वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९५ पृ. १
  • सर्वदा अधिकाधिक करण्यास आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वदा अधिकाधिक करण्यास आहे
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही फारच व्यग्र आहात का?
    आमची राज्य सेवा—१९९६
  • इतरांविषयी व्यक्‍तीगत आस्था दाखविणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • प्रचार कार्यास ते अडखळण आहे का?
    आमची राज्य सेवा—२००१
  • माघार घेऊ नका—व्यस्त असतानाही
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km १/९५ पृ. १

सर्वदा अधिकाधिक करण्यास आहे

१ यहोवाचे लोक व्यग्र लोक आहेत. आपल्याला कुटुंब, नोकरी आणि शाळेसंबंधी पुष्कळ जबाबदाऱ्‍या आहेत. त्याहूनही अधिक म्हणजे, “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करण्यास असते. (१ करिंथ. १५:५८) आपण मंडळ्यांच्या साप्ताहिक सभांची तयारी केली पाहिजे आणि त्यांना उपस्थित राहिले पाहिजे. क्षेत्र सेवेत काहीही सहभाग न घेता आठवडा असाच जाऊ देऊ नये असे आपल्याला उत्तेजन देण्यात येते. व्यक्‍तिगत तसेच कौटुंबिक बायबल अभ्यासासाठी पुरेसा वेळ नियमितपणे राखून ठेवला पाहिजे. वडिलांना तसेच सेवा सेवकांना मंडळीच्या पुष्कळ नेमणूका असतात. काही वेळेस, गरजवंत अशा योग्य जणांना मदत करण्यास आपल्याला सांगितले जाते.

२ काहीवेळा, कराव्या लागणाऱ्‍या या सर्व कामांमुळे आपल्याला व्यापून गेल्यासारखे वाटू शकते. तरीही, समतोल आणि उचित दृष्टिकोन राखल्यास, सर्वात व्यग्र लोक सर्वात आनंदी लोकांपैकी होऊ शकतात.—उप. ३:१२, १३.

३ प्रेषित पौलाजवळ अधिकाधिक काम करण्यास होते. तंबू बनविण्याचे ऐहिक काम करून स्वतःच्या वैयक्‍तिक गरजा भागवून त्याने इतर प्रेषितांपेक्षा अधिक परिश्रम केले. त्याने न थकता सुवार्तिकाचे कार्य करून सार्वजनिकरित्या आणि घरोघरी जाऊन प्रचार केला. पण त्याच वेळी, तो कळपाचा मेंढपाळ या नात्याने त्याच्या जबाबदाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करीत नव्हता. (प्रे. कृत्ये २०:२०, २१, ३१, ३४, ३५) पौलाचा आराखडा व्यग्र असतानाही, तो यहोवाच्या सवेत अधिक करण्यासाठी उत्सुक होता.—पडताळा रोमकर १:१३-१५.

४ शक्‍तीसाठी यहोवावर विसंबून राहून पौलाने त्याचा समतोल आणि आनंदी अंतःकरण राखले. आपली सेवा त्याला फलदायक आणि समाधानकारक अशी वाटली. (फिलिप्पै. ४:१३) देव त्याचे कार्य विसरणार नाही हे त्याला ठाऊक होते. (इब्री. ६:१०) यहोवाला जाणण्यास इतरांची मदत करण्याच्या आनंदाने त्याला शक्‍ती दिली. (१ थेस्सलनी. २:१९, २०) बायबलवर आधारलेली त्याची आशा जाणण्याच्या खात्रीने त्याला मेहनती राहण्यास प्रवृत्त केले.—इब्री. ६:११.

५ आपल्या परिश्रमांमुळे परिणामित होणाऱ्‍या चांगल्या गोष्टींचाही आपण विचार केला पाहिजे. साप्ताहिक सभांमधील आपली उपस्थिती आणि सहभाग इतरांची उभारणी करते आणि उत्तेजन देते. (इब्री. १०:२४, २५) सर्वांपर्यंत सुवार्ता पोहंचवण्याच्या आपल्या मनःपूर्वक प्रयत्नांमुळे आस्था उत्पन्‍न होते आणि नवोदित आपल्यासोबत सहवास राखतात तेव्हा मंडळीची वृद्धी होण्यास हातभार लागतो. (योहा. १५:८) गरजवंत जणांना साहाय्य दिल्याने, मंडळीत जवळीक व कौटुंबिक आत्मा वाढतो. (याको. १:२७) शिवाय, पौलाप्रमाणे आपण कधीही विसरू नये की, लाभदायक कार्यात व्यग्र राहणे हे यहोवा देवाला संतुष्ट करणारे आहे. त्याची सेवा करणे म्हणजे एक महान विशेषाधिकार आहे असे आम्ही समजतो. आपल्यासाठी जीवनाचा यापेक्षा इतर कोणताही उत्तम मार्ग नाही!

६ अधिकाधिक करण्यामध्ये आणखी एक लाभ आहे. आपण आरोग्यदायक आध्यात्मिक नित्यक्रम अनुसरण्यात व्यग्र असतो तेव्हा वेळ लवकर निघून जाते. प्रत्येक दिवस उलटतो तसे आपण नवीन जगाच्या समीप आहोत असे कळाल्यावर, आता उपभोगत असलेले उद्देशपूर्ण जीवन आपण आनंदाने स्वीकारतो. आपण व्यग्र राहण्याचीही सुज्ञता ओळखतो कारण आपल्याला व्यर्थ जगिक ध्येयांमध्ये गुंतण्यास अधिक वेळ नसतो.—इफिस. ५:१५, १६.

७ निश्‍चितच, प्रभूच्या कामात अधिकाधिक करण्यास पुष्कळ आहे. परंतु आपली सेवा तजेलादायक आणि फलदायक करणाऱ्‍या यहोवा देवावर व येशू ख्रिस्तावर आपण विसंबून राहू लागलो, तर आपण आनंदी राहू शकतो.—मत्त. ११:२८-३०; १ योहा. ५:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा