वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९१ पृ. ३
  • पुनर्भेटीकडे लक्ष देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुनर्भेटीकडे लक्ष देणे
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात
    आमची राज्य सेवा—२००३
  • पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • पुनर्भेट घेण्याची खात्री बाळगा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • थोडीशीही आवड दाखवतात, अशा सर्वांची पुन्हा भेट घ्या
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ८/९१ पृ. ३

पुनर्भेटीकडे लक्ष देणे

१ सत्यामधील आस्था वाढविण्यासाठी वेळ लागतो. तेव्हा नित्याने पुनर्भेटी घेता याव्यात यासाठी तुम्ही पुरेसा वेळ देत आहात का? पुष्कळ प्रचारकांना आपल्या क्षेत्रकार्यातील वेळेचा अर्धा भाग पुनर्भेटी घेणे व पवित्र शास्त्राभ्यास चालविण्यासाठी घालविण्यात लाभदायक वाटते. यामुळे आढळलेल्या आस्थेची वाढ करता येते.

२ तुम्हाला स्वतःबाबतीत हे लाभदायकपणे विचारता येईलः ‘यहोवाने केलेल्या प्रेमळ तरतुदींच्या बाबतीत आस्था दाखविणाऱ्‍यांना शोधून काढण्यात मी दक्ष आहे का, किंवा केवळ जे लोक प्रकाशने घेतात अशांनाच मी पुनर्भेटी देतो?’ जे धार्मिकतेवर प्रांजळपणे प्रीती करतात, जगाच्या दुष्ट परिस्थितीमुळे उसासे टाकतात व शोक करतात आणि सत्याचा शोध घेतात अशा लोकांना आम्ही शोधत असतो. कोणी माणूस आपल्या व्यक्‍तीगत किंवा धार्मिक कारणास्तव प्रकाशने घेत नाही याचा, त्याला सत्याविषयीची मुळीच आस्था नाही, आणि देवाच्या प्रेमळ तरतुदीबद्दल त्याच्याकडील उबदार प्रतिसाद मिळणे कठीण आहे, असा अर्थ नाही. (लूक १९:३-५) पण मग, हे आम्हाला कसे जमेल?

३ आमच्या क्षेत्रामधील काही विशिष्ट जणांचा परिचय राखण्यात अधूनमधून दिलेल्या भेटी साहाय्यक ठरतील व यामुळे एकतर अशांना मैत्रीच्या अनुषंगाने परिचित होता येऊन सत्याविषयी अधिक गंभीर व नियमित रुपाची चर्चा करण्याचा मार्ग उघडा होऊ शकेल. अनोळख्यांबद्दल लोकांना भीती वाटणे साहजिक आहे हे आम्ही जाणले पाहिजे; याकरताच त्यांची आस्था तसेच आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी थोडासा धीर धरावा लागेल. याला वेळ व आमच्या परिने परिश्रमाची गरज आहे. संधि आली की काही वेळ काढून त्यांच्याशी सत्याबद्दल बोलणी करा. एखाद्या शास्त्रवचनाची चर्चा करण्याची किंवा अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या मासिकातील एखादा मुद्दा सांगण्याची तयारी ठेवा आणि दुसरीकडे पुनर्भेट घ्यायची आहे असे दाखवून ही भेट घाईने संपवू नका.

४ ही भेट जरी तितकी परिणामकारक ठरली नसली तरी, त्या माणसाला विचार करायला किंवा वाचायला लावले इतके पुरे झाले, कारण यामुळेच पुढील भेटीत त्याची प्रगति होण्यासाठी वाव मिळतो. आम्ही करायचे ते सर्व केले तरी ती आस्था वाढविण्याचे काम देवाचे आहे हे आम्हाला ठाऊक आहे, यामुळेच आम्ही याकरता प्रार्थना केली पाहिजे. (१ करिंथ ३:६, ७) तथापि, आमचे बीजारोपण करण्याचे व लागवडीचे काम, जे आस्था दाखवीत नाही अशांना काढून टाकणे हे आहे; आणि हे, आम्ही पुनर्भेटी घेण्यावर जितका अधिक भर देऊ तितक्या अधिक प्रभावीपणे करण्यासाठी साहाय्यक ठरेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा