वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९१ पृ. १
  • सभा वेळेवर सुरु करा व वेळेवर संपवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सभा वेळेवर सुरु करा व वेळेवर संपवा
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा पूर्ण फायदा घ्या
    आमची राज्य सेवा—२००६
  • उद्देश साध्य करणाऱ्‍या क्षेत्र सेवेच्या सभा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन देण्यासाठी सभा
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ५/९१ पृ. १

सभा वेळेवर सुरु करा व वेळेवर संपवा

१ मंडळीच्या सर्व सभा, तसेच क्षेत्राकार्याची सभा देखील वेळेवर सुरु होऊन वेळेवर संपवली पाहिजे. ते का? कारण वेळेवर येणे हे सुव्यवस्थेला प्रदर्शित करते आणि सभेला उपस्थित राहणाऱ्‍या व त्यात सहभाग घेणाऱ्‍यांविषयी योग्य समज असल्याचे दाखवते. (उप. ३:१७ब; १ करिंथ १४:३३) सभा वेळेवर सुरु करण्यासाठी व वेळेवर संपविण्यासाठी पुढे दिलेल्या मार्गदर्शिका पाळून चालण्याची आपण काळजी घेऊ.

२ आपण सभेला नेहमी आधी येऊन इतरांबरोबर बोलणी करण्याचा, जरुरीच्या गोष्टीची काळजी करण्याचा आणि आरंभाचे गीत व प्रार्थना यात सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. गीत व प्रार्थनेसाठी पाच मिनिटे दिलेली असतात. ज्यांना मंडळीत प्रार्थना मिळते अशांनी सभेचा उद्देश आपल्या मनी राखावा व तोच आपल्या आरंभाच्या व शेवटल्या प्रार्थनेत परावर्तित करावा. अशा प्रार्थना लांब असण्याची गरज नाही.

३ जाहीर भाषण: जाहीर भाषणे ४५ मिनिटांची असतात. ते लांबले तर याचा यानंतर होणाऱ्‍या टेहळणी बुरुज अभ्यासावर परिणाम होतो. या दोन सभा, गीत व प्रार्थनांसहित दोन तासांत उरकण्यास हव्या. जाहीर भाषण देणाऱ्‍या वक्त्याने संस्थेने भाषणासंबंधी पुरविलेल्या रुपरेषेत जी वेळ सुचविलेली आहे तिला जडून राहिले पाहिजे व त्यांनी आपल्या भाषणात शुभेच्छांसारख्या इतर गोष्टी आणू नयेत. कोणा भेट देणाऱ्‍या वक्त्याला राज्य सभागृह कोठे आहे याची निश्‍चिती नसल्यास त्याने याविषयी त्या मंडळीकडून मार्गदर्शन तसेच प्रवासाला किती वेळ लागणार ते जाणून घेतले पाहिजे.

४ “टेहळणी बुरुज” अभ्यास: या अभ्यासासाठी एक तास देण्यात आला आहे. या अवधीत सर्व परिच्छेद वाचण्यास हवेत व उजळणी प्रश्‍न देखील विचारात घेतले पाहिजे. अभ्यासचालकांच्या त्रोटक व सूक्ष्म प्रास्ताविकेने धड्यापर्यंत निरविले पाहिजे. अभ्यासादरम्यान त्यांचे विवेचन तसेच परिक्षण मर्यादित असले पाहिजेत. साहित्याला योग्य वेळ ठरवून दिल्यास आधीच्या अर्ध्या भागाला अधिक वेळ व नंतर बाकीच्या परिच्छेदांचा घाईने उरक अशी वेळ येणार नाही.

५ईश्‍वरशासित सेवा शाळा: ही ४५ मिनिटांची सभा आहे. वस्तुतः बोधप्रद भाषण तसेच पवित्र शास्त्र वाचनाची ठळक वैशिष्ट्ये यांना वेळ झाली म्हणजे थांबण्याचा संकेत केला जात नसला तरी जे बांधव या भागाची हाताळणी करीत आहेत त्यांनी आपल्या वेळेतच ते उरकले पाहिजे. हे न केल्यास त्यांना खाजगी सूचना द्यावी. याचप्रमाणे शाळा देखरेख्यांनी दिलेला शेरा व सूचना वेळेतच द्यावी. भाषण देणारे विद्यार्थी पुढे बसले आणि त्यांनी आपले भाषण वेळेतच संपवले तर वेळ वाचवला जाऊ शकतो.—पहा १९९१चा ईश्‍वरशासित उपाध्यपण शाळेचा आराखडा.

६ सेवा सभा: ही देखील ४५ मिनिटांचीच सभा आहे. ही सभा, ईश्‍वरशासित सेवा शाळा तसेच गीत व प्रार्थना हा एकंदर कार्यक्रम एक तास व पंचेचाळीस मिनिटांच्या पुढे जाता कामा नये. सेवा सभेच्या कार्यक्रमात भाग असणाऱ्‍या बांधवांनी आपली वेळ संभाळली पाहिजे. जेथे प्रश्‍नोत्तराची चर्चा आहे अशा भागात केवळ त्रोटक प्रस्तावना पुरेशी आहे. यात आणखी प्रास्ताविक भर घालण्याची जरुरी नाही. प्रात्यक्षिकांची चांगली तयारी करण्यास हवी, शिवाय यात भाग घेणाऱ्‍यांनी तयार असले पाहिजे व त्यांच्यासाठी जो वेळ दिलेला आहे त्यामध्येच आपला भाग संपविला पाहिजे.

७ मंडळीचा पुस्तक अभ्यास: ही आरंभीची व समाप्तीची प्रार्थना धरून एक तासाची सभा आहे. सर्व परिच्छेद वाचले पाहिजेत. सभा वेळेवर संपवता यावी म्हणून चालक प्रत्येक भागाला वेळ योजून ठेवील; म्हणजे शेवटला भाग घाईने संपवला जाणार नाही किंवा उलटपक्षी, सभा खूप वेळेआधी संपविली जाणार नाही. प्रत्येक परिच्छेदावर केवढा वेळ जात आहे याकडे चालकांचे लक्ष असण्यास हवे. प्रमुख मुद्दे स्पष्टपणे समजले गेले पाहिजे. या बाबतीत जे आव्हान येते त्याला चालकाची शैक्षणिक कलाच सामना करू शकेल.—तीत १:९.

८ क्षेत्रकार्याची सभा: ही सभा क्षेत्राच्या नेमणूका तसेच शेवटली प्रार्थना यासह १५ मिनिटांच्या पुढे जाऊ नये. जे कार्यासाठी बाहेर पडत आहेत अशांनी लवकरात लवकर काम सुरु केले पाहिजे. चालक ही सभा वेळेवर सुरु करील; त्याने गटात बरेच लोक येईपर्यंत थांबू नये. क्षेत्राच्या नेमणूका दिल्या व शेवटली प्रार्थना झाली म्हणजे गटाने लगेच क्षेत्रावरील कार्याला निघावे. हे उपस्थित असणाऱ्‍या पायनियरांसाठी खासपणे महत्त्वाचे आहे.

९ वेळेवर सुरु होणाऱ्‍या व वेळेवर संपणाऱ्‍या सभेकडून आम्हा सर्वांनाचा फायदा मिळतो. हे, विश्‍वासात नसलेला वैवाहिक सोबती विशिष्ट वेळी आपल्या सोबत्याला घरी असण्याची अपेक्षा करीत असल्यामुळे अशांना खूपच उपयुक्‍त ठरते. यासाठीच, विभाजित घरात राहणाऱ्‍या सदस्यांनी सभेला निघण्याची व परत येण्याची वेळ ठरविताना प्रवासात लागणारा वेळ तसेच सभेआधी व नंतरचा बांधवांचा सहवास, प्रकाशने घेणे इत्यादि गोष्टींकरता लागत असलेला वेळही विचारात घेतला पाहिजे. यास्तव, वेळेवर सभा सुरु करणे व त्या वेळेवर संपवणे हे निःसंशये सर्व गोष्टी “शिस्तवार व व्यवस्थितपणे” करण्यास हातभार देते.—१ करिंथ १४:४०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा