शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
जुलै ८ने सुरु होणारा सप्ताह
गीत २०२ (१८)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा.
२० मि: “शांती व निर्भयता—एक खात्रीदायक आशा.” वडील सुरवातीच्या ५ परिच्छेदांवर १२ मिनिटे भाषण देतात व त्यानंतर परिच्छेद ६-८ वर सभागृहासोबत चर्चा करतात. परिच्छेद ७ वर असताना एका कुशल प्रचारकाला ट्रु पीस पुस्तकातून सुचविलेले बोलके मुद्दे घरमालकाला कसे सादर करावेत याचे प्रात्यक्षिक दाखवू द्या.
१५ मि: “पावसाळी कालावधीत अधिक ईश्वरशासित गोष्टी मिळविणे.” भाषण व कौटुंबिक चर्चा.
(३ मि.) अध्यक्ष पहिल्या दोन परिच्छेदांची चर्चा करतात व मग कौटुंबिक चर्चा प्रस्तुत करतात. पावसाळी कालावधीत कुटुंबाच्या आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. आध्यात्मिक गरजांची काळजी सर्वदा घेतली जात आहे याकडे कुटुंबप्रमुखाने लक्ष द्यावे.—अनु. ६:६, ७.
(१० मि.) परिच्छेद ३-६ वर कौटुंबिक चर्चा. पावसाळी कालावधीत आध्यात्मिक हालचाली समाविष्ट करण्यासाठी काय व्यवस्था करणे आहे त्याची कुटुंबप्रमुख कुटुंबासमवेत चर्चा करतो. कुटुंबातील एक सदस्य, कुटुंब या काळात ज्या गावी भेटीला जाणार आहे तेथील राज्यसभागृहाचा पत्ता व सभांच्या वेळा मिळवितो. मंडळीसोबत राहून प्रचारकार्यात भाग घेण्यासाठी तसेच अनौपचारिक स्वरुपाचे साक्षीकार्य करता यावे म्हणून कुटुंबाजवळ पुरेसा प्रकाशन साठा आहे. कोणकोणत्या परिस्थिती सामोऱ्या येतील व यांचा साक्ष देण्यासाठी कसा उपयोग करता येईल त्याचा उल्लेख केला जातो. कुटुंब प्रमुख “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या योजनेकडे लक्ष वेधवितो व सांगतो की अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसाच्या समाप्तीला ते सर्वजण मिळून दर दिवशीच्या कार्यक्रमातील प्रमुख मुद्यांची चर्चा करतील व यात कोणता फायदा आहे याची तो स्पष्टता करतो. सर्वजण पावसाळी कालावधीत व अधिवेशनाच्या काळात आध्यात्मिकरित्या अधिकाधिक मिळवून घेण्याकडे आपले लक्ष लावतात.
(२ मि.) अध्यक्ष परिच्छेद ७ मधील माहितीने समारोप करतात. आम्ही ज्या काही योजना आखू, त्यामध्ये कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये याची खात्री करावी.
गीत १०० (८१) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै १५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ११६ (१०८)
५ मिः स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. जागतिक कार्यासाठी दिलेल्या आर्थिक साहाय्यासंबंधाने संस्थेकडून मिळालेल्या कृतज्ञतापूर्वक उद्गारांचे वाचन करा. शिवाय जे अनुदान प्राप्त झाले त्यासाठी मंडळीचे आभार माना.
२० मिः “इतरांविषयी व्यक्तीगत आस्था दाखविणे.” प्रश्नोत्तराने चर्चा. माहितीचा अवलंब स्थानिक रित्या कसा करता येईल याचा मंडळीसोबत विचार करा.
२० मिः “१९९१ च्या ‘स्वातंत्र्याचे चाहते’ प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आत्ताच योजना आखा”—भाग १. परिच्छेद १-९ वर सभागृहासोबत चर्चा, आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे “प्रांतिय अधिवेशन स्मरणिका”ची त्रोटक उजळणी. अधिवेशनाला येणाऱ्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांसोबत प्रचारक योग्य मुद्यांची चर्चा करू शकतील.
गीत १७७ (५२) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै २२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३३ (६८)
१० मिः स्थानिक घोषणा. अलिकडच्या मासिकातील एक किंवा दोन मुद्दे ठळकपणे प्रस्तुत करा. या आठवड्याच्या शेवटी क्षेत्रकार्यात पूर्ण सहभाग घेण्याचे प्रचारकांना उत्तेजन द्या.
२३ मिः “सुवार्ता सादरता—नित्याने उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रावर मासिकाद्वारे.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ३ चा विचार करताना, एक उत्तम तयारी केलेला युवक अलिकडील मासिकांचा वापर करून हे दाखवितो की, कशाप्रकारे युवकांना घरमालकाशी बोलून त्यांना साहित्य देता येईल. असे म्हणू शकता: “नमस्ते. माझं नाव __________ आहे. मी तुम्हाला [विषय किंवा शिर्षक सांगा] याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आलो आहे. मला हा मुद्दा आवडला आहे. [विशिष्ठ मुद्दा दाखवा किंवा चित्राचे स्पष्टीकरण द्या.] यामुळे मला ही मदत मिळाली [कशी ती स्पष्ट करा], आणि मला वाटते की तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडेल. हे मासिक आम्ही रु. २.५० च्या अनुदानावर देत आहोत.”
१२ मिः प्रश्न पेटी. शाळा देखरेख्यांद्वारे हाताळणी.
गीत २१६ (१०८) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै २९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३९ (७४)
७ मिः स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. मंडळीला आठवड्याच्या शेवटी आयोजित असणाऱ्या क्षेत्रकार्याला पाठबळ देण्याचे उत्तेजन द्या.
१८ मिः “क्षेत्रावरील आमचे सेवकपण पूर्ण करणे.” लेखाची प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद २-६ मधील मुद्यांचा कसा व्यावहारिक उपयोग करता येऊ शकतो ते चित्रित करा. परिच्छेद ५ चा विचार करताना, पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करता न येणारा एक प्रचारक मदतीसाठी सेवा देखरेख्यांची भेट घेत असल्याचे दृश्य दाखवा. सेवा देखरेखे प्रचारकाला मदत देण्यासाठी इंडेक्सचा वापर करतात.
२० मिः “१९९१ च्या ‘स्वातंत्र्याचे चाहते’ प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आत्ताच योजना आखा”—भाग २. परिच्छेद १०-२५ वर सभागृहासोबत चर्चा. द वॉचटावर जून १५, १९८९ च्या अंकातील पृष्ठ १०-२० वर दिलेल्या स्मरणिकातील योग्य माहितीचा समावेश करा. अधिवेशनाला उपस्थिती राहण्याआधी कुटुंबाने या लेखांतील मुद्यांची चर्चा करावी असे उत्तेजन द्या.
गीत १४ (६) व समाप्तीची प्रार्थना.