जुलैमध्ये प्रभावीपणे माहितीपत्रकांचा वापर करणे
१ शिष्य बनविण्याचे काम त्वरीत होण्यासाठी, संस्थेने उदारतेने विविध प्रकाशने पुरविली आहेत. त्यांमधली काही माहितीपत्रके आहेत जी पृथ्वीसाठी देवाचा उद्देश, त्रैक्य, देवाचे नाम, राज्य सरकार, आणि दुष्टाईला देवाने दिलेली परवानगी यासारखे विशिष्ट विषय हाताळतात. आमच्या क्षेत्रातील लोकांना मदत करण्यासाठी माहितीपत्रकांचा प्रभावीपणे आम्ही कसा उपयोग करू शकतो?
२ आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक दु:खापासून मुक्त असलेले नवे जग जवळ असल्याचे वर्णन करते. ते आम्ही कसे सादर करू शकतो? रिझनिंग पुस्तकामध्ये पृ. ३९३ वर चालू होणारा मुख्य पोटमथळा “सफरींग” याच्याखाली काही प्रस्ताव सापडतील, किंवा पृ. १२ वरील “इंजस्टिस/सफरींग” या मथळ्याखालच्या प्रस्तावनेचा तुम्ही उपयोग करू शकता.
३ तुम्ही म्हणू शकता:
▪“‘मानवांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या आणि दु:ख याबद्दल देवाला खरोखरी काळजी आहे का या प्रश्नाचा तुम्ही कधी विचार केलात का?’” प्रतिसादास वाव द्या. स्तोत्र ७२:१२-१४ वाचा. यानंतर आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? या माहितीपत्रकाचे पृ. ८ उघडा व त्या पानावरील ठळक शीर्षकाखालील मुद्यांची तसेच, पृ. १८ वर भवितव्यासाठी आमच्या आशेबद्दलची चर्चा करा. माहितीपत्रक घेण्यास नकार दर्शविला तर, कम्पफर्ट फॉर द डिप्रेस्ड किंवा शांतीदायक नवीन जगातील जीवन ह्या पत्रिका सादर करू शकता.
४ चांगले सरकार आज काळजीचा विषय बनला आहे. मानवी सरकार जगाला एकत्रित करेल की नाही याचा अनेक जण विचार करत आहेत. रिझनिंग पुस्तकाच्या पृ. १५२ वर चालू होणाऱ्या “सरकार” ह्या विषयाखाली मदत देणारी माहिती मिळते.
५ तुम्ही विचारू शकता:
▪“चिरकाल आनंद आणणाऱ्या एका सरकाराची स्थापना करण्यासाठी मानवांना शक्य आहे का?” उत्तरासाठी वेळ द्या, आणि मग विचारा: “मानवी इतिहासाचा अहवाल काय शाबीत करतो?” यिर्मया १०:२३ उघडा, किंवा रिझनिंग पुस्तकाचे पृ. १५२ उघडा आणि उचित शास्त्रवचने आणि विवेचन वाचा. त्यानंतर, सरकार माहितीपत्रकाच्या पृ. २४ आणि २५ उघडून चित्र आणि शास्त्रवचनांवर विचार करा. देवाचे सरकार गोलार्धव्याप्तरीतीने लोकांना एकत्रित कसे करेल याचे स्पष्टीकरण द्या. घरमालकाने माहितीपत्रकाचा स्वीकार केले नाही तर, तुम्ही वील थीस वर्ल्ड सरवाईव? ही पत्रिका सादर करू शकता.
६ तुमच्या शेजारी गुन्ह्याची भीती असल्यास, पुढील प्रस्तावना उचित असेल.
७ तुम्ही म्हणू शकता:
▪“पुष्कळ लोकांना याचे आश्चर्य वाटते की, ‘जर देव प्रीती आहे, तर त्याने दुष्टाईला परवानगी का दिली?’ याबद्दल तुम्हालाही आश्चर्य वाटले आहे का?” त्यांच्या विवेचनास वाव द्या आणि मग म्हणा: “लोक करत असलेल्या दुष्टाईबद्दल देवाला दोषी ठरविण्याविरुद्ध नीतीसूत्रे १९:३ इशारा देते ते नीट लक्ष देऊन पाहा.” वचन वाचल्यानंतर, “पहा! मी सर्व काही नवे करतो” ह्या माहितीपत्रकाच्या पृ. १५ वर लक्ष आकर्षित करा आणि परिच्छेद २७ वाचा. पुढील परिच्छेदांची चर्चा करण्याकडे ते निरवील.
८ मेंढरासमान लोकांना सुवार्तेचे शिक्षण देण्यासाठी माहितीपत्रकांचा उपयोग करण्याचे काम आम्ही सर्वजण करू शकतो. देवाच्या संस्थेशी संगती ठेवण्यासाठी जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोकांना मदत देऊ शकतो. आमच्या समयोचित माहितीपत्रकांचा प्रभावीपणे उपयोग करत असता क्षेत्र कार्यात भाग घेण्याचा हा आमचा सुहक्क आहे.