इंडेक्सच्या साहाय्याने आपले राज्याचे उपाध्यपण पूर्ण करणे
१ समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपण आपले उपाध्यपण पूर्ण करण्याचा कसून प्रयत्न करीत आहोत. यामध्ये आपल्याला मदत मिळावी यासाठी यहोवाने, महत्त्वपूर्ण प्रकाशनांच्या विस्तारीत रूपाच्या ग्रंथालयाच्या स्वरुपात आपल्याला मार्गदर्शन व प्रोत्साहनाचा विपुलपणा प्रगट केला आहे. आम्हाला याचा चांगला उपयोग करून घेता येईल का? याचा प्रमुख मार्गदर्शक म्हणजे वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स होय, जो १९६१ पासून विविध भाषांत प्रकाशित करण्यात येत आहे.
२ परंतु, इंडेक्स तुम्हाला तुमचे उपाध्यपण पूर्ण करण्यात काय मदत देऊ शकेल? तो, आतापर्यंत देण्यात आलेल्या उत्तमोत्तम सूचना व स्पष्टीकरणाकडे निर्देश करून ती मदत देतो. जगभर असलेल्या बांधवांना विचारात घेऊनच इंडेक्सची रचना करण्यात आलेली आहे. मुले ते आजोबा तसेच नवीन पवित्र शास्त्र अभ्यासू विद्यार्थी ते वडीलजन सर्वच लोक, त्यांना हव्या असणाऱ्या लाभदायक उद्देशासाठी यात संदर्भ मिळवू शकतात.
तुम्हाला हवे असणारे कसे शोधता येईल
३ तुम्हाला एखादे वचन किंवा वचनांचा उतारा याविषयीच्या अर्थाची माहिती समजून घ्यायची इच्छा आहे तर प्रथम, या इंडेक्सच्या मागील भागाला जो स्क्रिपचर इंडेक्स देण्यात आला आहे तो चाळण्यास हवा. त्रैक्याच्या मतप्रतिपादनात कोणी तुम्हाला योहान १०:३० हे वचन काढून दाखविले आहे का? तेव्हा स्क्रिपचर इंडेक्स सदरात, तुम्हाला अशा साहित्याचा संदर्भ दिसेल जेथे येशूने तसे का म्हटले होते याचे विवेचन सापडू शकेल. पवित्र शास्त्राचे वाचन करताना जी वचने आपल्याला समजत नाहीत किंवा घोटाळ्यात पाडल्यासारखी वाटतात अशांचे स्पष्टीकरण या स्क्रिपचर इंडेक्समधून वाचल्यावर आपल्याला आपले शास्त्रवाचन अधिक समृद्धपणे करता येते.
४ विषयानुरुप देण्यात आलेला इंडेक्स आपल्याला विविध मार्गांनी त्या एकाच उपयुक्त माहितीकडे आणतो. उदाहरणार्थ, कदाचित तुम्हाला, विश्वासात नसणारा पती, मुलांना तुम्हासोबत सभेला जाण्यासाठी बंदी घालीत असेल तेव्हा काय करावे याविषयीची माहिती हवी असेल. याचे उत्तर मिळविण्यासाठी तुम्हाला “हसबंड्स्,” “वाईव्स्,” “चिल्ड्रेन,” “ओपोझिशन,” किंवा “मिटींग्स्” या शिर्षकांकडे वळावे लागेल. कोणत्याही विषयाच्या बाबतीत, तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते पहिल्या शिर्षकाखाली न सापडल्यास दुसऱ्या शिर्षकाखाली शोधावे. स्वतःला विचाराः ‘यात कोणाचा समावेश आहे? एखादी विशिष्ट जागा महत्त्वाची आहे का? एखादा विशिष्ट गुण किंवा कौशल्य? एखादी प्रभुत्व करणारी भावना? एखादे ध्येय?’ जर तुम्हाला बरोबरचे शिर्षक सापडले, तर त्याच्याखाली असणाऱ्या इतर संदर्भाचे पृथ्थकरण करून बघा. यामुळे अधिक जवळचा शिर्षक-संदर्भ सापडतो व वेळ वाचतो.
५ इंडेक्स हाताळण्यामधील कौशल्य आपल्या पवित्र जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये अधिक यशाची हमी देते. या साधनाचा आपण जितक्या कुशलतेने उपयोग करीत राहू तितक्या अधिकपणे आमचे कुटुंब, आमचे पवित्र शास्त्राभ्यासू विद्यार्थी आणि आमची मंडळी लाभ मिळवीत राहील. वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स आमच्या राज्याचे उपाध्यपण पूर्ण करण्यात आम्हाला केवढा अमोल मदतनीस ठरू शकतो याविषयी आमची राज्य सेवा याच्या भावी अंकात विशिष्ट क्षेत्रांची माहिती स्पष्ट करण्यात येईल.