वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९५ पृ. १
  • प्रात्येकासाठी खास राज्य वार्ता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रात्येकासाठी खास राज्य वार्ता
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • प्रभुच्या कामात अधिकाधिक करण्याजोगे आहे
    आमची राज्य सेवा—१९९५
  • “नव्या युगात—तुमचे भविष्य कसे असेल?”
    आमची राज्य सेवा—२०००
  • राज्य वार्ता क्र. ३५ चे विस्तारित वितरण करा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • राज्य वार्तेप्रती दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घ्या
    आमची राज्य सेवा—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ५/९५ पृ. १

प्रात्येकासाठी खास राज्य वार्ता

१ एप्रिल २४ पासून आपण खास राज्य वार्तेचे वितरण करण्यास सुरवात केली आणि त्यामुळे प्रात्येक ठिकाणच्या चिंतायुक्‍त लोकांची आस्था उद्दिपित झाली आहे! हा संदेश केवळ समयोचितच नव्हे तर तातडीचा देखील आहे. हा संदेश हजारो लोकांपर्यंत पोहंचविण्यासाठी सर्व मंडळ्यातील प्राचारकांनी संपूर्ण अंतःकरणाने पाठिंबा दिला आहे. यात पूर्णपणे सहभागी होण्याचे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही प्रायत्न करत आहात काय?

२ प्रात्येक प्राचारकाला सुमारे ५० तर प्रात्येक पायनियरासाठी २५० असा प्रात्येक मंडळीमध्ये राज्य वार्तेचा साठा पाठविण्यात आला होता. तुम्हाला किती वितरण करणे शक्य झाले आहे? तुम्ही आशा केली तितके करण्यास तुम्हाला शक्य झाले नसल्यास, मे १४ ला वितरण संपण्यापूर्वी ते अधिक करण्याच्या मार्गांचा तुम्ही विचार केला आहे का? साहाय्यक पायनियर म्हणून नाव नोंदवण्याबद्दल काय? सप्ताहामध्ये सेवेच्या ज्यादा सभांचा, जसे की संध्याकाळच्या साक्षकार्यासाठी असणाऱ्‍या सभांचा तुम्ही फायदा घेऊ शकता का?

३ क्षेत्र उरकले जात आहे का, याबद्दल वडील काळजीपूर्वक उजळणी करतील. कदाचित मंडळीला तिचे सर्वच क्षेत्र उरकणे शक्य नसेल म्हणून शेजारील मंडळीने पत्रिकांच्या साहाय्याने तिच्या संपूर्ण क्षेत्रात कार्य केले असल्यास (काही बाबतीच हे होऊ शकते) वडिलांनी त्या मंडळीचा संपर्क साधला पाहिजे आणि त्यांच्याकडून मदत मिळवली पाहिजे. आपले संपूर्ण अंतःकरणपूर्वक प्रायत्न आणि मंडळ्यांतील उत्तम सहकार्य यांनी कार्य उरकले पाहिजे.

४ या कामामध्ये अनेकांना म्हणजे प्राचारकांना आणि युवकांना भाग घेण्यास शक्य झाल्यामुळे कदाचित तुम्हाला अधिक आनंद झाला असेल. हा आनंदाचा आत्मा दृढ होईल आणि यामुळे अनुकूल प्रातिक्रिया दाखविलेल्यांना परत भेटण्यासाठी सर्वांना प्रोरणा मिळेल, अशी आशा केली जाते. आस्था दाखविलेल्यांची नोंद घेण्याद्वारे घरोघरच्या कार्याचे उत्तम नोंदपत्रक ठेवण्यासाठी आपल्याला अर्जविण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्याचा दुसरा भाग नवीन अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने पुनर्भेटींवर लक्ष केंद्रित करण्याचा उत्तम समय असेल.

५ आपण परत जातो तेव्हा काय म्हणू शकतो? तुम्हाला असे म्हणणे परिणामकारक वाटेल: “अलीकडेच तुम्हाला, दिलेली छापील माहिती आठवत असेल; ही माहिती वाचण्यास आणि या विषयावर विचार करण्यास तुम्हाला संधी मिळाली असेल, अशी माझी आशा आहे. हा संदेश आपल्या समाजात अनेक चर्चांचा विषय झाला आहे कारण तो मानवजातीला सामना कराव्या लागणाऱ्‍या महत्त्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख करतो.” दुसऱ्‍या पृष्ठावरील विचारास चालना देणाऱ्‍या विधानांचा उल्लेख करा आणि त्यानंतर असे विचारा: “भवितव्यात काय होईल त्यासाठी तयार राहण्याकरता काय करण्याची आपल्याला गरज आहे, असे तुम्हाला वाटते?” प्रातिसादासाठी वाव द्या. आस्था असल्यास राज्य वार्तेच्या पृष्ठ २-४ वरील इतर मुद्द्‌यांची चर्चा करा आणि बायबल अभ्यास सादर करा किंवा ते शक्य नसल्यास अलीकडील नियतकालिके सादर करा.

६ दुसऱ्‍या मंडळीच्या क्षेत्रात कार्य करण्याचे तुम्हाला निमंत्रण मिळाल्यास तुम्हाला भेटलेल्या आस्थेवाईकांची नावे मंडळीला कळविण्याचे विसरू नका ज्यामुळे तेथील मंडळीच्या प्राचारकांद्वारे पुनर्भेटी दिल्या जाऊ शकतील. त्याचप्रामाणे तुम्हाला काही भेटी करण्यासाठी सांगितले असल्यास त्याठिकाणी ताबडतोब परत जाण्यास हयगय करू नका.

७ या राज्य वार्तेच्या खास वितरणाने राज्य-प्राचार कार्यातील आपल्याला प्रायत्नांना तीव्र करण्यासाठी आपल्या सर्वांना उत्तेजन आणि प्रोरणा दिली आहे. आपण निश्‍चिंत होऊ शकतो की, ही एक फार मोठी सफलता असेल कारण सगळीकडे यहोवाचे महान नाव आणि उद्देश याबद्दल लोकांना अधिक जागृत केले जाईल. (यश. १२:४, ५) आपण जेवढे अधिक करू, तेवढा आपला आनंद वाढेल.—स्तोत्र १२६:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा