वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ६/१५ पृ. ८-११
  • तुम्हाला व्यक्‍तिगत अभ्यास आवडतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला व्यक्‍तिगत अभ्यास आवडतो का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांनी त्यांच्या व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे नवीन बळ प्राप्त केले
  • सेवा प्रेरक होऊ द्या
  • नियमितपणे देवाच्या वचनावर पोषण करा
  • काही कल्पक योजना
  • शिकण्यास नेहमी उत्सुक असा
  • राजांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाच्या वचनात आनंद मिळविणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • वैयक्‍तिक अभ्यासात सुधार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ६/१५ पृ. ८-११

तुम्हाला व्यक्‍तिगत अभ्यास आवडतो का?

देवाच्या कोणत्याही प्रामाणिक सेवकाला, व्यक्‍तिगत पवित्र शास्त्र अभ्यास करण्यासाठी उपयुक्‍त वेळ खर्च करण्यास आनंद वाटेल. (स्तोत्र १:१, २) परंतु, अनेकांना त्यांचा वेळ आणि शक्‍ती आधीच, दुसऱ्‍या इतर कामात खर्च होत आहे असे वाटत असल्यामुळे, व्यक्‍तिगत अभ्यासासाठी त्यांना हवा तसा अधिक वेळ आणि ताकद खर्च करण्यास कठीण जाते.

तथापि, देवाचे सक्रिय सेवक या नात्याने नित्य काम करण्यासाठी, सर्वांना त्यांच्या आनंदाचे आणि शक्‍तीचे, देवाच्या वचनातील सत्याचे नवनवीन किंवा सखोल पैलू शोधून, दिवसेंदिवस नूतनीकरण करण्याची गरज आहे. ज्या पवित्र शास्त्र सत्यांनी तुम्हाला अनेक वर्षांपूर्वी अगदी खोलवर प्रवृत्त केले होते तीच सत्ये आज तुम्हाला तितके प्रवृत्त करत नसतील. यास्तव, सत्यातून नवे सूक्ष्मज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक आणि सतत प्रयत्न करणे चांगले व महत्त्वपूर्ण आहे. यामुळे तुम्ही स्वतःला आध्यात्मिकरीत्या उत्तेजनकारक ठेवू शकता.

प्राचीन काळच्या विश्‍वासू पुरूषांनी स्वतःला देवाच्या वचनाच्या व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे आध्यात्मिकरीत्या कसे दृढ ठेवले? यहोवाचे आधुनिक दिवसातील सेवक त्यांच्या अभ्यासाला आणखी आनंददायक तसेच फलदायक कसे बनवतात? त्यांना त्यांच्या प्रयत्नांचा मोबदला कसा मिळाला आहे?

त्यांनी त्यांच्या व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे नवीन बळ प्राप्त केले

यहुदाचा राजा योशिया याने, मूर्तीपूजेविरूद्धची मोहिम, ‘मोशेच्या द्वारे दिलेल्या परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] नियमशास्त्राचा ग्रंथ’ त्याला वाचून दाखवल्यावर अधिक आवेशाने हाती घेतली. अर्थात, देवाच्या वचनाच्या त्या भागावर तो काही पहिल्यांदाच विचार करत नव्हता; परंतु मूळ हस्तलिखितांतून तो संदेश थेटपणे ऐकल्याने शुद्ध भक्‍तीसाठी संघर्ष करण्यास तो प्रवृत्त झाला.—२ इतिहास ३४:१४-१९.

संदेष्टा दानीएल याला, ‘यरूशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्याचे वर्ष’ आणि त्याची खातरी, केवळ यिर्मयाच्या पुस्तकातूनच नव्हे तर “शास्त्रग्रंथातून” समजली. यामध्ये लेवीय (२६:३४, ३५), यशया (४४:२६-२८), होशेय (१४:४-७), व आमोस (९:१३-१५) या पुस्तकांचा समावेश असण्याची अधिक शक्यता आहे. पवित्र शास्त्र पुस्तकांच्या त्याच्या ह्‍या परिश्रमी अभ्यासाद्वारे त्याला जी खातरी पटली त्याने, या धर्मशील पुरूषाला कळकळीच्या प्रार्थनेत देवाला शोधण्यास निरवले. त्याच्या या मनपूर्वक विनंतीला, यरूशलेम शहर आणि त्यातील लोकांविषयीचे पुढील प्रकटीकरण आणि आश्‍वासनाद्वारे उत्तर मिळाले.—दानीएल, अध्याय ९.

योशिया, ज्याने “परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] दृष्टीने जे बरे ते केले” व दानीएल, जो देवाच्या दृष्टित “परमप्रिय” होता, हे दोघेही मूलतः आज आमच्याहून काही वेगळे असे नव्हते. (२ राजे २२:२; दानीएल ९:२३) त्याकाळी उपलब्ध असलेल्या शास्त्रवचनांचा तीव्र उत्तेजनकारक अभ्यास करण्याच्या त्यांच्या व्यक्‍तिगत प्रयत्नांनी त्यांना अधिक आध्यात्मिकतेकडे निरवले, आणि देवासोबतच्या दृढ नातेसंबंधाचा आनंद लुटण्यास मदत केली. हीच गोष्ट यहोवाच्या आणखी इतर प्राचीन सेवकांबद्दल म्हटली जाऊ शकते जसे की, इफ्ताह, आसाफाच्या घराण्यातील स्तोत्रकर्ता, नहेम्या, व स्तेफन. या सर्वांनी, त्यांच्या काळी उपलब्ध असलेल्या पवित्र शास्त्र भागांच्या काळजीपूर्वक व्यक्‍तिगत अभ्यासाचा पुरावा सादर केला.—शास्ते ११:१४-२७; स्तोत्रसंहिता ७९, ८०; नहेम्या १:८-१०; ८:९-१२; १३:२९-३१; प्रे. कृत्ये ६:१५–७:५३.

सेवा प्रेरक होऊ द्या

आज यहोवाची अनेक वर्षांपासून सेवा करणाऱ्‍या बहुतेक सेवकांचा, व्यक्‍तिगत पवित्र शास्त्र अभ्यासाचा आराखडा आहे. आध्यात्मिकरीत्या जागृत राहण्यासाठी व त्यांच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी असे करणे महत्त्वपूर्ण आहे हे त्यांना कळून चुकले आहे. तरीसुद्धा, अनेकांनी हे कबूल केले आहे की अभ्यास आणि टाळता येत नाहीत अशा इतर गोष्टींमध्ये, जो वेळ आणि शक्‍ती खर्च करावी लागते त्यामध्ये समतोल राखणे नेहमीच सोपे नाही.

तरीही, जगव्याप्त प्रचार कार्याच्या पुढे गेलेल्या टप्प्यात ख्रिस्ती सेवेतील गरजांना ओळखताना, परिश्रमपूर्वक व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे आध्यात्मिकतेत जागृत राहणे अत्यंत जरूरीचे आहे. देवाच्या वचनातील नवनवीन व सखोल सूक्ष्मज्ञानाने रोमांचित झालेले जण, भुकेल्या अंतःकरणाच्या लोकांवर प्रभाव टाकण्याच्या आव्हानाला सामोरे जाऊ शकतात. हीच गोष्ट, आध्यात्मिक मासेमारीच्या मार्गात पुष्कळ लाभ मिळण्याची अपेक्षा केली जाते त्या विभागात कोणाला नेमले जाते तेव्हा, किंवा सामान्यपणे बेपर्वाई फैलावत आहे अशा पूर्णपणे कार्य केलेल्या क्षेत्रात एखादा टिकून राहतो तेव्हा खरी आहे.

नियमितपणे देवाच्या वचनावर पोषण करा

तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या नित्यक्रमाचा आणखी आनंद कसा घेऊ शकता किंवा तुम्ही व तुमचे कुटुंब अभ्यास करण्याच्या समयाचा आणखी प्रतिफलदायी उपयोग कसा करू शकता याविषयीच्या कल्पना तुम्हाला, इतर काय करतात यावरून मिळून शकतात. देवाच्या सेवकाला चुकवण्यास आवडणार नाहीत अशा गोष्टींमधील एक गोष्ट, नियमितरीत्या पवित्र शास्त्राचे वाचन करणे ही आहे. अनेकांनी, प्रत्येक आठवडी पवित्र शास्त्राचे कमीतकमी तीन ते चार अध्याय वाचण्याचे ध्येय ठेवले आहे. तुम्हाला पवित्र शास्त्राचे वाचन एका वर्षांत पूर्ण करावयाचे आहे का? तर तुम्हाला कदाचित दर दिवशी फक्‍त अर्धा तास वाचण्यासाठी वेळ खर्च करावयास आनंद वाटेल.

तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र एका पेक्षा अधिक वेळा वाचले आहे का? नसेल तर, पुढच्या वेळेस एक नवे ध्येय का ठेवू नये बरे? एक बदल म्हणून, एका ख्रिस्ती स्त्रीने पवित्र शास्त्र पुस्तकांचे लिखाण जसे झाले होते त्या क्रमानुसार त्यांचे वाचन केले. तिला, कालक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर आधारित पुष्कळ सविस्तर माहिती मिळाली जी तिला आधी मिळाली नव्हती. आणखी एका ख्रिस्ती स्त्रीने पाच वर्षांपासून लागोपाठ पाच वेळा पवित्र शास्त्राचे वाचन अथपासून इतिपर्यंत केले. प्रत्येक वेळा एक वेगळा दृष्टिकोन ठेवून तिने ते पूर्ण केले. पहिल्यांदा तिने पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून काढले. दुसऱ्‍या वेळेस, तिने प्रत्येक अध्यायाच्या साहित्याचा सारांश एक किंवा दोन वाक्यात टिपणवहीत लिहून ठेवला. तिसऱ्‍या वर्षांपासून पुढे, ती मोठ्या आकाराच्या संदर्भ आवृत्तीचा वापर करू लागली. तिने पहिल्यांदा समासातील निवडक प्रतिसंदर्भांना तपासले आणि मग, तळटीपा तसेच परिशिष्टाच्या माहितीचे जवळून निरीक्षण केले. पाचव्या वेळेस, भौगोलिक पैलूतून समज प्राप्त करण्यासाठी तिने पवित्र शास्त्र नकाशांचा उपयोग केला. ती म्हणते: “माझ्यासाठी, पवित्र शास्त्राचे वाचन, स्वादिष्ट अन्‍न खाण्याच्या बरोबरीचे झाले.”

पवित्र शास्त्राच्या काही उत्सुक विद्यार्थ्यांना पवित्र शास्त्राची एक प्रत व्यक्‍तिगत अभ्यासापुरतीच ठेवणे लाभदायक असल्याचे दिसून आले. त्यामध्ये ते मनोरंजक विवेचने, विचार-प्रवर्तक उदाहरणे, किंवा नंतर संदर्भ पाहण्याकरता इतर प्रकाशनांचे पृष्ठ क्र. समासात लिहितात. पूर्ण वेळेची एक सेविका, प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्या महिन्याच्या दरम्यान ती जे नवे मुद्दे शिकली त्यांना तिच्या अभ्यासाच्या टिपणवहीत लिहिण्यात आनंदित आहे. ती म्हणते, “या माझ्या मौल्यवान वेळेकडे पाहिल्याने मला, लवकरच येणाऱ्‍या पुढील महिन्यात देखील इतर ध्येयांना गाठण्यासाठी मदत होते.”

काही कल्पक योजना

तुमचा आराखडा दररोजच्या आणि आठवड्याच्या कामकाजांनी गच्च भरला आहे व तुम्हाला तुमच्या या मर्यादित वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काही सूचनांची गरज आहे असे वाटते का? तर, तुम्ही जे वाचणार आहात ते तुमच्या जवळ ठेवा, आणि तुमच्या फावल्या वेळेचा सदुपयोग करा. तुम्ही घरात किंवा नेहमीप्रमाणे जेथे अभ्यास करता तेथे, होताहोईल तितक्या योग्य ठिकाणी पुस्तकांची आणि इतर अभ्यासाच्या साहित्याची अशी मांडणी करा, जेणेकरून तुम्ही त्यांना सहजपणे घेऊ शकता. तुम्ही अभ्यासाला बसता ती जागा उबदार बनवा, परंतु तुम्हाला झोप लागेल इतकी आरामशीर करू नका. तुम्हाला भाषणाची नेमणूक मिळाली आहे का? त्या साहित्याचे वाचन शक्य तितक्या आधीच करा, आणि मग तुम्ही आराम करत असताना किंवा कोणतेही इतर काम करत असताना त्याविषयी मनामध्ये कल्पना करू शकता.

