इतरांविषयी व्यक्तीगत आस्था दाखविणे
१ यहोवा इतरांविषयी आस्था राखून आहे याचा मुबलक पुरावा आहे. आपल्या निर्मितीच्या भौतिक गरजा त्याने उदारपणे पुरविल्या नाहीत का? (उत्पत्ती १:२९, ३०; २:१६, १७; मत्तय ५:४५; पडताळा लूक ६:३५.) अधिक म्हणजे, त्याने आमची पाप व मृत्युपासून सुटका व्हावी यासाठी तरतुद करून आपली व्यक्तीगत आस्था दाखविली नाही का?—योहान ३:१६.
२ येशू या पृथ्वीवर असताना त्याने इतरांविषयी आस्था दाखविण्याच्या बाबतीत आपल्या पित्याचे परिपूर्ण उदाहरण अनुसरले. (मत्तय ११:२८-३०; १ पेत्र २:२१) कुष्ठरोगाने पूर्णपणे भरलेला मनुष्य येशूला जेव्हा म्हणाला की, “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा,” तेव्हा येशूचे उत्तर होते, “माझी इच्छा आहे,” व त्याने त्या माणसाला बरे केले. (मत्तय ८:२, ३) नाईन गावाजवळ येत असता येशूला एका तरुण मुलाची प्रेतयात्रा जाताना दिसली. तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. येशूने दयेने भारावून जाऊन त्या मुलाला पुनरुत्थित केले. (लूक ७:११-१५) कोणी विचारले नाही, तरीही येशूने इतरांविषयी आपली व्यक्तीगत आस्था दाखविली. लहान मुलेही त्याचा काही वेळ घेत व त्याचे लक्ष आपल्याकडे ओढून घेत; शिवाय इतरांचे सांत्वन करण्यात व उत्तेजन देण्यात त्याने कधीही विसर पडू दिला नाही.—मत्तय २०:३१-३४; मार्क १०:१३-१६.
कुटुंब व मित्र
३ आम्ही देखील इतरांविषयी व्यक्तीगत आस्था दाखविण्याचे मार्ग शोधून यहोवा व येशू ख्रिस्तासारखे होण्याचा यत्न केला पाहिजे. हे कसे करता येईल याविषयीच्या काही सुसंध्या आपण पाहू.
४ एक सर्वथोर गरज ही की, बांधवांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत अस्सल अशी व्यक्तीगत आस्था घेतली पाहिजे व कुटुंबाच्या आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. यामध्ये कुटुंबासमवेत नियमाने अभ्यास करण्याचे समाविष्ट आहे. तुम्ही तुमच्या कौटुंबिक अभ्यासात मनोरंजक तसेच व्यावहारिक मोलाच्या साहित्याचा विचार करता का? तसेच आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासोबत मिळून क्षेत्रकार्य करण्याचा सराव तुम्ही अनुसरता का? तुम्ही करता तेव्हा तो वेळ आनंदात जातो का? तुम्ही आपल्या मुलांमध्ये इतरांना मदत देण्याकरवी ख्रिस्ती शेजारप्रेम प्रदर्शित करण्याची भावना उभारत आहात का? तुम्ही विवाहीत आहात व तुम्हाला मुले नसली तरी कौटुंबिक अभ्यास करण्याचा सराव आचरीत आहात का?
५ आम्ही शक्य आहे त्या सर्वांना आध्यात्मिक साहाय्य देण्याची इच्छा बाळगावी. पण आम्ही आमच्या कार्यमग्न जीवनात असता, आमच्या मंडळीतील खास गरजवंत असणाऱ्या बांधवांची काळजी करण्याविषयी विसरतो का? (नीती. ३:२७; गलती. ६:१०) ख्रिस्ती मंडळीत अनाथ मुले, वयस्कर लोक, विधवा, दुर्बळ, निराश झालेले, अपंग लोक आहेत व यांना काही खास गरज असते. आपण यहोवा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे अनुकरण करीत असता आमच्या सर्व बंधू-भगिनींविषयी व्यक्तीगत आस्था प्रदर्शित करण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.—१ करिंथ १०:२४; फिलिप्पै. २:४; इब्री. १३:१६.
क्षेत्रावरील मेंढरासमान लोक
६ आम्हासोबत घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास करणाऱ्या लोकांच्या बाबतीत आम्ही व्यक्तीगत आस्था कशी दाखवू शकतो? यापैकी पुष्कळांना जागतिक मित्रांचा सहवास तोडून टाकण्याची गरज दिसत आहे. आम्ही दरदिवशी मग्न असलो तरी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत व्यक्तीगत आस्था दाखवून, ज्यांनी आपणात बदल करून घेतला आहे अशांना आपले नवे मित्र म्हणून स्वागत करीत आहोत का? आम्ही जरी त्यांचा अभ्यास घेत नसलो तरी अशांच्या बाबतीत उत्तेजनाचा स्रोत ठरू शकतो का?—पडताळा मार्क १०:२८-३०.
७ सुवार्ता ऐकून घेण्याची इच्छा प्रदर्शित करणाऱ्यांच्या बाबतीत प्रांजळ अशी व्यक्तीगत आस्था दाखविण्यात तुम्ही अधिक सहभाग घेता का? त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याच्या बाबतीत तुम्ही त्यांना साहाय्य देणार का? तुम्हाला स्वतःला देखील क्षेत्रकार्यात अधिक सहभाग घेता येण्यासाठी काय करता येईल? अधिक पूर्णतेचा सहभाग घेण्याची संधी तुम्हाला आहे तर यात मागे पडू नका.—लूक ९:६०-६२.
८ इतरांच्या बाबतीत व्यक्तीगत आस्था दाखविण्यात आम्ही यहोवा व येशूचे अनुकरण केले पाहिजे. मदत देता यावी म्हणून आपण सहानुभूति दाखवली पाहिजे. हेच येशूने, कुष्ठरोगाने पूर्ण भरलेल्या माणसाच्या बाबतीत केले. होय, इतरांविषयी व्यक्तीगत आस्था दाखविण्याचे मार्ग शोधून काढण्यासाठी आपण नेहमीच सावधान असावे.