पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे
यहोवाची आधुनिक काळची संघटना, पत्रिकांचा यशस्वीरित्या वापर करण्याच्या घटनांनी युक्त आहे. वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी या आमच्या कायदेशीर संघटित संस्थेचे नावच दर्शवते की सुवार्तेचा फैलाव करण्यात पत्रिका महत्त्वाचा भाग पार पाडतात. यहोवाच्या लोकांकडून १८८१ ते १९१८ पर्यंत ३० कोटी पेक्षा अधिक पत्रिकांचे वितरण करण्यात आले. या काळातले पुष्कळ जे ख्रिस्ताच्या बांधवांच्या शेषाचे भाग बनले त्यांना याच आधीच्या पत्रिकांद्वारे सत्याशी परिचित केले गेले.
२ चार रंगीत पत्रिकांच्या प्रसिद्धीनंतर १९८७ मध्ये लहान पत्रिकांच्या वापरावर पुन्हा जोर देण्यात आला जी तेव्हापासून उपलब्ध आहेत. “ज्योती वाहक”, १९९२ च्या प्रांतिय अधिवेशनात अशी घोषणा करण्यात आली की पत्रिकांची ही मालिका विस्तारीत करायची होती आणि त्यात रंगीत आणि विचार प्रवृत्त करायला लावणाऱ्या आणखीन चार पत्रिकांची भर पडली. ते कंफर्ट फॉर द डिप्रेस्ड, एन्जॉय फॅमिली लाईफ, हू रियली रूल्स द वर्ल्ड?, आणि वील धीस वर्ल्ड सरव्हाईव्ह? आहेत. तुमच्या सेवेत लाभदायक परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही सर्व आठ पत्रिकांचा उपयोग करता का?
३ पत्रिका प्रभावकारकतेने वापरल्यामुळे चांगले परिणाम मिळतात. प्रत्येकाशी आपल्याला परिचित व्हावयाची गरज आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक पत्रिका कशाबाबातीत चर्चा करते हे जाणण्यासाठी तुम्ही ती काळजीपूर्वकतेने वाचली आहे का? प्रत्येक पत्रिका कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना अपीलदायक ठरतील त्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? प्रत्येक पत्रिकेशी संपूर्णपणे परिचित झाल्यामुळे त्यांना घरोघरच्या कार्यात वापरण्यासाठी त्याचप्रमाणे अनौपचारिक साक्ष देऊ शकाल अशा पुष्कळ परिस्थितींमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल.
४ घरोघरच्या सेवेत त्याचा वापर करा: एक विभागीय पर्यवेक्षक असे लिहितात: “घरमालकाशी केलेली बहुतेक चर्चा पत्रिकेने सुरवात केल्यामुळे मला बहुधा उत्तम यश मिळाले आहे.” तुम्ही हा पवित्रा अजमाऊन पाहिला आहे का? तुमचे संभाषण प्रस्तुत करण्यासाठी पत्रिकांचा वापर का करू नये? आठ पत्रिकांमुळे, आम्हाला निवड करण्यासाठी आठ उत्तेजन देणाऱ्या प्रस्तावना आहेत. प्रत्येक पत्रिका आम्हाला पहिल्या भेटीच्या वेळी किंवा पुनर्भेटीच्या वेळी पवित्र शास्त्र आभ्यास सुरू करण्यासाठी संधी देते.