इतर जण परस्पर फायद्यासाठी वेळेचा सदुपयोग करण्यास तुम्हाला सहकार्य देऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्याला समजण्यास सोपे असणारे साहित्य तुम्हासाठी वाचायला लावून तुम्ही काम करीत असता, तसेच वाचन करणाऱ्‍याला चहा देत असता ते ऐकू शकता. घरातील सर्वांनी व्यक्‍तिगत अभ्यासासाठी शांत वेळेची निवड करणे कसे वाटते? “अलिकडेच तुम्हाला कशाचे वाचन करण्यास आवडले होते?” काही वेळा अशा प्रकारचे संभाषण चालू करून तुमचे मित्र काय शिकले याविषयीची माहिती तुम्ही काढून घेऊ शकता.

तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या कार्यक्रमात नवनवीन कल्पनांची भर घालू इच्छिता का? अनेक जण पवित्र शास्त्राविषयी इतरांना बोलण्यासाठी जसे वेळेचे ध्येय मांडतात त्याप्रमाणे, तुम्ही देखील अभ्यासासाठी वेळेचे ध्येय मांडू शकता. एक पूर्ण वेळेची (पायनियर) प्रचारक, अभ्यासासाठी महिन्याला तासांचे कमीतकमी ध्येय ठेवते आणि मग, तिच्या ध्येयांचे तास भरत येत आहे हे पाहून तिला अतिशय आनंद होतो. काही जण दूरदर्शन पाहण्याच्या त्यांच्या वेळेवर मर्यादा ठेवतात आणि अशारीतीने अभ्यासासाठी वेळ जपून ठेवतात. इतर आणखी, एखादा विषय निवडतात ज्याच्यावर ते काही वेळेसाठी अभ्यास चालू ठेवू शकतात, जसे की आत्म्याची फळे, पवित्र शास्त्र पुस्तकांची पार्श्‍वभूमी, किंवा शिकवण्याची कला. काहींना, इस्त्राएली राजे आणि संदेष्टेa किंवा प्रेषितांचे कृत्ये आणि पौलाची पत्रे यांच्यामधील संबंध दाखणाऱ्‍या कालक्रमानुसार तक्‍ता बनवण्यास आवडतो.

तरुण जनहो, तुम्हाला दृढ विश्‍वास हवा आहे का? तर मग, तुमच्या शाळेच्या पुढील सुटीत एखाद्या प्रकाशनाचा कसून अभ्यास का करू नये बरे? बाप्तिस्मा घेतलेल्या एका माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीनीने, वॉचटावर संस्थेने प्रकाशित केलेले, देवासाठी मानवाचा शोध (इंग्रजी) हे पुस्तक निवडले. तिने, एका अध्यायानंतर दुसऱ्‍या अध्यायातून शिकलेल्या गोष्टींचा संक्षिप्त सारांश एका टिपणवहीत लिहून ठेवला. ते आव्हानात्मक होते व तिने विचार केला त्यापेक्षा अधिक वेळ तिला लागला. परंतु, तिचे संपूर्ण पुस्तकाचे वाचन पूर्ण झाले तेव्हा पवित्र शास्त्र संदेशाच्या सत्यतेने ती भारावून गेली.

शिकण्यास नेहमी उत्सुक असा

यहोवाच्या आधुनिक दिवसातील पुष्कळ सेवकांना आधीच “प्रभूच्या कामात पुष्कळ काम” आहे. (१ करिंथकर १५:५८, NW) सुधारित आराखड्यामुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे, विशिष्ट आठवड्याचा तुमचा जो नित्यक्रम आहे त्यामध्ये फारसा काही बदल होणार नाही. तरीही, सत्याची समज प्राप्त करण्याची तुमची सातत्याची उत्सुकता व यहोवाच्या उद्देशांचा उलगडा यासोबत तुम्ही स्वतः पूर्णपणे मेळ घातला तर, तुमच्या अभ्यासाच्या सवयींमध्ये बदल करण्यास ते तुम्हाला मदत करील.

