आपल्या निकडीच्या समयासाठी—टेहळणी बुरुज आणि सावध राहा! नियतकालिके!
१ बायबलमधील भविष्यवाणीच्या पूर्णतेत, जगाला हादरून टाकणाऱ्या घटना घडत आहेत! जगामध्ये, आपल्या सभोवती तसेच इश्वारशासित संघटनेत घडत असलेल्या गोष्टींचा आपण गंभीरपणे विचार करतो, तसे राज्याच्या ‘सुवार्तेचा’ प्राचार करणे किती निकडीचे आहे हे आपण पूर्णपणे समजू शकतो. (मार्क १३:१०) हे आपल्याला एप्रिल महिन्यात आपली सेवा आवेशाने पार पाडण्याचे कारण पुरवते.
२ या महिन्यात आपण हाती घेणाऱ्या खास कार्याद्वारे आपल्या संदेशाच्या महत्त्वावर जोर देण्यात येतो. आपण अतिउत्सुकतेने राज्य वार्ता प्राकाशित होण्याची वाट पाहून आहोत. एप्रिल आणि मे दरम्यान आपण त्याचे वितरण करणार आहोत. या कार्यासाठी आपला उत्साह वाढवण्यास तसेच आपल्या क्षेत्रामध्ये आस्था उत्पन्ना करण्यास, टेहळणी बुरुज आणि सावध राहा! नियतकालिकांमध्ये अशांत जागतिक घटनांच्या भविष्यसूचक महत्त्वावर जोर देणारे समयोचित लेख असतील. नियतकालिकांमध्ये आस्था उद्दीपित करणारी आणि त्यांची वर्गणी करण्यास लोकांना उत्तेजन देणारी एखादी सादरता आपण कशी तयार करू शकतो?
३ कदाचित या मूलभूत पावलांचे अनुकरण केल्याने, तुम्ही एखादी परिणामकारी सादरता तयार करू शकाल: (१) तुमच्या समाजातील लोकांना अपीलकारक असेल असा लेख एखाद्या नियतकालिकातून निवडा. (२) घरमालकाची आस्था उद्दीपित करील असे तुम्हास वाटणारे एखादे विधान किंवा उद्धृत केलेले शास्त्रवचन या लेखातून निवडा. (३) अशाप्राकारची एखादी संक्षिप्त सादरता तयार करा, ज्यामध्ये मित्रत्वाचे अभिवादन, एखादा मनोरंजक शास्त्रवचनीय विचार ठळकपणे दाखवून देणारा प्राश्न किंवा विधान आणि नियतकालिकांची वर्गणी स्वीकारण्याचे मनःपूर्वक आमंत्रण यांचा समावेश असेल. तुम्हाला दिसते त्याप्रामाणे हे फारच साधे आणि सोपे आहे. तुम्ही सेवेत ज्याच्यासोबत कार्य करता अशा दुसऱ्या प्राचारकाला भेटून तुम्ही कदाचित एखादी सादरता तयार करू शकता.
४ “हा शेवटला काळ आहे का?” हा प्राश्न एप्रिल २२ चे “सावध राहा!” विचारत असल्यामुळे, तुम्ही “पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या” पुस्तिकेच्या पृष्ठ ५ वरील “शेवटले दिवस” या शीर्षकाखालील साहित्याची उजळणी करू शकता. तुम्ही असे म्हणून सुरवात करू शकता:
▪ “आपल्या सभोवती घडणाऱ्या प्राक्षुब्ध घटनांच्या अर्थाची चर्चा करण्यासाठी आम्ही भेट घेत आहोत. हा लेख काय म्हणतो याकडे लक्ष द्या . . .”
५ एप्रिल १ चे “टेहळणी बुरूज” हा प्राश्न विचारते: “धर्म—एक निषिद्ध विषय?” हे नियतकालिक सादर करताना तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “धर्म हा विषय फारच विवाद्य असल्यामुळे त्याची चर्चा करू नये असे बहुधा म्हटले जाते. तुम्हाला त्याविषयी काय वाटते?” त्यानंतर लेखातील एखादे विधान दाखवा.
६ “धार्मिक सत्य साध्य करण्याजोगे आहे का?” हा लेख असलेले एप्रिल १५ चे “टेहळणी बुरुज” तुम्ही वापरत असाल. ही प्रास्तावना वापरून तुम्हाला कदाचित चांगला प्रातिसाद मिळेल:
▪ “आज अनेक धर्म असल्यामुळे, धार्मिक सत्य साध्य करण्याजोगे आहे का असा विचार काही लोक करतात. तुम्हाला तसेच मला या प्राश्नाचे समाधानकारक उत्तर मिळवण्याचा मार्ग तो लेख दाखवून देतो. . . .”
७ कार्यास जाण्याआधी, तुमच्या सादरतेशी परिचित होण्यासाठी दुसऱ्या प्राचारकासोबत त्याचा सराव का करू नये? कदाचित तुम्ही एकमेकांसोबत मदतदायी सूचनांची सहभागिता करू शकता जेणेकरून तुमची परिणामकारकता वाढेल आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास प्राप्त होईल.
८ या युगाची समाप्ती जवळ येत आहे तसे, मोठी बाबेल हिच्यातून बचाव करून घेण्यासाठी प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत करण्यास आपण आपले प्रायत्न वाढवू या. (प्राकटी. १८:४) कधी पुनरावृत्ती न केल्या जाणाऱ्या या कामामध्ये टेहळणी बुरुज आणि सावध राहा! नियतकालिके महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यहोवाने आपल्या उपयोगासाठी ही उत्तम साधने पुरवली आहेत याबद्दल आपण कृतज्ञ आहोत!