प्रभावी पुनर्भेटी घ्या
१ “देवाचे सहकारी” या नात्याने पुनर्भेटी घेणे हा आमच्या सेवेतील अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. (१ करिंथ ३:६-९) घरमालकाची प्रतिक्रिया काय असेल त्याबद्दल भयभीत होण्याचे कारण नाही, कारण आपण आधीच सत्याबद्दल आस्था दाखवलेल्याची येथे भेट घेत असतो. तथापि, आम्ही केलेली चांगली तयारी, ज्याची भेट घेतो त्याबद्दल आम्हास वाटणारी व्यक्तिगत आस्था दाखवील आणि मग अपीलकारक पवित्र शास्त्र विषयाची चर्चा उभयतामध्ये घडेल.
२ स्पष्ट असा; व्यवहारचातुर्याचे प्रश्न विचारा.
तुम्ही पहिल्या भेटीच्या वेळी ज्या नोंदी घेतल्या असतील त्यावर आधारीत असे विचारु शकता:
▪ “या पृथ्वीवर धार्मिकरित्या सत्ता चालवावी या देवाच्या अभिवचनांबद्दल तुम्ही आणखी विचार केला आहे का?”
आणखी एक असा प्रश्न विचारता येईल:
▪ “मागील आठवडी आपण जी पवित्र शास्त्रीय चर्चा केली त्यानंतर तुम्ही देवाचे राज्य येण्याबद्दल केलेली प्रार्थना ही अधिक अर्थभरीत बनल्याचे तुम्हाला वाटते का?”
हे प्रश्न विचारीत असताना आपण मित्रत्वाने केलेले स्मित आणि संयमी आवाज या गोष्टी आमच्या प्रेमळ आस्थेला सूचक ठरतात.
३ घाईगर्दी करू नका; घरमालक काय म्हणतात ते लक्षपूर्वक ऐका: घरमालक काय बोलतो त्याकडे आपण लक्ष दिले आणि उत्तर देण्याआधी आपण गंभीर विचार केला तर आपल्या वक्तव्यामध्ये आपल्याला घरमालकाबद्दल खरी आस्था आहे हे उघडपणे दिसेल. तो जे म्हणतो त्यावर आधारीत तुम्ही असा शास्त्रवचनीय विचार सादर करू शकता जो तुमच्या पहिल्या भेटीतील संभाषणाशी संबंधित असेल. घरमालकाची तुम्ही दर वेळेला भेट घेताना त्याला काहीतरी शिकवण्याची तयारी ठेवा. जर काही अनपेक्षित विषय सामोरा आलाच तर आपले रिझनिंग पुस्तक काढून आवश्यक असणारी माहिती मिळविण्यासाठी त्या संधिचा वापर करा.
४ तुम्ही मे १, १९९२ चा “वॉचटावर”चा अंक दिला असल्यास असे म्हणू शकाल:
▪ “मागील भेटीच्या वेळी आपण १९१४ या वर्षाबद्दल बोललो होतो. त्यावर्षी जे युद्ध सुरु झाले त्यामुळे अनेक सरकारांमध्ये बदल घडले गेले. त्यानंतरही बदल होतच राहिले. पण या सर्व बदलांनी लोकांच्या गरजा भागविल्या का, किंवा ते चिरकालीक शांतीची हमी देऊ शकतात का? [विवेचनाला वाव द्या.] आपण आज ज्या मोठ्या समस्यांना तोंड देत आहोत त्या सोडवू शकणाऱ्या सरकारसाठी येशूने आपल्या अनुयायांना कशी प्रार्थना करण्यास शिकवले त्याकडे लक्ष द्या. [वाचा मत्तय ६:९, १०.] देवाचे राज्य काय पूर्ण करून दाखवील असे तुम्हाला वाटते? [उत्तर देण्यास मुभा द्या.] याबद्दल पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण अधिक मनोरंजक आहे.” मग, दानीएल २:४४ वाचा. यानंतर देवाच्या राज्याच्या वर्चस्वाखाली कोणत्या प्रकारच्या परिस्थितीची अपेक्षा धरता येईल ते दाखवण्यासाठी लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील पृष्ठ १२ व १३ वरील चित्र दाखवू शकता.
५ तुम्ही मे १, १९९२ चा “टेहळणी बुरुज” दिला असल्यास असे म्हणू शकाल:
▪ “आपण मागे भेटलो होतो तेव्हा कौटुंबिक जीवन कसे सुधारता येईल याबद्दल बोललो होतो. सध्या आपण अशा काळात राहात आहोत की, कुटुंबावरील दबाव हे वाढतच आहेत. त्यामुळे आम्हापैकी बहुतेक सर्वच जण या माहितीबद्दल आपली आवड दाखवतील. आपल्या कौटुंबिक जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी मिळणारी मदत सर्वांनाच घ्यायला आवडेल, हो ना?” जो प्रतिसाद मिळेल त्यावर आधारीत “तुमच्या कौटुंबिक जीवनात देवास प्रथम स्थान द्या” या लेखाचा उल्लेख करा व प्रथम उपशिर्षकांकडे लक्ष वेधवा व मग प्रत्येक शिर्षकातील प्रमुख मुद्यांचा सारांश सांगा. शेवटी योहान १७:३ व प्रकटीकरण २१:३, ४ ही शास्त्रवचने वाचू शकता.
६ यास्तव, आपण व्यक्तिगत आस्था दाखवण्याचे चालू ठेवू व चर्चेसाठी अपीलकारक पवित्र शास्त्र विषय लक्षात ठेवू की ज्यामुळे आपल्या पुनर्भेटी यशस्वी ठरू शकतील.