ज्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या नमुन्यात फेरबदल केला, अशांना मिळालेल्या मोबदल्यांविषयी ऐकणे उत्तेजनकारक आहे. एका ख्रिस्ती माणसाने, सत्याची सखोल समज प्राप्त करण्यात त्याची सकारात्मक मनोवृत्ती गमावत आहे हे ओळखले. यास्तव, त्याने त्याच्या नित्यक्रमाची अशारीतीने व्यवस्था केली की जेणेकडून त्याला अधिकतेने, व्यक्‍तिगत अभ्यासासाठी त्याचा फावला वेळ खर्च करण्यास मिळू शकेल. तो म्हणतो, “मला पूर्वी माहीत नव्हता तेवढा आनंद यात मिळाला आहे. पवित्र शास्त्राच्या ईश्‍वरी लेखकत्वामध्ये वाढत्या आत्मविश्‍वासामुळे मी माझ्या विश्‍वासाविषयी इतरांसोबत खऱ्‍या उत्साहाने बोलू शकतो हे मला दिसून आले. माझे उत्तमप्रकारे पालनपोषण होत आहे, मी आध्यात्मिकरीत्या निरोगी आहे, व प्रत्येक दिवसाच्या शेवटी समाधानी असल्यासारखे मला वाटते.”

अनेक मंडळ्यांना भेटी देणारे यहोवाच्या साक्षीदारांचे एक प्रवासी पर्यवेक्षक यांनी, आणखी इतर फायद्यांबद्दलचे अशारीतीने वर्णन केले: “जे परिश्रमपूर्वकतेने व्यक्‍तिगत अभ्यास करतात ते सर्वसामान्यपणे त्यांच्या बोलण्यात उत्साहपूर्ण व जोमदार असतात. ते इतरांसोबत खूप चांगले वागतात, व इतरांकडून आलेल्या नकारात्मक टीकांनी सहजपणे डळमळत नाहीत. क्षेत्र सेवेत असताना, ते स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेतात तसेच, ज्या लोकांना ते भेटतात त्यांच्या गरजांविषयी ते जागृत असतात.”

ते पुढे आणखी एक मुद्दा सांगू इच्छितात, जो काहींना त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाच्या नमुन्याचे परीक्षण करताना लक्षात ठेवण्यास आवडेल. “सभेत शास्त्रवचनांवर चर्चा होत असता, त्यांची विवेचने, छापलेल्या प्रकाशनातून थेट वाचून दाखवण्याचा कल असतो. आपण आधी काय शिकलो किंवा आपल्या व्यक्‍तिगत जीवनासोबत त्या साहित्याचा कसा संबंध आहे, यावर त्यांनी मनन केले तर त्याचा त्यांना अधिक लाभ होईल.” या बाबतीत तुम्ही सुधारणा करू शकता असे तुम्हाला वाटते का?

संदेष्टा दानीएलाला त्याच्या वयाच्या ९० वर्षांनंतर सुद्धा, यहोवाच्या मार्गांविषयी स्वतःला पुरेशी समज प्राप्त झाली आहे असे वाटले नाही. त्याच्या शेवटल्या वर्षांमध्ये, त्याला पूर्णपणे आकलन करता येत नसलेल्या एका गोष्टीविषयी त्याने विचारले: “हे माझ्या स्वामी, या गोष्टींचा परिणाम काय?” (दानीएल १२:८) देवाच्या सत्याबद्दल आणखी शिकण्याची त्याची अटळ उत्सुकता, त्याच्या जीवनातील महत्त्वाच्या मार्गादरम्यान त्याच्या उत्कृष्ट सत्वनिष्ठेची गुरुकिल्ली होती.—दानीएल ७:८, १६, १९, २०.

यहोवाच्या प्रत्येक सेवकाला त्याचा साक्षीदार म्हणून दृढ उभे राहण्याची जबाबदारी काही कमी नाही. स्वतःला आध्यात्मिकतेत दृढ ठेवण्याचे शिकण्यासाठी नेहमी उत्सुक असा. तुमच्या आठवड्याच्या, महिन्याच्या किंवा वर्षाच्या व्यक्‍तिगत अभ्यासाच्या आराखड्यात एक किंवा दोन नवी वैशिष्ट्ये वाढवा. तेव्हा, तुम्ही केलेल्या सर्वात छोट्याशा प्रयत्नात देव तुम्हाला कसा आशीर्वाद देतो ते पाहा. होय तुमच्या व्यक्‍तिगत अभ्यासाचा आणि त्यातून येणाऱ्‍या परिणामांचा आनंद लुटा.—स्तोत्र १०७:४३.

[तळटीपा]

a तुमच्या विस्तृत अभ्यासाचा आधार म्हणून, तुम्हाला वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवर सूक्ष्मज्ञान (इंग्रजी) खंड १, पृष्ठ ४६४-६ या पुस्तकातील तक्त्याचा वापर करावयास आवडेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा