शांती व निर्भयता—एक खात्रीदायक आशा
१ आज बहुतेक लोकांना शांती व निर्भयता हवी आहे. पण खरी शांती निर्भयतेसह आज जगातून लुप्त झाली आहे. लाखो लोक युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशात राहात आहेत. दहशतवादी हालचाली व गनिमांची युद्धपिपासू वृत्ती यामुळे बाकीचे इतर निराशीत झाले आहेत; त्यांना वाटते की, शांती व निर्भयता मिळविणे हे निरर्थक आहे. पुष्कळजण सायंकाळ झाली की आपल्या सुरक्षित घरातून बाहेर पडण्यास भितात; कारण काहीतरी हिंसक घटना घडण्याची भीती त्यांना वाटते. शांतीने राहणारे खूपच थोडे लोक आहेत.
२ चांगल्या स्थितीची आकांक्षा बाळगणाऱ्यांना शांतीचा संदेश नेहमीच स्वागतपर वाटतो. ख्रिश्चन या अर्थाने आम्ही येशूच्या या आज्ञेचे स्मरण ठेवून आहोत की, “ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ‘ह्या घरास शांती असो,’ असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुम्हाकडे ती परत येईल.” (लूक १०:५, ६) शांतीच्या देवाचे आपण प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे आम्ही लोकांकडे शांतीपूर्ण रितीने जात असतो. आमचे पाय “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता” चढवून असतात.—इफिस ६:१५.
शांतीशोधक या नात्याने उदाहरण असलेले
३ शांतीच्या संदेशाची शिफारस करता यावी यासाठी यहोवाच्या लोकांनी आपल्या वसाहतीत तसेच मंडळ्यात शांतीने राहण्यास हवे. आम्ही शांतीशोधक या नात्याने उदाहरण राखणारे लोक असावयास हवे. पेत्राने समविश्वासू ख्रिस्तीजनांना “निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले” आढळण्याचे उत्तेजन लिहिले. (२ पेत्र ३:१४) तर मग, शांतीशोधक ख्रिस्ती यानात्याचे आपले उदाहरण कसे राखता येईल?
४ यासाठी, प्रथमतः आपल्याला शांतीचा देव यहोवा याजशी शांतीप्रिय नाते राखले पाहिजे. आम्ही त्याचे सार्वभौमत्व ओळखून त्याच्या आज्ञांना आज्ञाधारक राहिले पाहिजे. (स्तोत्र. ३४:१४) त्याच्या आत्म्याचे फळ शांती ही आपल्या जीवनात दिसून आली पाहिजे.—गलती ५:२२.
५ शांतीशोधक ख्रिस्ती या नात्याने असणाऱ्या आमच्या उदाहरणात मानवी अधिकारास दाखविलेला आदर समाविष्ट आहे. यात सरकारी अधिकारी, शाळेतील शिक्षक, मालक, पालक व वडील हे येतात. (रोम. १३:१, २; कलस्सै ३:२२; इफिस. ६:१; इब्री १३:१७) स्वस्थ व शांतीप्रिय जीवन व्यतित करून आम्ही आमच्या संदेशास शोभा आणतो. आम्ही दाखवितो की, “शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण” आहोत. (रोम. १४:१९) आम्हासाठी नव्या व्यवस्थीकरणातील शांती व निर्भयता खरी आशा आहे.
सध्याची प्रकाशन देणगी शांतीची वृद्धी करते
६ जुलै महिन्यात आम्ही आपल्या आशेची सहभागिता ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी—हाव कॅन यु फाइण्ड इट? हे प्रकाशन १२ रुपयांच्या सादरतेद्वारे करणार आहोत. सध्याच्या त्रासलेल्या जगात लाखोंच्या मनात शांती व निर्भयतेचा विषय अद्याप असल्यामुळे आमची ही सादरता समयोचित आहे.
७ या पुस्तकातील पहिले दोन अध्याय संभाषणासाठी उत्तम मुद्दे देतात. तुम्हाला ५ व्या पानावरील पहिले दोन परिच्छेद घरमालकास वाचून दाखवावेसे वाटतील. किंवा पृष्ठ ८ वरील ११ व्या परिच्छेदाकडे तुम्हाला निर्देश करावासा वाटेल, जेथे देवाची खात्रीलायक अभिवचने व मानवी नेत्यांची वचने यातील फरक दाखविण्यात आले आहेत. तसेच पृष्ठ २०-१ वरील परिच्छेद २८ व २९ देखील पहा. हे प्रकाशन घेणाऱ्या किंवा आस्था दाखविणाऱ्या लोकांची भेट घेण्याची तत्परता दाखवा व त्यांच्याकडे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचा प्रयत्न ठेवा.
८ शांतीचा देव यहोवा याजद्वारे खात्री देण्यात आलेल्या शांती व निर्भयतेची जे खरी आशा धरतात व ती मिळविण्याचा प्रयत्न करतात अशांना ती सांगण्यात व ती येशू या शांतीच्या अधिपतीकरवी कशी संपन्न करण्यात येईल याविषयी शिक्षण देण्यात आपण आपले कार्य करीत राहू या. (यशया ९:६, ७) शांतीने राहण्याचे आमचे उदाहरण आम्ही ‘शांतीप्राप्त्यर्थ झटून तिचा मार्ग धरीत आहोत’ अशी आम्हाविषयी शिफारस करो.—१ पेत्र ३:१०, ११.