संमेलन कार्यक्रमांची उजळणी करण्यासाठी नवीन व्यवस्था
सैतानाचे जग जसजसे रसातळाला जात आहे तसतसे यहोवा आपल्याला, ‘अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्तीने’ वागण्यासाठी मजबूत करत आहे. (तीत २:१३) वार्षिक विभागीय व खास दिवस संमेलन, ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ तो करत असलेल्या व्यवस्थांपैकी आहेत. (मत्त. २४:४५) हे आध्यात्मिक मेळावे किती मजबूत करणारे आहेत!
या संमेलनांमध्ये आपल्याला दिलेल्या सूचना आठवणीत राहाव्यात आणि आपण त्यांचे अनुकरण करावे म्हणून, या संमेलन कार्यक्रमांची उजळणी करण्यासाठी २००५ सेवा वर्षादरम्यान एका खास व्यवस्थेचा उपयोग करण्यात येईल. या पुरवणीच्या पान ५ व ६ वर, प्रत्येक संमेलन कार्यक्रमात काय सादर केले जाईल त्याची एक झलक दिली जाईल आणि उजळणी प्रश्न सादर केले जातील. मंडळ्या, त्यांना ज्या संमेलनांना उपस्थित राहायचे आहे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर या माहितीवर विचारविनिमय करतील. हे कसे करता येईल?
एखादी मंडळी विभागीय संमेलनाला उपस्थित राहण्याच्या एक किंवा दोन आठवड्यांआधी, सेवा सभेत “विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम” या लेखावर आधारित दहा मिनिटांचे भाषण दिले जाईल; यामुळे श्रोत्यांची कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढेल. वक्ता उजळणी प्रश्नांकडेही श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करेल आणि संमेलनानंतर काही आठवड्यांनी होणाऱ्या उजळणीच्या तयारीकरता नोंदी घेण्याचे सर्वांना उत्तेजन देईल.
संमेलनानंतर काही आठवड्यांनंतरच्या सेवा सभेत, संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची १५ मिनिटांची उजळणी असेल. त्यानंतरच्या आठवडी, संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची १५ मिनिटांसाठी उजळणी असेल. या पुरवणीत पुरवलेल्या उजळणी प्रश्नांवर आधारित या चर्चा होतील. या उजळणीत सादर केलेल्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सभांमध्ये या उजळणी सत्रांसाठी, मंडळीत वडील जन, सेवा सभेतील इतर भागांचा समय कमी करण्याचे, तो भाग गाळण्याचे किंवा कोणत्यातरी दुसऱ्या वेळी करण्याचे ठरवतील.
खास संमेलन दिवस कार्यक्रमाच्या बाबतीत हीच व्यवस्था असेल; फक्त फरक इतकाच असेल की संपूर्ण कार्यक्रमाची १५ मिनिटांची एकच उजळणी असेल. आपण सर्वांनी ही पुरवणी जपून ठेवली पाहिजे व यहोवा देत असलेल्या उत्तम शिक्षणातून पूर्णपणे लाभ मिळवण्याकरता तिचा उपयोग केला पाहिजे.—यश. ४८:१७, १८.