वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९५ पृ. ५
  • ईश्‍वारशासित सेवा प्राशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वारशासित सेवा प्राशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९५
आमची राज्य सेवा—१९९५
km ४/९५ पृ. ५

ईश्‍वारशासित सेवा प्राशालेची चाचणी

ईश्‍वारशासित सेवा प्राशालेत जानेवारी २ ते एप्रिल १७, १९९५ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्राश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्राश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्राश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या संदर्भात प्रात्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:

१. बथशेबाबरोबर पाप केल्याचा दाविदाचा पश्‍चात्ताप देवाने स्वीकारला तेव्हा त्याच्या चुकीच्या वर्तनाच्या वाईट परिणामांपासून दावीद आणि त्याच्या परिवाराला मुक्‍त केले गेले. [१४, uw पृ. १२७ परि. ५]

२. नीतीसूत्रे ११:१ मधील मूलभूत तत्त्व हेच आहे की, आपल्याला यहोवाची कृपा हवी असल्यास, आपण आपल्या सर्व व्यवहारात सद्‌गुणी आणि प्रामाणिक असले पाहिजे. [१२, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८६ ११/१५ पृ. १९.]

३. सल्ला स्वीकारणे हे दुर्बळतेचे चिन्ह आहे. [१३, uw पृ. १२७ परि. ४]

४. नीतीसूत्रे १४:१७ प्रथम भावनांकडे लक्ष देते कारण त्या बहुधा कृत्यांच्या आधी असतात. [१३, साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९३ ८/१ पृ. २८-९.]

५. येशूला प्रभुजी असे म्हणणाऱ्‍या सर्वांचा बचाव होईल. [२, uw पृ. १०५ परि. ५]

६. सा. यु. ३३ मध्ये येशूचे पुनरुत्थान झाले आणि त्याने देवाच्या उजव्या हाताशी आपले स्थान घेतले तेव्हा तो त्याच्या अभिषिक्‍त शिष्यांवर अधिपत्य करू लागला. (कलस्सैकर १:१३) [१०, gt अध्या. १३२]

७. शास्त्रज्ञांनी आनुवंशिकतेच्या नियमांच्या संग्रहाचा शोध लावण्याच्या ३,००० वर्षांआधी स्तोत्र १३९:१३-१६ ने त्याबद्दलचे ज्ञान दिले. [४, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९२ ५/१५ पृ. ४.]

८. नीतीसूत्रे ८:२२-३१ यामध्ये संपूर्णतः बुद्धीचे वर्णन आहे. [१०, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w८७ ५/१५ पृ. २८.]

९. खऱ्‍या ख्रिश्‍चनाने कोणत्याही गोष्टीचा द्वेष करू नये. [१०, साप्ताहिक बायबल वाचन; पहा wMR९२ ४/१ पृ. १९.]

१०. नीतीसूत्रे ११:२५ हे इब्री काव्य रुपातील विचार किंवा कल्पनांच्या समांतरतेचे उदाहरण आहे आणि नीतीसूत्रे १०:७ हे विरोधात्मक समांतरतेचे उदाहरण आहे. [८, si पृ. १०७ परि. ७]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. स्तोत्रे ही श्रेष्ठ साहित्यापेक्षाही अधिक का आहेत? [५, si पृ. १०४ परि. २३]

१२. स्तोत्रांबद्दलचे ज्ञान असल्यामुळे येशूला त्याचा कोणता फायदा झाला? [६, si पृ. १०५ परि. ३०]

१३. शलमोनाला सुज्ञता कोणी प्रदान केली आणि आपण नीतीसूत्रे वाचतो तेव्हा त्या गोष्टीने आपल्याला कशाची गुणग्राहकता बाळगण्यास प्रवृत्त करावे? [७, si पृ. १०६ परि. १]

१४. मरीया मग्दालियाला पुनरुत्थित येशू बागेत भेटला तेव्हा तो कोण असावा असे तिला वाटले आणि त्याला योग्यरीतीने ओळखण्यास तिला कशामुळे मदत मिळाली? [६, gt अध्या. १२८]

१५. येशूचे शिष्य असण्याची ओळख करून देण्यास भीत असलेल्या कोणत्या दोन सन्हेद्रीनच्या सदस्यांनी दफनासाठी त्याचे शरीर तयार करण्यात मदत दिली? [५, gt अध्या. १२७]

१६. आपल्या बांधवांकरता स्वार्थत्यागी प्रीती आहे हे आपण दैनिक कार्यहालचालींमध्ये कसे दाखवू शकतो? [१६, uw पृ. १३२-३ परि. ३, ४]

१७. स्तोत्र १३६:१०-१५ यात कोणत्या ऐतिहासिक घटनेबद्दल सांगितले आहे आणि फारोला काय झाले? [३, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९३ ६/१५ पृ. ५.]

१८. ख्रिस्ताचे वाहिलेले रक्‍त कोणता दुहेरी उद्देश साध्य करते? [९, uw पृ. ११५ परि. १३]

१९. विश्‍वासू प्रेषित, येशूचा सावत्र भाऊ याकोब आणि ५०० पेक्षा अधिक शिष्यांना येशू पुनरुत्थित झाल्याची खात्री कशी पटली? [९, gt अध्या. १३१]

२०. कोणत्या गोष्टीने येशू ख्रिस्ताला सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य असे बनवले? [१२, gt प्रस्तावनेतील विवेचने]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टला पेत्राने त्याच्या प्रसिद्ध भाषणात वारंवार _________________________ या पुस्तकातून उतारा दिला; त्या प्रसंगी सुमारे _________________________ व्यक्‍तींचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांची मंडळीत भर पडली. [५, si पृ. १०५ परि. २५, २६]

२२. स्तोत्रसंहितेत भाकीत करण्यात आले होते की, येशूला _________________________ दिला जाईल, त्याच्या बाह्‍य _________________________ चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि _________________________ त्यागलेला असा तो दिसेल. [६, si पृ. १०५ परि. ३०]

२३. यहोवाची संघटना ईश्‍वरशासित आहे याचा अर्थ ती _________________________ आहे; यहोवा मंडळीचा मस्तक _________________________ आणि त्याचे वचन _________________________ याद्वारे मार्गदर्शन पुरवतो; तसेच येशूने _________________________ खास जबाबदारी सोपवली आहे. (मत्त. २४:४५) [१०, uw पृ. ११८-१९, परि. ४-६]

२४. स्वर्गात घेतल्या जाणाऱ्‍या १,४४,००० यांच्या उलट, कोणा मानवाला मोजता आला नाही असा _________________________ येथेच _________________________ बचावेल. (प्रकटी. ७:९, १४) [१, uw पृ. १०४ परि. ३, ४]

२५. देवाला स्वीकृत असणाऱ्‍या निर्णयाप्रत पोहंचण्यासाठी, पहिल्या शतकातील नियमन मंडळाने, त्यांच्यापुढील विषयावर प्रेरित _________________________ काय म्हणतात तसेच _________________________ कार्याचा पुरावा यांचा विचार केला. (प्रे. कृत्ये १५:६-२९) [११, uw पृ. १२० परि. ८]

पुढील प्रत्येक विधानांतून अचूक उत्तरे निवडा:

२६. येशूला खिळताना, बोळ मिसळलेला द्राक्षारस देण्यात आला, परंतु त्याने तो पिण्यास नकार दिला कारण (नियमशास्त्राने त्यास मनाई केली होती; तो नाजीर होता; त्याला पूर्णपणे शुद्धीत राहायचे होते). [३, gt अध्या. १२५]

२७. आपली झगे धुऊन कोकऱ्‍याच्या रक्‍तात शुभ्र करणे म्हणजे (पाप करण्याचे थांबवणे; पापक्षालनाची कुवत असलेल्या, येशूच्या बलिदानाची आपल्याला गरज आहे हे जाणणे; देवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेणे). [३, uw पृ. १०६ परि. ७]

२८. येशूला (हेरोदाने; पिलाताने; फेलिक्सने) पाच वेळा तरी निर्दोष घोषित केले होते. त्याने शेवटी यहुद्यांच्या निर्दयी मागणीपुढे हात टेकले आणि येशूला देहदंडासाठी त्यांच्या स्वाधीन केले. [२, gt अध्या. १२४]

२९. सा. यु. (३६; ३५; ३३) पेन्टेकॉस्टच्या आधी मरण पावलेले आणि मृतावस्थेत असलेले देवाचे सर्व विश्‍वासू सेवक स्वर्गीय जीवनासाठी पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले नव्हते. [४, uw पृ. १११ परि. ५]

३०. सर्व मनुष्य (प्रेमाने; द्वेषाने; वैयक्‍तिक लाभाच्या लालसेने) प्रवृत्त असून, आपली आस्था केवळ (देवाच्या नावावर; इतरांवर; आत्मकेंद्रित) असते असा सैतानाचा दावा आहे. [१२, uw पृ. १२४ परि. १४]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

नीती. ३:२७, २८; योहा. १९:४-६; १९:२५-२७; रोम. १५:२, ३; प्रकटी. ७:१६, १७

३१. ख्रिश्‍चनांवर त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. [४, gt अध्या. १२६]

३२. इतरांवर आपल्या स्वरूपाचा प्रभाव पडू शकतो त्याबद्दल आपण खरीच काळजी करत असल्यामुळे आपण स्वतःला खूष करण्याचा स्वेच्छेने त्याग करतो. [१५, uw पृ. १३० परि. १०, ११]

३३. आध्यात्मिक किंवा भौतिक अशा कोणत्याही प्रकारे इतरांसाठी चांगले करण्याची संधी असते तेव्हा आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या सह-मानवांची, विशेषतः आपल्या आध्यात्मिक बांधवांची, मदत केली पाहिजे. [८, साप्ताहिक बायबल वाचन; पहा w९३ १२/१ पृ. २६.]

३४. प्रतिकूल परिस्थितीतही शांत सभ्यता आणि निश्‍चलता यहोवाला सन्मान पोहंचवू शकते आणि लोकांकडून आदर मिळवू शकते. [१, gt अध्या. १२३]

३५. उचितपणे “आध्यात्मिक नंदनवन” संबोधलेल्या वचनदत्त परिस्थितीचा उपभोग आपण घेऊ लागलो आहोत. [३, uw पृ. १०७-९ परि. ९-११]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा