आपल्या प्रकाशनांचा विचारपूर्वक उपयोग करा
१. यहोवाच्या तरतूदींबद्दल येशूने दाखवलेल्या गुणग्राहकतेचे अनुकरण आपण कसे करू शकतो?
१ येशूने चमत्कारिक रीत्या लोकसमुदायाला जेवू घातल्यानंतर उरलेले अन्न जमा करण्यास सांगितले. (मत्त. १४:१९-२१) असे करून त्याने यहोवाला गुणग्राहकता दाखवण्याच्या बाबतीत आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण मांडले आहे. आज ‘विश्वासू कारभाऱ्याच्या’ माध्यमाने यहोवा आपल्यासाठी ज्या तरतूदी करत आहे त्याबद्दल आपणही ‘कृतज्ञता’ दाखवली पाहिजे.—कलस्सै. ३:१५; लूक १२:४२; मत्त. २४:४५-४७.
२. नियतकालिकांची थप्पी होऊ नये म्हणून काय करता येईल?
२ नियतकालिके: आपण लोकांना नियतकालिके दिली नाहीत तर त्यांची थप्पी होण्यास जास्त वेळ लागणार नाही. असे नेहमी होत असेल तर आपण आपल्या नियतकालिकांचा कोटा कमी करू शकतो. मग, जुन्या नियतकालिकांचे काय करता येईल? ही नियतकालिके जुनी झाली असली तरी त्यांतील लेख मात्र क्षेत्रातील लोकांसाठी नवीनच असतात. आपल्याकडे अशा नियतकालिकांची थप्पी झाली असेल तर तिचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल हे सेवा पर्यवेक्षक किंवा इतर कोणतेही वडील तुम्हाला सूचवतील.
३, ४. राज्य सभागृहातून साहित्य घेताना कोण-कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे?
३ इतर प्रकाशने: साहित्य सादरता बदलते तेव्हा त्या प्रकाशनाची मागणी करण्याआधी आपल्याजवळ त्या प्रकाशनाच्या प्रती आहेत की नाही याची खात्री करा. क्षेत्रात देण्यासाठी आठवड्याभरात तुम्हाला जितके साहित्य लागणार आहे तितकेच साहित्य घ्या व ते संपल्यानंतर तुम्ही आणखी साहित्य घेऊ शकता.
४ तुमच्या वैयक्तिक वाचनासाठी किंवा अभ्यासाठी तुम्हाला जितके साहित्य लागेल तितकेच मागवा. त्यावर आपले नाव लिहा. त्यामुळे तुमचे प्रकाशन हरवले तरी ते तुम्हाला परत मिळेल. सीडी-रॉमवरील वॉचटॉवर लायब्ररीचा तसेच तुम्ही जपून ठेवलेल्या तुमच्या वैयक्तिक नियतकालिकांचा चांगला उपयोग करा.
५. क्षेत्रात साहित्य सादर करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
५ प्रकाशनांचा वाटप: खरी आस्था दाखवणाऱ्या लोकांनाच आपण आपली प्रकाशने देण्याचा प्रयत्न करतो. सेवेत उपयुक्त ठरणाऱ्या या मौल्यवान साधनांचा खर्च आपल्यालाच करावा लागतो ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. तुम्ही लोकांना प्रकाशने सादर करता तेव्हा जगभरात चाललेल्या या कार्याला ते अनुदान करून हातभार लावू शकतात हे त्यांना सांगण्यास कचरू नका.
६. आपण आपल्या प्रकाशनांना इतके महत्त्व का देतो आणि यामुळे काय करण्यास आपण प्रवृत्त होऊ?
६ येशूने चमत्कारिक रीत्या इतरांना शारीरिक अन्न दिले. पण, त्याने अनेकदा त्यांना आध्यात्मिक अन्नही दिले. “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,” असे त्याने म्हटले. (मत्त. ४:४) आपल्या प्रकाशनांतून लोकांना सार्वकालिक जीवन मिळवून देणाऱ्या बायबल सत्यांचे अमूल्य ज्ञान मिळते. (योहा. १७:३) तेव्हा, हे आध्यात्मिक अन्न आपण वाया जाऊ देऊ नये.