आपल्या प्रकाशनांचा चांगला उपयोग करा
१ आमच्या प्रचाराच्या व शिक्षणाच्या कामात मदत मिळावी यासाठी यहोवाच्या दृश्य संस्थेने आम्हाला विविध प्रकारची प्रकाशने पुरविली आहेत. (मत्तय २८:१९, २०) आपल्याला संस्थेच्या प्रकाशनांविषयी जी कदर वाटते तिने आम्हाला त्यांचा सेवाकार्यात चांगला उपयोग करण्यास उत्तेजित केले पाहिजे.
२ आपले सेवाकार्य पार पाडत असताना आम्ही मेंढरासमान लोकांना जीवनाच्या मार्गावर येण्याची मदत करण्याची इच्छा धरावी. हे आमच्या प्रकाशनांमुळे साध्य करता येऊ शकेल. शास्त्रवचनांची चर्चा आस्थेवाईक व्यक्तीसोबत करीत असताना आपल्याला आढळेल की, त्याला एका विशिष्ट विषयाबद्दल रस आहे. आपण जर आमच्या विविध प्रकाशनात आढळणाऱ्या महत्त्वपूर्ण माहितीशी परिचित असलो तर आम्हाला आमची सादरता वळवून घेता येईल व त्या व्यक्तीच्या आवडीच्या विषयावर आधारलेले प्रकाशन त्याला सादर करता येईल. यासाठी त्या विशिष्ट प्रकाशनासह त्या व्यक्तीची परत भेट घ्यावी लागले.
गरजेचे ते सादर करा
३ आपण आपल्या क्षेत्राचा उरक पराकाष्ठेने केल्यास, पवित्र शास्त्राविषयी प्रामाणिक आस्था बाळगणारे व त्याविषयी अधिक शिकून घेण्याची इच्छा असणारे लोक असल्याचे आम्हाला आढळतील. तसे पाहिल्यास आमचे कोणतेही प्रकाशन त्यांना पवित्र शास्त्राची समज मिळवून देण्यात मदत देईल. पण, आपण पवित्र शास्त्रावर विश्वास न दाखविणाऱ्या लोकांसोबत बोलत असलो, आणि पवित्र शास्त्र हे परस्परविरोधी किंवा अशास्त्रीय आहे असे ते मानीत असतील तर मग, द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? हे प्रकाशन त्यांना देता येईल. हे पुस्तक पवित्र शास्त्रावर मानवाने केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देते आणि त्याला देवाचे वचन म्हणून का स्वीकारले पाहिजे त्याविषयीचे स्पष्ट रुपाचे स्पष्टीकरण देते. किंवा तुम्हाला मॅनकाइण्डस् सर्च फॉर गॉड या पुस्तकातील १५ व १६ अध्याय दाखवून ते सादर करता येईल.
४ पुष्कळांना घरगुती समस्या आहेत. अशांना पवित्र शास्त्रातील सूचनेची माहिती नसेल किंवा ती कशी लागू करावी याचे ज्ञान नसेल. तेव्हा अशा घरच्या समस्या असणाऱ्या लोकांना आपण कौटुंबिक जीवन हे पुस्तक किंवा हॅपिनेस पुस्तकातील ५ ते ८ अध्याय दाखवून ते देता येईल. बदल कदाचित त्वरित दिसून येणार नाही, पण पवित्र शास्त्रातील सूचना कार्यान्वित ठरतात हे त्यांना आपण दाखवून देऊ शकतो.
५ घरात लहान मुले आहेत अशा लोकांना भेटी देताना, खासपणे युवकांना लक्षात ठेवून संस्थेने जी प्रकाशने काढली आहेत ती त्यांना सादर करा. तुम्हाला कदाचित यंग पीपल आस्क हे प्रकाशन देता येईल. पुष्कळ प्रचारकांनी माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् किंवा थोर शिक्षकाचे ऐका ही पुस्तके सादर करून पालकांना व युवकांना मदत दिली आहे.
६ आपल्याकडील हस्तपत्रिका या जवळ बाळगण्यास खूपच सोयीच्या आहेत व त्या घरोघरचे कार्य करीत असताना संभाषण सुरु करण्यासाठी किंवा अनौपचारिक साक्ष देताना वापरता येतील. मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? ही हस्तपत्रिका तर खूपच सांत्वनदायक व महत्त्वपूर्ण माहितीने भरलेली आहे. तुम्ही आपणासोबत वेगवेगळ्या हस्तपत्रिका जवळ बाळगता का? त्यांची प्रस्तुति करण्यासाठी तुम्ही काही प्रास्ताविक तयार केले आहेत का?
७ आपण इतरांमध्ये सुवार्तेची सहभागिता करीत असताना, “विश्वासू व बुद्धिमान दास” याद्वारे पवित्र शास्त्र अभ्यासाची जी विविध प्रकाशने देण्यात आली आहेत त्यांचा चांगला उपयोग करण्याची इच्छा धरावी. (मत्तय २४:४५-४७) आध्यात्मिक अन्नाचा हा भरपूर पुरवठा यहोवाच्या औदार्याविषयी व त्याला मानवजातीविषयी वाटणाऱ्या काळजीविषयी प्रचिती देतो.