पुनर्भेटीमध्ये रिझनिंग पुस्तकाचा उपयोग करा
१ “मी लाविले, अपुल्लोसाने पाणी घातले.” असे प्रेषित पौलाने म्हटले. (१ करिंथकर ३:६) हे पाच शब्द, शिष्य बनविण्यातील पहिल्या दोन पावलांचे स्वरुप साधेपणात दाखवितात. पुनर्भेटीचे कार्य हे सहसा “पाणी घालणे” या कार्याशी जोडलेले आढळते. एखाद्या व्यक्तीचा आरंभीचा संपर्क यापासून तो बाप्तिस्मा घेतलेला शिष्य बनणे यातील ही एक अतूट साखळी आहे. पुनर्भेटीचे कार्य, आधी दाखविल्या गेलेल्या बीजास खतपाणी घालण्यासाठी ‘विद्येचा प्रसार’ करते; यामुळे ते बीज मूळ धरते आणि मग पवित्र शास्त्र अभ्यास सुरु होतो.—नीती. १५:७.
२ परत गेल्यावर काय बोलावे याची अनिश्चितता वाटत असल्यामुळे काही जण आस्था दाखविलेल्या ठिकाणी परत भेट घेण्यास जात नाहीत. उपयुक्त माहिती देणारे आमचे लहान पुस्तक रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स हे पाणी घालण्याच्या क्रियेस खूपच फायदेकारक असल्याचे ठरले आहे. घरमालक नियमित अशा पवित्र शास्त्र अभ्यासाला संमती देण्याआधी लहान भेटी सहसा घेण्याची आवश्यकता आहे. याबद्दल रिझनिंग पुस्तक, घरमालकासोबत चर्चा करता येईल अशा विविध शास्त्रवचनीय विषयांची पुरवणूक करते. यास्तव, पुढील एक किंवा अधिक प्रस्तावांचा वापर करून पुनर्भेटीसाठी चांगली तयारी करून जा.
३ तुम्ही “वॉचटावर”चा एप्रिल १५, १९९२ चा अंक, प्रार्थनेचा विषय सादर करून दिला असल्यास, परत भेटीला गेल्यावर तुम्हाला कदाचित असे प्रश्न विचारता येतील:
▪ “एखाद्या व्यक्तीच्या प्रार्थना देवाला कशामुळे स्वीकृत वाटत नाहीत?” घरमालकास बोलण्यास वेळ दिल्यावर आपले रिझनिंग पुस्तक काढा व पृष्ठ २९३ उघडा. त्या विषयाखाली असलेल्या काही शास्त्रवचनांची त्यांच्यासोबत चर्चा करा; त्यांना त्या पुस्तकातून थेटपणे वाचण्यास सांगा. तुम्हाला आस्था आढळून आल्यास वर्गणी सादर करा.
४ टेहळणी बुरुज याच्या एप्रिल १, १९९२ अंकाची सादरता “तुम्ही वेळ निघून गेल्यावर विचार करता का?” या लेखाने सादर केल्यावर पुनर्भेट घेताना
▪ घरमालकाने या लेखाच्या शेवटल्या परिच्छेदाची निश्चये नोंद घेतली असेल असे सांगा. तो पुन्हा एकत्र वाचा. मग, “शेवटले दिवस” या रिझनिंग पुस्तकाच्या २३४ पानावरील शिर्षकाच्या व्याख्येपासून सुरवात करा. वेळ मिळेल त्याप्रमाणे पहिला विभाग हाताळा. सर्व साहित्य एकाच वेळी उरकण्यापेक्षा पृष्ठ २३९ वरुन काही प्रश्न पुढील वेळी होणाऱ्या चर्चेसाठी प्रस्तुत करा.
५ काही प्रसंगी घरमालक अवेक! मासिकाचा एप्रिल २२, १९९२ चा अंक घेईल, ज्याचा विषय, “लाईफ—व्हॉट इज् इटस् पर्पस्?” असा आहे.
तुम्ही विचारु शकाल:
▪ “मानवी शरीर पृथ्वीवर सदासर्वकाळ जिवंत राहावे यासाठीच त्याची रचना करण्यात आली होती याबद्दल काही पुरावा आहे का?” किंवा, “जिवंत काय करीत आहेत हे मृतांना ठाऊक आहे का?” हे प्रश्न विचारल्यामुळे घरमालकामध्ये व्यक्तीशः आस्था होण्याची शक्यता आहे. त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुनर्भेट घेण्याची योजना आखा. ती उत्तर रिझनिंग पुस्तकात पृष्ठ २४७ व १०० वर अनुक्रमे देण्यात आली आहेत.
६ आरंभीची चर्चा पृथ्वीचे भवितव्य काय त्याबद्दल असल्यास, तुम्ही विचारु शकाल:
▪ “पृथ्वीची नासाडी करण्यासाठी देवाकरवी मानवाला मुभा देण्यात येईल का?” मग, रिझनिंग पुस्तकाची पृष्ठे ४४-५ उघडा आणि तेथील शास्त्रवचनीय उत्तराची चर्चा करा. घरमालक कदाचित विचारीलः “इतक्या करोडो लोकांचे मृतातून पुनरुत्थान होईल असे तुम्ही म्हणता, तर ते कोठे राहतील?” याचे उत्तर रिझनिंग पुस्तकाच्या ३४० पानावर मिळू शकेल.
७ एकाच वेळी सर्व सत्याचा घरमालकावर भडिमार होऊ देऊ नका. काही प्रश्नांची उत्तरे पुढील भेटीसाठी राखून ठेवा. देवाचे सहकारी या नात्याने रिझनिंग पुस्तकाचा वापर करून आपण चतुरपणे बी लावणे व पाणी घालणे केले पाहिजे. तेव्हा देव त्या बीची वाढ करील ही खात्री आम्हाला बाळगता येईल.