देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे
१ पुष्कळ लोकांपाशी पवित्र शास्त्र असले तरी ते त्याचा देवाचे वचन या अर्थाने स्वीकार करीत नाहीत; बहुतेक जण तर त्यातील सूज्ञ सल्ला अवलंबीत नाहीत; त्यामुळे खूपच कमी लोकांना त्याचा लाभ मिळतो. तथापि, यहोवाचे लोक ते देवाचे वचन असून सर्व गोष्टींसाठी लाभदायक आहे असे मानतात. (२ तीमथ्य ३:१६) या कारणास्तव १९९३ च्या कार्यवर्षासाठी होणाऱ्या विभागीय संमेलनाचे शीर्षक “देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे” हे असेल.
२ आम्हास उत्तेजन मिळावे, आमची देवाच्या वचनाबद्दलची कदर अधिक वाढावी आणि आमच्या जीवनाच्या हर प्रकारात त्याचा अधिक अवलंब करता यावा म्हणून विविध भाषणे, प्रात्यक्षिके, प्रहसन, अनुभव, आणि मुलाखती असतील. कौटुंबिक वर्तुळाच्या अनुषंगाने करमणूक, सहवास आणि भौतिकता याबद्दल शनिवारी दुपारच्या कार्यक्रमात विचारविनिमय होईल. तो आम्हाला, आम्ही या जगापासून कसे वेगळे असले पाहिजे, आणि त्याच्या वाईट प्रथा, अप्रासंगिक गोष्टी किंवा वाईट भाषा यांना का अनुसरु नये हे दाखवील. याखेरीज एकटे पालक आणि अनाथ मुलांच्या लाभास्तव प्रोत्साहन देण्यात येईल.
३ याशिवाय, शनिवारी नव्यानेच समर्पण केलेल्या लोकांना बाप्तिस्म्याचे भाषण ऐकता येईल व त्यानंतर बाप्तिस्मा घेण्याची संधि आहे. या विभागीय संमेलनात बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपली इच्छा मंडळीच्या अध्यक्षीय देखरेख्यांना कळवली पाहिजे, म्हणजे त्यांना बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांसोबत बाप्तिस्म्याचे वर्ग घेण्याची योजना आखण्यास पुरेसा वेळ मिळू शकेल.
४ रविवार सकाळचा कार्यक्रम, आम्ही देवाच्या वचनाचा अवलंब केल्यामुळे कोणकोणत्या मार्गांनी आपल्याला या जगापासून वेगळे दाखवता येईल त्याचे परिक्षण करील. आमचे स्वरुप तसेच आमचे मन भ्रष्ट करणाऱ्या गोष्टी कशा टाळाव्यात हे ते काही विषय असतील. दुपारी प्रांतिय देखरेखे, “पवित्र शास्त्र अस्सल स्वरुपाचे आहे हे कशामुळे कळते?” या विषयावर जाहीर भाषण देतील. या सुंदर कार्यक्रमाला सर्व आस्थेवाईक लोकांना बोलावण्याची खात्री आपण राखली पाहिजे.
५ तुमच्या विभागीय देखरेख्यांमार्फत या विभागीय संमेलनाची तारीख व स्थळ कळविले जाईल. आम्ही तुम्हाला या संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे उत्तेजन देतो, यामुळे तुम्हाला देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे जमेल.—याकोब १:२२-२५.