शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
जून १० ने सुरु होणारा सप्ताह
गीत ६३ (३२)
१० मि: स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. क्षेत्रकार्याच्या योजनेविषयीची माहिती द्या. आतापर्यंत मिळालेल्या वर्गण्यांचे एक किंवा दोन अनुभव सांगा.
२५ मि: “लोकांना अंधारातून उजेडात आणा.” प्रश्नोत्तराची चर्चा. परिच्छेद ६ वर असताना, कुटुंबाला टेहळणी बुरुजद्वारे कसा लाभ मिळाला ते निदान दोन व्यक्तीगत अनुभव सांगू द्या.
१० मि: प्रश्न पेटी. प्रश्नोत्तरे. ईश्वरशासित शिफारशींना अनुसरल्यामुळे जे आशीर्वाद मिळतात त्यावर भर द्या.
गीत १९२ (१०) व समाप्तीची प्रार्थना.
जून १७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २२१ (७३)
१० मिः स्थानिक घोषणा व जमाखर्च अहवाल. अनुदानाची पोच द्या. राज्याच्या आस्थेच्या कामाला स्थानिकरित्या तसेच जगभरात आर्थिक साहाय्य दिल्यामुळे बांधवांचे उबदारपणे अभिनंदन करा.
२० मि: “सुवार्ता सादरता—संध्याकाळी” प्रश्नोत्तराची चर्चा. मंडळीने सायंकाळच्या कार्याची जी व्यवस्था केली आहे ती कळवा. सायंकाळच्या साक्षीकार्याचे मोल ठळकपणे सांगण्यासाठी छोटासा स्थानिक अनुभव सांगा.
१५ मि: “डु यू हेट टू रिसिव्ह क्रिटिकिझम्?” अवेक! मासिकातील फेब्रुवारी ८, १९९१ मधील लेखावर आधारीत भाषण. टिका कशी अधिक रुचकर बनवता येते याविषयीचे सहा मार्ग वक्त्याने स्पष्ट करावेत. (प्रादेशिक: “देवाचे भय मानून पावित्र्याची परिपूर्ति करणे” टेहळणी बुरुज मार्च १, १९९१.)
गीत ६५ (३६) व समाप्तीची प्रार्थना.
जून २४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८१ (१०)
१० मि: स्थानिक घोषणा. अलिकडच्या मासिकातील एक किंवा दोन बोलके मुद्दे ठळकपणे सांगा.
१७ मि: “क्षेत्रकार्यात असताना दुसऱ्यांची मदत करणे.” भाषण, आणि सभागृहाची सहभागिता. इतरांसोबत क्षेत्रात काम केल्यामुळे मिळणारे व्यक्तीगत फायद्यांचे विवेचन करणाऱ्या उदाहरणशील प्रचारकांची थोडक्यात मुलाखत घ्या.
१८ मि: “मानवास नव्हे, तर देवास का भ्यावे?” द वॉचटावर जून १, १९८९ वर आधारीत भाषण. (प्रादेशिक: सप्टेंबर १, १९९०) स्थानिकरित्या उद्भवणाऱ्या परिस्थितीस लागू करा.
गीत ११५ (३६) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै १ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७० (९५)
१० मि: स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. जुलैच्या सादरतेची उजळणी करा व ती संभाषणाचा नवा विषय: “देवाचा शोध करण्याची हीच वेळ आहे” याला कशी लागू होते ते सांगा. नेमलेली शास्त्रवचने यशया ५५:६, ७ (खऱ्या देवास शोधता येते) आणि प्रे. कृत्ये १७:२६, २७ (मानवाने आत्ताच देवाचा शोध घेतला पाहिजे) ही आहेत.
२० मिः “क्षेत्र सेवेत पवित्र शास्त्राचा उपयोग करा.” प्रश्नोत्तराने चर्चा. सहाव्या परिच्छेदाच्या अनुषंगाने जुलै सादरतेचे संक्षिप्त प्रात्यक्षिक सादर करा. संभाषणाच्या नव्या विषयातील केवळ एकच शास्त्रवचन वापरा.
१५ मिः “इंडेक्समुळे कुटुंबाला लाभ कसा मिळवता येईल.” साहित्याचा प्रश्नोत्तराने उरक. परिच्छेद २ चा विचार करताना एका विवाहीत जोडप्याला इंडेक्सच्या उपयोगाने “मॅरेज” या मुख्य शिर्षकाखाली आढळणाऱ्या विविध मनोरंजक पोटमथळ्याविषयी चर्चा करीत असलेले दाखवा.
गीत १५१ (२५) व समाप्तीची प्रार्थना.