५ पत्रिकांचा वापर करण्यासाठी इतर संधी आहेत. एखाद्या घरात संभाषणात तुम्हाला कळेल की अलिकडेच त्या घरमालकाची एखादी प्रिय व्यक्ती मरण पावली किंवा कुटुंबातले कोणीतरी आजारी आहे. अतिशय दुःखाचा अनुभव घेणारे लोक किंवा पुष्कळ दिवसांपासून असणाऱ्या समास्यांशी लढा देत असलेले लोक बहुधा स्वतःमध्ये नकारात्मक भावना उत्पन्न करतात आणि ते निराश होतात. कंफर्ट फॉर द डिप्रेस्ड या पत्रिकेत मिळणाऱ्या उत्तेजनदायक संदेशाची इतरांसोबत सहभागिता करणे किती प्रेमळपणाचे असेल! तुम्हाला असे कळाले असेल की त्या व्यक्तीला अलिकडेच घटस्फोट मिळाला किंवा तिची नोकरी गेली. अशा प्रकारचे अनुभव मनावर प्रचंड आघात करणारे असू शकतील आणि त्यामुळे कुटुंबाला फारच नुकसान सहन करावे लागत असेल. अशावेळी एन्जॉय फॅमिली लाईफ या पत्रिकेच्या पान २ वरच्या प्रश्नांचा उपयोग करा: “अशा गंभीर समस्यांचा बडीमार आज कुटुंबावर का होत आहे? आम्ही कौटुंबिक जीवनाचा आनंद कसा घेऊ शकतो?” कदाचित त्या व्यक्तीच्या मनात प्रामुख्याने हेच प्रश्न असतील. जरी लागलीच आस्था स्पष्टपणे दिसून आली नाही तरी, ती व्यक्ती नंतर पत्रिका वाचण्याची शक्यता आहे.—उप. ११:६.
६ काही मंडळ्यांच्या क्षेत्रात पुष्कळ वेळा काम झाले आहे, आणि पुष्कळ लोकांकडे आपले काही साहित्य देखील आहे. तेव्हा पत्रिकांचा वापर केल्याने घरमालकांसोबत काही आवडीच्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी, त्यांना संभाषणामध्ये गोवण्यासाठी आणि त्यांना राज्य आशेबद्दल विचार करण्यास लावण्यासाठी आम्हाला संधी असेल. त्यांच्या मनात असे प्रश्न घाला ज्याची चर्चा नंतर कधी करता येईल. पुनर्भेट घ्या, आणि त्या आस्थेला पुढे वाढवा. कालांतराने, आम्ही त्यांच्याकडे असणाऱ्या माहितीपत्रक किंवा पुस्तकाद्वारे त्यांच्याशी अभ्यास करण्यास सुरवात करू शकतो.
७ अनौपचारिकतेने पत्रिकांचा वापर करा: आम्ही पत्रिकांना आम्हासोबत—शर्टाच्या खिशात, कोटच्या खिशात, पर्समध्ये किंवा साक्षकार्याच्या बॅगेत—ठेवले तर जेथे कोठे लोक भेटतील तेथे वेगवेगळ्या प्रसंगी आम्ही त्यांचा वापर करू शकतो. खरेदी करताना, प्रवास करताना, नातेवाईकांशी किंवा पाहुण्यांशी बोलताना त्यांचा उपयोग करा. पत्रिका आम्हाला संक्षिप्तपणे साक्ष देण्याची संधी देतात. एखादी पत्रिका कोणा व्यक्तीला अस्वस्थ करत नाही परंतु ती स्पष्ट आणि कौशल्यपूर्ण आहे. त्यात वाचायला कमी साहित्य असल्याने, पुस्तक किंवा मासिकांऐवजी, तिला पटकन स्वीकारले जाते.
८ अनौपचारिकतेने शाळेत, कामाच्या ठिकाणी, पेट्रोल पंम्पवर इत्यादी ठिकाणी पत्रिकांना सादर करण्याच्या संधींबद्दल जागरूक असा. एक बहीण तिच्या आजीला डॉक्टरांकडे नेत असताना तिच्यासोबत पत्रिका होत्या याची खात्री करून घेत असे. डॉक्टरांच्या दवाखान्यात तिने एका गरोदर मातेबरोबर संभाषण सुरू केले. शांतिदायक नवीन जगातील जीवन ही पत्रिका त्या महिलेला दाखवल्यानंतर त्या भगिणीने विचारले: “येथे चित्रात दाखवलेल्या जगात तुम्हाला तुमचे मूल वाढवण्यास आवडेल का?” त्या संभाषणामुळे ती बहीण त्या महिलेच्या घरी भेटीसाठी जाऊ शकली. ह्यामुळे पुष्कळ नियमित पुनर्भेटी झाल्या.
९ पत्रिकांचा उपयोग करून पवित्र शास्त्राभ्यास सुरू केले जाऊ शकतात: एका विभागीय पर्यवेक्षकानी असे सांगितले की ते भेट देत असलेल्या मंडळीतल्या लोकांनी घरमालकाला अभिवादन केल्यानंतर पत्रिकांचा उपयोग केल्यामुळे एका आठवड्यात ६४ पवित्र शास्त्र अभ्यास सुरू केले.
१० पहिल्यांदाच घरोघरी भेट देत असताना पवित्र शास्त्राभ्यास सादर करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? पत्रिकेचा उपयोग करून अभ्यास कसा चालतो हे तुम्ही संक्षिप्तपणे दाखवू शकता. एका भगिणीने शांतिदायक नवीन जगातील जीवन या पत्रिकेचा उपयोग करून तसे केले. चित्राकडे दर्शवून आपली पृथ्वी अशी कधी होईल का याबद्दल त्यांना काय वाटते असे तिने घरमालकास विचारले. घरमालकाने प्रत्युत्तर दिल्यानंतर, त्या भगिणीने २ पेत्र ३:१३ आणि यशया ६५:१७ ही पत्रिकेत दाखवलेली वचने वाचण्यास आमंत्रण दिले. आपली बहीण नंतर म्हणाली: “ही अभिवचने स्वप्न किंवा कल्पना नाहीत परंतु पवित्र शास्त्र या देवाच्या वचनात ती लिहिली आहेत.” मग तिने संभाषण पुढच्या आठवडी चालू ठेवण्याची व्यवस्था केली. पुढच्या भेटीत त्या स्त्रीच्या पुष्कळ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आणि नंतर तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाला तेथे दिले गेले. त्याचा परिणाम एका पवित्र शास्त्र अभ्यासात झाला.
११ तुम्ही नवीन बाप्तिस्मा प्राप्त किंवा सेवेत अनुभव मिळवणारे बाप्तिस्मा न पावलेले प्रचारक आहात का? असे असेल तर, तुम्हाला अधिक अनुभव असलेल्या लोकांना शोधण्यास आणि तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात पत्रिकांचा उपयोग कसा करावा याबद्दल त्यांच्या सल्ल्यासाठी विचारण्यास आवडेल. विश्वासातल्या प्रौढ जणांकडून उत्तेजन आणि मार्गदर्शन मिळालेल्यांची पुष्कळ उदाहरणे आमच्यासाठी पवित्र शास्त्रात आहेत.—प्रे. कृत्ये १८:२४-२७; १ करिंथ. ४:१७.
१२ पत्रिका प्रभावकारीपणे वापरण्यात मदत करण्यास मंडळीचे पुस्तक अभ्यास चालक तुमच्यासाठी इतरांची व्यवस्था करण्यात विशेषकरून मदतदायी असतील. मुलांना प्रचार कार्यात प्रगती करण्यास मदत करण्यासाठी पालकांची जबाबदारी आहे. एका तरुण साक्षीदाराला शांतिदायक नवीन जगातील जीवन ही पत्रिका सादर करण्यासाठी तिच्या पालकांकडून प्रशिक्षण मिळाले. तिच्या आईबरोबर पवित्र शास्त्र अभ्यासाला गेली असता, तिने आस्थेवाईकेच्या पतीला ही पत्रिका सादर केली. एका तरुण व्यक्तीला देखील इतका दृढ धार्मिक विश्वास असू शकतो या गोष्टीने आस्थेवाईकेचा पती प्रभावीत झाला. ती पत्रिका वाचून काढण्यात त्याला पूर्णपणे आनंद वाटला. ती मुलगी जेव्हा तिच्या आईबरोबर तेथे जायची तेव्हा त्याच्यासाठी खासपणे तयार केलेले वचन किंवा पवित्र शास्त्र गोष्ट त्याला ऐकवत असे. तो माणूस आता नियमितपणे मासिक वाचतो, रेवेलेशन क्लायमॅक्स् या पुस्तकात त्याने आस्था दाखवली आणि काही सभांना उपस्थित राहिला. पालकांनी त्यांच्या मुलीला पत्रिकांचा चांगला उपयोग कसा करावा हे शिकवण्यात जबाबदाऱ्यांना पार पाडण्यासाठी वेळ काढल्यामुळे हे सर्व घडले.
१३ आमच्या नवीन पत्रिकांचा प्रभावीपणाने उपयोग करा: वील धीस वर्ल्ड सरव्हाईव्ह? या पत्रिकेचा उपयोग करताना तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि संभाषणाची सुरवात असे म्हणून करा: “नमस्ते. आजच्या जीवनाच्या दर्जाबद्दल आम्ही लोकांशी बोलत आहोत. जीवनाचा दर्जा सुधारेल की खालावत जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटते? [प्रत्युत्तरासाठी वाव द्या.] काही विचार करतात की आज जगात घडणाऱ्या गोष्टी पवित्र शास्त्राच्या पूर्ततेत घडत आहेत आणि जगाचा अंत फार जवळ आला आहे. तुम्हाला काय वाटते?” घरमालकाने प्रत्युत्तर दिल्यानंतर, पत्रिका सादर करा आणि दुसऱ्या परिच्छेदातल्या तीन प्रश्नांकडे लक्ष आकर्षित करा. मग पत्रिकेमध्ये मुद्देसूद सांगितल्याप्रमाणे आधी जगाचा अंत कसा झाला आणि आता याचा देखील अंत होईल ते सांगा. भेटीच्या समाप्तीच्या वेळी, जगाचा अंत जवळ आहे याबद्दल पवित्र शास्त्रीय पुराव्याला विचारात घेण्यासाठी दुसऱ्या भेटीची व्यवस्था करा.
१४ पुष्कळ वेळा कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत राज्य संदेश इतरांना सांगण्यासाठी आम्हाला फारच कमी वेळ मिळतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी, सरकाराबद्दल अलिकडच्या बातमीवर विषय निघेल. तुम्ही असे सहमत दाखवू शकता की चांगला हेतू असणाऱ्या पुढाऱ्यांनी सर्व प्रयत्न करूनसुद्धा पूर्ण इतिहासात जगाने अतिशय त्रास सहन केला आहे. मग हू रियली रूल्स द वर्ल्ड? या पत्रिकेच्या पान २ वरील शेवटच्या परिच्छेदाचा संदर्भ घ्या. विचाराला प्रवृत्त करणाऱ्या तीन प्रश्नांना वाचा. संक्षिप्त संभाषणासाठी वेळ नसल्यास, त्या व्यक्तीला पत्रिका द्या आणि या प्रश्नांची इतर वेळी किंवा ठिकाणी चर्चा करण्यासाठी व्यवस्था करा.
१५ व्यक्तिगतपणे आणि कुटुंब या नात्याने, वेगवेगळ्या पत्रिकांना कसे सादर करावे हे विचारात घेण्यासाठी वेळ काढा. सरावाचे वर्ग घ्या. ह्या महिन्यात क्षेत्र सेवेत सादर केल्या जाणाऱ्या इतर साहित्याबरोबर तुम्ही पत्रिकांचा वापर कसा करू शकता? तुम्हाला कोणाला भेटायला जायचे आहे का जेथे तुम्ही सोबत काही पत्रिका घेऊन जाऊ शकता? या आठवडी, तुम्ही कोणाशी संपर्क साधणार आहात का की जेणेकरून या पत्रिका सादर करीत असलेल्या संदेशाचा त्यांना लाभ होईल?
१६ यहोवासाठी सखोल प्रेम आणि लोकांसाठी असलेली चिंता या गोष्टी सुवार्ता माहीत करून देण्यासाठी आम्हाकडून होईल तितके करण्यास प्रवृत्त करील. पत्रिकांचा नियमितपणे उपयोग, आम्हाला तसे करण्यास मदत करील. एका सात वर्षीय तरुण मुलाला त्याच्या शेजारणीला नवीन व्यवस्थिकरणात प्रवेश करण्यासाठी मदत करायची होती, म्हणून त्याने तिला एक पत्रिका दिली, आणि तेथे पवित्र शास्त्राभ्यास सुरू झाला. हे ऐकण्यास किती सोपे वाटते! परंतु आपल्या क्षेत्रात अशा सोप्या प्रस्तावाला आपण महत्त्व देतो का? पुढील वेळेस आपण कोणाकडे तरी पत्रिका सोडून आल्यास पुढे ते पवित्र शास्त्र अभ्यास सुरू करण्याकडे निरवू शकते. राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात आपण पत्रिकांचा सूज्ञपणाने उपयोग केला तर, आम्हाला नक्कीच लाभदायक परिणाम अनुभवण्यास मिळतील.