मंडळीत आमची राज्याची सेवा पूर्ण करणे
१ ख्रिस्ती मंडळीचा मस्तक, येशू ख्रिस्त याच्याद्वारे यहोवाने “विश्वासू कारभारी” किंवा घरचा व्यवस्थापक याला जबाबदारी दिली आहे. (लूक १२:४२, ४३) यामुळे, ‘आपल्याला देवाच्या घरात कसे वागले पाहिजे’ ते समजण्यासाठी छापील रुपात मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था झाली. (१ तीमथ्य ३:१५) जे प्रकाशित झाले आहे ते शोधण्याचे आमचे प्रमुख साधन आहे, वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स. हा आपल्याला कशी मदत देतो?
२ तुम्ही वडील आहात का? तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे दोन प्रमुख शिर्षकांद्वारे सांगण्यात आले आहेः “एल्डर्स,” आणि “ओवरसीयर्स.” “एल्डर्स” हा विभाग मंडळीतील विविध प्रकारच्या लोकांना कशी मदत द्यावी, सूचना कशी द्यावी, वडीलवर्गाचे आपसातील नातेसंबंध, वडीलांच्या जबाबदाऱ्या इत्यादि गोष्टींची माहिती पुरवितो. गुणवत्तेविषयीची माहिती “ओव्हरसियर्स” या विभागात आढळेल, कारण पवित्र शास्त्रही त्याविषयीची चर्चा करताना हीच संज्ञा वापरते. तसेच “ओव्हरसियर्स” शिर्षकाखाली “अध्यक्षीय देखरेखा,” “सेवा देखरेखा,” आणि “सचिव” यासारख्या पदाच्या नेमणूकांविषयी चर्चा आहे. “काँग्रिगेशन्स” या मुख्य शिर्षकाखाली देखील ही उपयुक्त माहिती पाहता येईल.
३ तुम्ही उपाध्य सेवक असाल तर तुम्हीही मंडळीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असता. तुमच्याठायीची गुणवत्ता तसेच तुमच्या जबाबदाऱ्या याविषयी “मिनिस्ट्रियल सर्वंटस्” या शिर्षकाखाली माहिती आहे. याखेरीज सेवेच्या ज्या सुसंध्या तुम्हासाठी उपलब्ध आहेत आणि तुम्हाला आणखी जबाबदाऱ्यांसाठी कसे प्रगमन करता येईल याविषयीची माहिती देणारे संदर्भ देखील येथे आढळतील.
४ मंडळीतील सभांच्या अनुषंगाने वडील तसेच उपाध्य सेवक या दोहोंना विशिष्ट सुसंध्या आहेत. तेव्हा “मिटींग्स्” या सदराखाली या विषयाबद्दलच्या प्रत्येक प्रकारासाठी संदर्भ देण्यात आले आहेत आणि “एफर्टस् टू अटेंण्ड” यामध्ये थरारक उदाहरणे देण्यात आली आहेत. तसेच, प्रत्येक सभेचे मुख्य शिर्षक हे अर्थातच तेथे आहे.
५ स्तोत्रसंहिता ६८:११ म्हणतेः “मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना” आहे. मंडळीत पुरुषवर्गाप्रमाणेच स्त्रियांनी देखील देवाच्या घरात योग्य वागणूक आचरली पाहिजे. कधी कधी असे प्रश्न येतात की, भगिनीने केव्हा आपल्या मस्तक आच्छादावे, तसेच सभा चालविण्यासाठी आणि मंडळीचे प्रार्थनेत प्रतिनिधित्व करण्यासाठी लायक असा बांधव हजर नाही तेव्हा काय करावे. यावेळी “विमेन” हे शिर्षक या विषयासंबंधीची माहिती तुम्हाला देईल. याचप्रमाणे “सिस्टर्स,” “हेड कवरिंग,” व “प्रेअर” ही सदरे देखील माहितीयुक्त आहेत.
६ १ ले तीमथ्य ३:१५ चा मधला भाग ख्रिस्ती मंडळीचा उल्लेख “सत्याचा स्तंभ व पाया” असा करतो. आम्ही देवाच्या घरात योग्यपणे राहून मंडळीतील आमची राज्य सेवा पूर्ण करीत असता सत्याला पाठबळ देत राहणे हा आमचा एक हक्क आहे.