इंडेक्समुळे कुटुंबाला लाभ कसा मिळवता येईल
१ कौटुंबिक सदस्यांविषयी बोलताना १ तीमथ्य ५:४ म्हणतेः ‘यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर ईश्वरी भक्तीने वागण्याचे शिकावे.’ होय, आमच्या कौटुंबिक सदस्यांसोबतच्या दळणवळणात ईश्वरी भक्ती आचरण्याचे शिकून घेणे हे महत्त्वाचे आहे. वस्तुतः कौटुंबिक सदस्यांची काळजी घेणे हे आमचे ख्रिस्ती कर्तव्य असल्यामुळे यासाठी ईश्वरी मार्गदर्शनाची आपल्याला जरुरी आहे. वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स हा कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या विविध परिस्थितींविषयी मार्गदर्शन देण्यात उत्तम मार्गदर्शक आहे.
२ पुरुषाचा विवाह स्त्रीशी होतो तेव्हा एक कुटुंब अस्तित्वात येते. (उत्पत्ती २:२४) तुम्ही विवाहीत होण्याचे इच्छित आहात का? “मॅरेज” या सदराखाली, “सिलेक्टींग मेट” हा पोटमथळा तुम्हाला दिसेल. यापुढे दर्शविलेला संदर्भ तुमचे या कठीण कामासंबंधाने साहाय्यक मार्गदर्शन देईल. इंडेक्समध्ये “हस्बंडस् रोल” व “वाईफस् रोल” हे पोटमथळेही आहेत. या सदराखालील माहिती विवाहेच्छू लोकांना तसेच विवाह झालेल्या लोकांनाही लाभदायक माहिती देईल. याचप्रमाणे “कम्युनिकेशन,” “क्लोसनेस इन्,” व “पीस्” हे पोटमथळे विवाहास समृद्ध करणाऱ्या माहितीकडे निर्देश करतील. काही समस्या उद्भवल्यास “प्रॉब्लेम्स इन” हा पोटमथळा त्या कशा सोडवाव्यात याविषयीची प्रभावशाली सूचना प्रदान करील.
३ मुले ही यहोवाकडील देणगी आहेत. (स्तोत्र. १२७:३) मग, पालकांना आपल्या मुलांना “यहोवाची शिस्त व मानसिक विचार” यामध्ये कसे वाढवता येईल? (इफिस ६:४) या बाबतीत यहोवा आपले वचन व त्याचा विश्वासू दासवर्ग यांजकरवी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देत आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या भावना व गरजा याविषयी अंतर्दृष्टी राखली पाहिजे. इंडेक्समधील “चिल्ड्रेन,” व “युथ” ही सदरे माहितीयुक्त सूचना व प्रस्ताव राखून आहेत. आता यहोवाचे नियम त्यांच्या तरुण अंतःकरणावर बिंबवण्याविषयी काय? “चाइल्ड ट्रेनिंग” हे सदर मुलांच्या संगोपनाविषयीच्या प्रत्येक प्रकाराबाबतीत त्याचप्रमाणे त्यांना यहोवासोबत व्यक्तीगत नातेसंबंध वाढविण्यामध्ये आणि सत्याविषयी आत्मीयता उभारण्यात कशी मदत देता येईल याविषयी आकलन होण्याजोगी चर्चा पुरवील.—१ पेत्र २:२.
४ कुटुंबाच्या यशप्राप्तीसाठी कुटुंबाची आधीच योजिलेली पवित्र शास्त्रीय चर्चा जरुरीची आहे. (अनु. ६:६-९; यशया ५४:१३; इफिस. ५:२५, २६) “फॅमिलीस्” या सदराखाली मनोरंजक कौटुंबिक चर्चेसाठी विषय व कल्पना मिळविण्यासाठी संदर्भ दिसतील. आताच्या इंडेक्समध्ये “बायबल स्टडी” या पोटमथळ्याखाली “मेकिंग इट इफेक्टीव्ह,” “मेकिंग इट एन्जॉएबल,” व “मेकिंग इट इंटरेस्टींग” हे उपमथळे आहेत. याशिवाय, अधूनमधून यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवनकथांचा विचार आपल्या चर्चेत का करू नये? “फुल-टाईम मिनिस्ट्री” या मथळ्याखाली तुम्हाला “ए चॉईस आय हॅव नेवर रिग्रेटेड,” व “रिसिव्हिंग द रिक्वेस्टस् ऑफ माय हार्ट” या जीवनकथांकडे निरवले जाईल. असेच आणखी अहवाल “मिशनरीज्” या मथळ्याखालीही दिले आहेत. जीवनकथांची पूर्ण यादी “लाईफ स्टोरिज् ऑफ जेहोवाज् विटनेसेस्” या मथळ्याखाली सापडेल.
५ कौटुंबिक जीवनाविषयीच्या सूचना व विचार मिळविण्यासाठी वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स खरेच एक अद्भूत साधन आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मोठे समाधान मिळवून देण्यात तो उपयुक्त ठरो.