तुमच्या शिकवणीकडे सतत लक्ष द्या
१ ईश्वरशासित सेवा प्रशालेचा नवीन कार्यक्रम जानेवारी १९९५ मध्ये सुरू होईल. इंग्रजी प्रशालेचा आराखडा वापरणाऱ्या मंडळ्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या बहुतेक बोधपर भाषणांसाठी, यहोवाच्या आधुनिक दिवसातील संघटनेचा उत्तेजक इतिहास हा चर्चेचा विषय असेल. त्या वर्षादरम्यान, त्या मंडळ्यांमध्ये जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंग्डम या पुस्तकाच्या १७८ पृष्ठांचा विचार केला जाईल. प्रोक्लेमर्स पुस्तकातील बोधपर भाषणानंतर उजळणी प्रश्न नसल्यामुळे आपल्या शिकवणीकडे लक्ष देण्यासाठी आणि फायदे वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?—१ तीम. ४:१६.
२ पुष्कळांनी प्रोक्लेमर्स पुस्तक वाचले असले तरी, प्रशाला आराखड्यातील साहित्य विचारात घेतल्याने सर्वांना त्यांच्या ईश्वरशासित वारसाची अधिक गुणग्राहकता बाळगण्यासाठी मदत मिळेल. (स्तोत्र ७१:१७, १८) प्रत्येक आठवडी प्रोक्लेमर्स पुस्तकातील नेमलेल्या साहित्याची उजळणी करण्यासाठी काही वेळ बाजूला का राखू नये?
३ उत्साहपूर्ण आणि मनोरंजक बोधपर भाषणे: प्रोक्लेमर्स पुस्तकातील बोधपर भाषणे उत्साहपूर्ण व मनोरंजक पद्धतीने सादर केली पाहिजेत. त्यांनी त्यातील माहितीचे व्यावहारिक मूल्य देखील दाखवले पाहिजे. यहोवाच्या संघटनेबद्दल अधिक आदर आणि देवाचे सेवक या नात्याने आपल्या विशेषाधिकारांबद्दल अधिक गुणग्राहकता वाढवण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. प्रशालेसाठी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने प्रोक्लेमर्स पुस्तकाची एक प्रत सभेला आणली तर, कुटुंबातील सदस्य बोधपर भाषणाचा अर्थ चांगल्यारितीने समजू शकतात आणि पुस्तकातील चित्रे व फोटोंचा अधिक लाभ मिळवू शकतात. प्रादेशिक भाषेतील प्रशालेचे आराखडे वापरणाऱ्या मंडळ्या १९९४ मध्ये केले त्याचप्रमाणे एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य या पुस्तकाचा वापर करतील.
४ विचारास प्रवृत्त करणारे बायबल वाचन: अर्थावर जोर देऊन व भावनेसहित चांगल्या पद्धतीने वाचणे, हा परिणामकारी शिकवण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. शिवाय, भाषण क्र. २ मध्ये वाचण्यासाठी नेमून दिलेले साहित्य जास्त नाही आणि बहुधा वक्त्याला प्रस्तावनेची आणि समारोपाची विवेचने देण्याकरता पुष्कळ वेळ असतो. प्रस्तावनेने नेमलेल्या साहित्यात आस्था उद्दीपित केली पाहिजे आणि त्याचे व्यावहारिक मूल्य समजण्यासाठी श्रोत्यांना तयार केले पाहिजे. समारोपामध्ये स्पष्टीकरण करणाऱ्या विवेचनांचे आणि साहित्याचा अवलंब यांचा समावेश असू शकतो. त्याचप्रमाणे वक्ता दिलेल्या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो.
५ प्रशाला कार्यक्रमाबद्दल आणि नेमणूका कशा हाताळाव्यात याबद्दल अधिक माहिती “१९९५ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला आराखडा” यात मिळू शकेल. आपण बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या कलेत सुधारणा करण्यासाठी या साहित्यातील सूचनांची उजळणी करून, आपल्या नेमणूकांची चांगली तयारी करून व दिलेल्या सल्ल्याचा अवलंब करून आपल्या शिकवणीकडे लक्ष देतो. अद्याप प्रशालेत नाव न नोंदवलेल्यांना तसे करण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण दिले जात आहे.