सर्वश्रेष्ठ मनुष्याचे अनुसरण करण्यास इतरांना आमंत्रण द्या
१ मत्तय ५:१४ मध्ये लिहिल्याप्रमाणे, येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “तुम्ही जगाचा प्रकाश आहा.” येशूच्या अनुयायांना यहोवाच्या राज्याबद्दल आणि येशूद्वारे तारणासाठी केलेल्या त्याच्या प्रेमळ तरतूदीबद्दल सगळीकडे जाऊन सांगावयाचे होते. ती नेमणूक लक्षात ठेवून, आपण डिसेंबरदरम्यान सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करण्याची वाट पाहात आहोत. तुम्हाला कदाचित वापरण्यास आवडतील अशा काही सूचना येथे आहेत.
२ स्वतःचा परिचय दिल्यावर, तुम्ही खाली सुचवलेली गोष्ट तुमच्या स्वतःच्या शब्दात मांडू शकता:
▪“येशू या पृथ्वीवर मनुष्य या नात्याने जगत होता तेव्हा तो कशाप्रकारची व्यक्ती होता याबद्दल पुष्कळांना आश्चर्य वाटले आहे. तो इतरांपासून कोणत्या प्रकारे वेगळा होता असे तुम्हाला वाटते? [उत्तरासाठी वाव द्या.] सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे आकर्षविणारे पुस्तक, त्याच्या जीवन आणि सेवेविषयीच्या ठळक गोष्टींबद्दल सांगते. तो ज्याप्रकारची व्यक्ती होता त्याबद्दल ते समज पुरवते. त्याचे वाचन केल्यावर, व्यक्तिगतरित्या त्याच्याशी सहवास ठेवण्याची, त्याच्या दुःखात सहभागी होण्याची आणि प्रत्यक्षात त्याची सेवा निरखून पाहण्याची त्यांना संधी प्राप्त झाली असे काहींना वाटते.” त्या पुस्तकातील शीर्षकास दाखवणाऱ्या पहिल्या चित्राकडे निर्देश करा. त्यानंतर, प्रस्तावनेकडे वळा आणि “त्याच्याबद्दल माहिती शिकून घेऊन लाभ मिळवून घ्या,” या उपशिर्षकाखालील दुसरा परिच्छेद वाचा. त्यानंतर ते पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात सादर करा.
३ किंवा तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
▪“नाताळाच्या वेळी आपण येशूबद्दल पुष्कळ गोष्टी ऐकतो. तथापि, जगात इतक्या वाईट गोष्टी घडत असल्यामुळे, येशू खरोखरच आपली काळजी घेतो का किंवा तो आपल्यासाठी काही करू शकतो का असा विचार काहीजण करतील. त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?” उत्तरासाठी वाव द्या. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील अध्याय २४ काढा आणि येशू पृथ्वीवर का आला याची संक्षिप्त रुपात चर्चा करा. त्यानंतर, योहान १५:१३ वाचा आणि येशूच्या इतरांबद्दलच्या अंतःकरणपूर्वक प्रेमावर जोर द्या. पुस्तक न स्वीकारल्यास, सादर करण्यासाठी अलिकडील नियतकालिक, एखादे माहितीपत्रक किंवा उचित पत्रिका जवळ बाळगण्याचे लक्षात असू द्या.
४ येथे आणखी एक सूचना आहे:
▪“पुष्कळ तरुण लोक अनुकरण करण्यासाठी आदर्श शोधीत आहेत परंतु, चांगले आदर्श मिळणे कठीण आहे. येशू ख्रिस्ताने सर्वांसाठी एक परिपूर्ण उदाहरण मांडले. [१ पेत्र २:२१ वाचा.] त्याचे संपूर्ण जीवन त्याच्या स्वर्गीय पित्याच्या उपासनेवर केंद्रित होते. अधिक लोकांनी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर ते कसे असेल असे तुम्हाला वाटते?” उत्तरासाठी वाव द्या. त्याच्या खास गुणांचे वर्णन देणाऱ्या पुस्तकाच्या शेवटून दुसऱ्या पृष्ठावरील तिसऱ्या परिच्छेदाचा संदर्भ घ्या. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक आम्हासर्वांना उत्तम व्यक्ती बनण्यात कशी मदत करू शकते हे समजावून सांगा.
५ तुम्हाला असे काही वापरावेसे वाटेल:
▪“जेव्हा एखादा येशू ख्रिस्ताचा उल्लेख करतो तेव्हा, पुष्कळ लोक त्याच्याबद्दल तो बालक असल्याचा किंवा मरायला टेकलेला दुःखित मनुष्य असल्याचा विचार करतात. येशू ख्रिस्ताबद्दल त्यांची कल्पना केवळ त्याचा जन्म आणि त्याचा मृत्यू एवढीच आहे. त्याच्या जीवनमानात त्याने सांगितलेल्या आणि केलेल्या अद्भुत गोष्टी बहुधा दुर्लक्षिल्या जातात. त्याने जे साध्य केले त्याचा परिणाम या पृथ्वीवर राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीवर होतो. यास्तव, त्याने आम्हाखातर केलेल्या सुंदर गोष्टींबद्दल आपण होता होईल तितके शिकावे हे अत्यावश्यक आहे.” योहान १७:३ वाचा. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील प्रस्तावनेकडे वळा आणि चवथा परिच्छेद वाचा. पुस्तक सादर करून व्यक्तिगत अभ्यासासाठी त्याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो हे समजावून सांगा.
६ आस्थेची आणि वाटपाची नोंद ठेवण्याची खात्री करा जेणेकरून तुम्ही पुनर्भेटी देऊन मागोवा घेऊ शकता. अजूनही वेळ असल्याने, आपण प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांचा आवेशाने शोध घेऊ या व आपला तारणारा, येशू ख्रिस्त याचे अनुयायी बनण्यास त्यांची मदत करू या.—मत्त. १६:२४.