व्यक्तिगत अभ्यास—विचार करण्याची गोष्ट
१ कोणत्या गोष्टींमुळे आपण गंभीरपणे विचार करतो? आपण यहोवाबरोबर निकटचा नातेसंबंध वाढवण्याबद्दल आणि राखण्याबद्दल अतिशय चिंतित असले पाहिजे. अशी जवळीक विकसित करण्यामध्ये व्यक्तिगत अभ्यास एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आज, आपल्यापैकी फारच अल्प जणांच्या परिस्थिती त्यांना मनन आणि व्यक्तिगत अभ्यासात पुष्कळ तास घालवण्यासाठी अनुमती देतात. तरीसुद्धा, आपण देवाचे वचन नियमितरित्या वाचले नाही, तर जगाच्या आत्म्याचा आणि त्याच्या शारीरिक वासनेचा प्रतिकार करण्याची ताकद नसणे, इतपत आपण दुर्बळ होऊ शकतो.
२ वचनाची इच्छा धरा: आपण देवाच्या उद्देशांबद्दल पहिल्यांदा शिकलो तेव्हा, कदाचित अधिक ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक होतो. तथापि, कालांतराने आध्यात्मिक पौष्टिकतेची आपली भूक नाहीशी झाली असेल. आध्यात्मिक अन्नाची ‘इच्छा धरण्याची’ आवश्यकता असेल. (१ पेत्र २:२) आपण अशी इच्छा कशी उत्पन्न करू शकतो?
३ सुखकारक आठवणींमुळे एखाद्या आवडत्या भोजनाचा सुवास आपली भूक वाढवेल. व्यक्तिगत अभ्यासाचे अल्पावधीचे काळ आपल्यावर आध्यात्मिकरित्या असाच प्रभाव पाडू शकतात. स्वादिष्ठ आध्यात्मिक अन्नाचे काही घास घेऊन त्याचा आनंद लुटल्यावर खोल सत्यांबद्दल आपली भूक कदाचित वाढू शकते. शिकल्याने मिळणारे समाधान आपल्याला यहोवाच्या वचनात अधिक खोलवर खणण्यास उत्तेजित करील.
४ तुमच्यासाठी उत्तम असणारा नित्यक्रम तयार करा: काहीजण व्यक्तिगत अभ्यासासाठी एखादी संपूर्ण संध्याकाळ राखून ठेवतात तर काहींना अभ्यासाची वेळ अल्प आणि वारंवार असलेली आवडते. तुम्ही पहाटे चांगल्यारीतीने मन एकाग्र करू शकता असे आढळल्यास, न्याहरी करण्याआधी काही अभ्यास करण्याचे ठरवू शकता. संध्याकाळी तुम्ही अधिक दक्ष असाल, तर रात्री झोपण्याआधी अभ्यास करण्याचे निवडू शकता. परिस्थिती कोणतीही असली, तरी नियमित असणे आणि तुमच्या गरजांना चांगल्यारीतीने जुळणाऱ्या नित्यक्रमाला अनुसरणे हे महत्त्वाचे आहे.
५ आपल्याला अधिक व्यक्तिगत अभ्यास करण्यास उत्तेजन दिल्यावर, आपला आराखडा व्यग्र आहे असे आपण पटकन सांगू. तथापि, आपला वेळ कसा घालवतो ते पाहण्यात आपण सर्वांनी प्रामाणिक असले पाहिजे. प्रत्येक दिवशी टीव्हीचे कार्यक्रम पाहण्यात पुष्कळ तास खर्च होतात का? आपण काही व्यक्तिगत आवडीच्या गोष्टींचा त्याग करण्यास इच्छितो का? आपण आपला वेळ कसा घालवतो याचे वास्तविक परीक्षण केल्यावर, व्यक्तिगत अभ्यासासाठी अधिक लाभदायकतेने वापरता येईल असा रोजचा समय कदाचित आढळून येईल.—इफिस. ५:१५, १६.
६ देव वचनाच्या अभ्यासाकडे आपले पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. त्याच वेळी एखादी दुसरी गोष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे लाभ कमी होतात. जेवताना, रेडिओ ऐकताना किंवा टीव्ही पाहताना अभ्यास करण्याची आपली वृत्ती असेल, तर आपण ज्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये गढून जाण्याची शक्यता नसेल. (१ तीम. ४:१५) यास्तव, विचलित करणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होण्याची आवश्यकता आहे.—प्रशाला मार्गदर्शक पुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे ३३-४ पहा.
७ दैनिक अभ्यास आणि बायबलच्या सल्ल्याचा अवलंब करणे महत्त्वपूर्ण आहे, कारण अशाच पद्धतीने आपण यहोवाकडून मार्गदर्शन मिळवतो. सत्य जाणून त्याचा प्रभाव तुमच्या अंतःकरणावर घडावा असे ध्येय ठेवा. वाचण्यासाठी, उजळणी करण्यासाठी किंवा आध्यात्मिक गोष्टींवर मनन करण्यासाठी प्रत्येक संधीचा, मग ती कितीही अल्प असली तरी तिचा फायदा घ्या.—अनु. ६:६-८; कलस्सै. १:९, १०.