मनाची एकाग्रता व नीतीमत्ता यांनी जीवन जगणे
१ आपण अशा जगात जीवन व्यतित करीत आहोत की जेथे अभक्तपणाचा जोरदार प्रभाव आहे. या व्यवस्थेचे दर्जे दिवसेंदिवस खालावत आहेत. (२ तीम. ३:३) ख्रिस्ती या नात्याने आपल्याला जे योग्य त्याबद्दल भूमिका ग्रहण घेऊन तसे का राहिले पाहिजे याबद्दल समज प्राप्त करून घेतली पाहिजे. पण यासाठी कोणते मार्गदर्शन व मदत उपलब्ध आहे? आम्ही कोणते दर्जे अनुसरावेत? “मनाची एकाग्रता व नीतीमत्ता यांनी जीवन जगणे” हा १९९३ सेवा वर्षामध्ये होणाऱ्या खास संमेलनाच्या कार्यक्रमाचा उत्तेजनदायक विषय आहे.—तीत २:१२.
२ आपण अभक्तपणा कसा टाळावा आणि जागतिक कल्पनांचा कसा त्याग करावा हे आपल्याला भाषणे, प्रात्यक्षिके व अनुभव याद्वारे शिकायला मिळेल. तसेच या दुष्ट जगात मनाची एकाग्रता आणि नीतीमत्ता याद्वारे कसे जगता येणे शक्य आहे हे देखील आपण पाहू. आमची मानसिक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी ज्या तरतूदी उपलब्ध आहेत त्या सांगण्यात येतील. (१ पेत्र ४:७) दुपारच्या कार्यक्रमात होणारी भाषणे व मुलाखती याकडे पालक व मुलांनी खासपणे लक्ष द्यावेसे वाटेल. यात ईश्वरी ज्ञान व अनुभवांची प्राप्ती आणि आनंदी ईश्वरशासित भविष्य उभारण्याकरता एकत्र मिळून काम करण्याची गरज यावर अधिक भर दिला जाईल.
३ अभक्त जगाने घेरलेलो असलो तरी देवाचे वचन आम्हाला, आम्ही कोणता सूज्ञ मार्ग चोखाळावा याबद्दल सूचना करते. पवित्र शास्त्रीय सूचनांच श्रवण लाभदायकरित्या करण्याचे महत्त्व “आनंदविरहीत जगात आपल्या आशीर्वादांना उजाळा द्या” या भाषणात विवेचीत केले जाईल. आपण या संमेलनाला उपस्थित राहण्याच्या तयारीत असता हे लक्षात ठेवू की, कार्यक्रम नीट ऐकून मिळालेल्या सूचनांचा अवलंब करणे या गोष्टी यहोवाची आमची सेवा अधिक प्रभावकारी होण्यास साहाय्यक ठरतील.—फिलिप्पै ३:१५, १६.