आपण ज्यांना शिकवू शकतो अशांचा शोध घ्या
१ “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहा. ६:४४) अंतःकरणे पारखणारा यहोवा, शिकाऊ तसेच शिकणाऱ्या गोष्टींप्रामाणे चालणाऱ्यांना प्रातिफळ देईल. (यिर्म. १७:१०; योहा. ६:४५) नवीन जगाची वाट पाहत असणाऱ्या लीन जणांना शोधण्यात त्याचे सहकारी असण्याचा विशेषाधिकार आपणास आहे.—स्तोत्र ३७:११; १ करिंथ. ३:९.
२ येशूने आपल्या शिष्यांचे वर्णन “माणसे धरणारे” असे केले. (मत्त. ४:१९) अशाप्राकारचे काम काहीवेळा मेहनती असले, तरी चांगले परिणाम मिळवण्यात अधिक समाधान आहे. आपल्या व्यक्तिगत लाभास्तव कार्य करण्याऐवजी, आपण विशिष्ट नाशापासून प्रात्यक्षात “माश्यांचा” बचाव करत आहोत. माश्यांना आकर्षित करण्यासाठी काय करावयास हवे हे एखाद्या यशस्वी मासेमाऱ्याला ठाऊक असावयास हवे. त्याचप्रामाणे, आपल्या ऐकणाऱ्यांची आस्था चेतवणाऱ्या अपीलकारक पद्धतीने आपण राज्य संदेश सादर केला पाहिजे. आपण पुनर्भेटी करतो तेव्हा हे विशेषतः खरे आहे. आपण काय म्हणू शकतो?
३ धर्माविषयीच्या “टेहळणी बुरुज” लेखांबद्दल आस्था दाखवण्यात आल्यास, तुम्ही म्हणू शकता:
▪ ”पुष्कळ लोकांना धर्माची चर्चा करावयास का आवडत नाही याविषयी आपण अगोदर बोललो होतो. आपले बहुतेक शेजारी धार्मिक असल्याचा दावा करत असल्यामुळे, ही गोष्ट विचित्र असल्याची तुम्हाला वाटत नाही का? धर्म इतका विभाज्य व वादग्रस्त विषय का आहे, असा तुम्ही कदाचित विचार करत असाल.” प्रातिसादासाठी वाव द्या. रिझनींग पुस्तकातील ३२२ पृष्ठ काढा आणि “वाय आर देअर सो मेनी रिलिजन्स?” या शीर्षकाखालील काही मुद्यांची सहभागिता करा.
४ धर्माच्या विषयाची चर्चा सुरू करण्यासाठी तुम्ही असाच एखादा प्रास्ताव वापरू शकता:
▪ “आपल्याकडे खरा धर्म आहे याची खात्री आपण बाळगू शकतो असा कोणता मार्ग आहे का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] पुष्कळ विभिन्ना धर्म असल्यामुळे, अनेक लोकांना गोंधळात पडल्यासारखे व अनिश्चित वाटते.” रिझनींग पुस्तकाच्या ३२८-९ पृष्ठांकडे वळा, तेथे “हाऊ कॅन ए पर्सन नो वीच रिलिजन इज राईट?” या प्राश्नाची चर्चा करण्यात आली आहे. संक्षिप्त रुपात प्राश्न ५ वर विवेचन मांडा, “डू इट्स मेंबर्स ट्रुली लव वन अनदर?” व्यक्तिगत बायबल अभ्यासाद्वारे अधिक कसे शिकले जाऊ शकते याचे स्पष्टीकरण द्या.
५ घरमालक जागतिक परिस्थितींविषयी चिंतित असल्यास, तुम्हाला हे वापरून पाहावयास आवडेल:
▪ “जगत असता आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेताना सामना कराव्या लागणाऱ्या वाईट परिस्थितींची काळजी तुम्हाला वाटते असे दिसते. देव नजीकच्या भवितव्यात पूर्ण करील अशा सुंदर अभिवचनाबद्दल बायबल प्राकट करते.” नीतीसूत्रे २:२१, २२ वाचा आणि यहोवाने चिरकालिक शांतीच्या जगाचे अभिवचन कसे दिले आहे ते समजावून सांगा.
६ राज्य वार्ता याची खास मोहिम सुरू झाल्यावर, पुनर्भेटी करत असताना ज्या घरमालकांकडे राज्य वार्ता याची प्रात नाही अशांना ती नक्की द्या. राज्य वार्ता याच्या वाटपांचा मागोवा घेताना, पुनर्भेटींमध्ये तुम्ही जे म्हणू शकता त्याची चर्चा आमची राज्य सेवा हिच्या मेच्या अंकात केली जाईल.
७ देवाचे वचन “सक्रिय” असल्यामुळे, त्याचा उपयोग आपल्या सादरतांमध्ये करण्याचा प्रायत्न आपण केला पाहिजे. (इत्त्वी. ४:१२) घरमालकाला स्वतः बायबल वाचण्यास नक्की उत्तेजन द्या. (पडताळा प्रो. कृत्ये १७:११.) आपण परिश्रमपूर्वकतेने आपली भूमिका पार पाडली, तर यहोवा आपल्या प्रायत्नांना आशीर्वादित करील.