घ्यावा. याच्या एकवाक्यतेत, सत्य देवाच्या उपासकांनी १९३१ मध्ये यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण केले. त्यांच्या साक्षकार्याच्या परिणामामुळे, त्यांनी पाडलेल्या प्रकाशाकडे यशयाने भाकित केल्याप्रमाणे “राजे” आले का? होय! पृथ्वीवरील राजनैतिक शासक नव्हे, तर येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गातून राजे या नात्याने राज्य करणारे बाकीचे शेष. (प्रकटीकरण १:५, ६; २१:२४) आणि “राष्ट्रां”बद्दल काय? ते या प्रकाशाकडे आकर्षिले आहेत का? निश्चितपणे! व्यक्तिगतपणे कोणतेही राजनैतिक राष्ट्र आकर्षित झाले नाही, परंतु सर्व राष्ट्रातील मोठ्या लोकसमुदायाने देवाच्या राज्याची बाजू घेतली आहे, आणि देवाच्या नवीन जगातील सुटकेची ते उत्सुकतेने अपेक्षा करीत आहेत. ते खरोखरच एक नवे जग असेल ज्यात धार्मिकता वास करील.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण ७:९, १०.
२१. त्याची इच्छा समजण्याची अनुमती दिल्यामुळे, यहोवाच्या विपुल दयेचा उद्देश आम्ही गमावला नाही हे कसे दाखवू शकतो?
२१ ज्योती वाहकांच्या वाढत असलेल्या समुदायातील तुम्ही एक आहात का? यहोवाने त्याच्या इच्छेची समजबुद्धी आम्हाला प्रदान केल्यामुळे येशूप्रमाणे, आम्ही ज्योती वाहक होऊ शकतो. आमच्या दिवसात, यहोवाने त्याच्या सेवकांना दिलेल्या कामात आमचा आवेश प्रदर्शित केल्यामुळे, देवाने आम्हाप्रत पुरविलेल्या विपुल दयेचा उद्देश आम्ही गमावला नाही हे आपण सर्वजण दाखवू या. (२ करिंथकर ६:१, २) आमच्या दिवसात कोणतेही कार्य इतके महत्वाचे नाही. यहोवाकडून येणारा महिमावान प्रकाश दुसऱ्यावर प्रकट करून त्याची महिमा करणे यापेक्षा दुसरा कोणता मोठा विशेषाधिकार नाही.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ मानवजातीच्या दुःखदायक समस्यांची मुळ कारणे कोणती आहेत?
▫ येशू आणि त्याचे अनुयायी हे दोघेही, कोणत्या अर्थाने “जगाचा प्रकाश” होते?
▫ यहोवाचा प्रकाश व सत्य आमचे नेतृत्व कसे करीत आहे?
▫ यहोवाने त्याची महिमा त्याच्या संस्थेवर कशा रितीने पाडली आहे?
▫ यहोवाने त्याच्या लोकांना कोणत्या उद्देशास्तव ज्योती वाहक बनविले आहे?