तुम्ही ते करू शकाल का?
१ तुम्ही विचाराल, ‘काय करू शकाल?’ नीतीसूत्रे ३:२७ याचे उत्तर देते: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.” तुमचे कार्य वाढविण्याचे व सहाय्यक किंवा नियमित पायनियरींग मध्ये भाग घेण्याचे तुमच्या “अंगी सामर्थ्य” आहे का? तुम्ही ते करू शकाल का?
२ भारतामध्ये सरासरीने १,५०१ खास, नियमित आणि सहाय्यक पायनियर होते, ८ प्रचारकां मागे १ असे प्रमाण होते असे १९९३ वार्षिकपुस्तक यामध्ये वाचणे किती उत्तेजक होते. होय, मागील वर्षी १०० व्यर्क्तिनी नियमित पायनियर सेवेमध्ये प्रवेश केला. प्रत्येक तीन दिवसाला एका प्रचारकाने त्याच्या परिस्थितीचे परीक्षण केले व तो क्षेत्र सेवेमध्ये आणखी काही करू शकतो हे त्यास कळून आले हे यावरून दिसते.
३ सहाय्यक पायनियरींग दुसऱ्यांसाठी काहीतरी भले करण्याचा एक मार्ग आहे. मागच्या वर्षी सहाय्यक पायनियरांचा उच्चांक १,१९८ होता. हे फारच उत्तम आहे. अनेक प्रचारक संपूर्ण वर्षभरात सहाय्यक पायनियरींग करण्याचे मार्ग शोधत आहेत.
४ तुम्ही ते “करू शकाल” की नाही याचा निश्चय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या हृदयापासूनच्या इच्छा विचारात घेणे आवश्यक आहे. (मत्त. २२:३७-३९) प्रे. कृत्ये २०:३५ म्हणते: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” निसंशये, हृदयापासून आध्यात्मिक मदत उदारतेने देणाऱ्यांची ही योग्य इच्छा आहे. यशस्वी प्रचारक किंवा पायनियर होण्यासाठी, अशाच प्रकारच्या इच्छेची गरज आहे.
५ दुसरे, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवर विचार करा. पूर्ण वेळेसाठी काम करावयास तुमच्या दैनंदिन गोष्टींची व्यवस्था तुम्ही करू शकाल का? सर्वच करू शकत नाहीत. परंतु प्रार्थनापूर्वक स्वपरीक्षणानंतर, प्रत्येक वर्षी हजारोंना तसे “करण्याचे” मार्ग सापडतात. (कलस्सै. ४:५; w77 p. 701) उदाहरणार्थ, सहाय्यक पायनियरींग करण्याकरता कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी किंवा काहींसाठी विशिष्ट महिन्याची निवड काही कुटुंबे करतात. आणखी काही कुटुंबे त्यांच्यामधील एका सदस्याची नियमित पायनियर म्हणून योजना करतात. तुमच्या कुटुंबाने ह्या शक्यतेवर विचार केला आहे का?—नीतीसूत्रे ११:२५ पहा.
६ तुम्ही प्रचारक किंवा पायनियर या नात्याने काम करीत असला तरी, इतरांना सत्य ओळखण्यास मदत केल्यानेच खरे समाधान मिळते. आम्हाला माहीत आहे की जर आमच्या ‘अंगी सामर्थ्य’ आहे तर दुसऱ्यांचे भले करण्यातच खरा आनंद मिळतो.