घोषणा
▪ साहित्य सादरता
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात. हे प्रकाशन साठ्यात उपलब्ध नसल्यास किंवा परिस्थितीमुळे पर्यायी सादरता करावी लागल्यास, तुम्ही कदाचित माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकांना त्याच अनुदानात (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांना) सादर करू शकता.
जानेवारी: जुन्या १९२-पृष्ठांच्या पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ८.०० रुपयांच्या अनुदानात. आमच्याजवळ या प्रकारातील खालील पुस्तके उपलब्ध आहेत: इंग्रजी: डीड मॅन गेट हियर बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? कन्नड: “तुझे राज्य येवो” आणि “थिंग्स इन व्हीच इट इज इम्पॉसिबल फॉर गॉड टू लाय;” गुजराती: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; तामिळ: “तुझे राज्य येवो” आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; तेलगू: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; मराठी: “तुझे राज्य येवो” आणि थोर शिक्षकाचे ऐका; हिंदी: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता आणि “तुझे राज्य येवो.” आपल्या समस्या माहितीपत्रक किंवा दुसरे एखादे माहितीपत्रक केवळ नेपाळी, पंजाबी किंवा बंगाली भाषा जाणणाऱ्या व्यक्तींना सादर केले जाऊ शकते. मल्याळम भाषेत युवर युथ—गेटींग द बेस्ट आऊट ऑफ इट! हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. हे पुस्तक खास किंमतीच्या दरात सादर करावयाचे नाही याची कृपया नोंद घ्या.
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात (लहान आकाराचे २५.०० रुपयांना आहे). या पुस्तकाचे वाटप केल्यावर, पुनर्भेटी करण्याद्वारे त्याचा मागोवा घेतला पाहिजे आणि बायबल अभ्यास सुरु करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मार्च: क्वेशन्स् यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (हे पुस्तक इंग्रजी, मल्याळम आणि तामिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे). इतर भाषांमध्ये नवीन १९२-पृष्ठांची कोणतीही पुस्तके १५.०० रुपयांच्या नियमित अनुदानात सादर केली जाऊ शकतात.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठवली नाही, त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-14) यावर पाठवावी.
▪ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने, डिसेंबर १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर, मंडळीत त्याची घोषणा करा.
▪ १९९५ चे वार्षिक वचन असे आहे: ‘प्रेमाने एकमेकांशी एकवाक्यतेत बांधले जा.’—कलस्सै. २:२. मंडळ्या नवीन वार्षिक वचनाची पाटी तयार करू शकत असतील तर बरे असेल, जेणेकरून ते जानेवारी १, १९९५ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर ती लावू शकतात.
▪ या महिन्यात प्रत्येक मंडळीला १९९५ मध्ये वापराकरता सेवा फॉर्म्सचा साठा पाठवण्यात येत आहे आणि “वार्षिक सेवा फॉर्म्स” यांची किंमत तुमच्या डिसेंबरच्या विवरणपत्रात दिली जाईल. या फॉर्म्सना वाया घालवू नका. त्यांच्या ठराविक उद्देशासाठीच त्यांचा उपयोग करावा. तुम्हाला पाकीट मिळताच कृपया फॉर्म्स मोजा आणि फॉर्म्ससोबत दिलेल्या तपासणी यादीत दाखवल्यानुसार, त्यांचा वापर करणाऱ्या मंडळीतील बांधवाला किंवा विभागामध्ये त्यांचे वितरण करा. कोणताही फॉर्म किंवा फॉर्म्सचा साठा १९९५ साठी पुरेसा नाही असे तुम्हाला वाटल्यास, कृपया तुमच्या पुढील गरजांसाठी तत्काळ, किंवा जानेवारी १९९५ मध्ये मागणी करा. डिसेंबर १९९५, च्या शेवटापर्यंत पुरेल इतकीच मागणी करा कारण तोपर्यंत तुम्हाला तुमचा पुढील साठा मिळेल.
▪ सेवा फॉर्म्ससोबत रुम रिक्वेस्ट फॉर्म्सचा साठा आहे. ते १९९५ च्या प्रांतीय अधिवेशनांच्या उपयोगासाठी आहेत, यास्तव कृपया तोपर्यंत यांना सुरक्षित ठेवा. येथूनपुढे वार्षिक फॉर्म्सच्या साठ्यासोबतच रुम रिक्वेस्ट फॉर्म्स पाठवले जातील.
▪ आता एक नवीन वॉचटावर पब्लीकेशेन्स् कॉस्ट लिस्ट तयार करण्यात आली असून प्रत्येक मंडळीला वार्षिक सेवा फॉर्म्सच्या पाकीटात त्याच्या चार प्रती पाठवल्या जात आहेत. सचिव तसेच साहित्य, नियतकालिके आणि जमाखर्चाची देखभाल करणाऱ्या बांधवांना त्यांचे वितरण करावे.
▪ जानेवारी १, १९९५ पासून बंगाली, गुजराती, हिंदी आणि नेपाळी टेहळणी रुज आवृत्त्या मासिक नियतकालिकांपासून पाक्षिक नियतकालिकांमध्ये बदलल्या जातील.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
इंग्रजी: टेहळणी बुरुज आणि सावध राहा! नियतकालिकांचे १९९३ चे खंड. पायनियर आणि प्रचारकांसाठी हे प्रत्येकी ९०.०० रुपायांना आहे; तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल—मोठ्या आकाराची सुधारित आवृत्ती (अमेरिकेत छापलेली). तेलगू: ऑर्गनाईझ्ड टू अकंप्लिश आवर मिनिस्ट्री.
▪ पुन्हा उपलब्ध असणारी प्रकाशने:
इंग्रजी: जेहावाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंग्डम. जराती आणि मराठी: मरणावर विजय—तो तुम्हाकरता शक्य आहे का? बंगाली: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा.
▪ साठा नसलेली प्रकाशने:
मल्याळम: जीवनाचा उद्देश काय आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल?