तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याची इच्छा का धरली पाहिजे
१ ख्रिस्ताचा शिष्य होण्यासाठी कोणाला तरी मदत देता यावी यासाठी यहोवाने आमचा वापर करून घ्यावा हा आम्हा ख्रिश्चनांसाठी फार मोठा प्रतिफळदायक असा अनुभव आहे. (मत्तय २८:१९, २०; १ करिंथ ३:६, ९) ज्यांची आम्ही अशा पद्धतीने मदत करतो त्यांना याचा अर्थ सार्वकालिक जीवन असा होऊ शकतो.
२ शिक्षक व विद्यार्थी यात अगदी जवळचे नाते विकसित होते. विद्यार्थी आध्यात्मिक प्रगति करीत आहे हे पाहणे मोठे आनंदाचे वाटते. (१ थेस्सलनी. २:११, १९, २०) यासाठीच, प्रत्येक ख्रिश्चनाने आपल्या घराबाहेर असा निदान एक तरी पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याचे ध्येय ठेवावे. अर्थातच, प्रत्येक कुटुंब चालकाने आपल्या कुटुंबासमवेत अर्थभरीत असा नियमित रुपाचा पवित्र शास्त्र अभ्यास चालवावा ही त्याची जबाबदारी आहे. ज्या घरात बाप हा विश्वासात नसतो तेथे ख्रिस्ती मातेने आपल्या मुलांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची योग्य ती व्यवस्था केली पाहिजे.
अभ्यासासाठी प्रार्थना करा
३ आम्ही आता शेवटल्या काळामध्ये बरेच पुढे आलेलो असल्या कारणामुळे आम्ही सर्वांनीच प्रभावी पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करावयास हवेत. आम्ही यासाठी नियमित प्रार्थना केली तर एखादा पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याची आमची केवढी प्रांजळ इच्छा आहे हे त्याद्वारे प्रकट होईल. याद्वारे आम्हाला जीवन-मरणाचा विषय स्पष्ट दिसत असल्याचे कळते. (यहेज्केल ३३:७-९, १४-१६) आमच्या सतत प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद मिळू शकेल अशी खात्री आपण बाळगू शकतो.—१ योहान ५:१४, १५.
४ शिष्य बनण्यात कुशल होण्यासाठी आम्ही उत्तम तयारी केली पाहिजे. याचप्रमाणे जे पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यात वाकबगार आहेत त्यांची तो चालविण्याची पद्धत न्याहाळणे ही गोष्ट देखील आम्हाला लाभ मिळवून देईल. येणाऱ्या काही महिन्यात आम्ही शिष्य बनविण्याच्या कामी प्रभावी ठरलेल्या विभागीय देखरेख्यांच्या तसेच इतर बांधवांच्या सूचना प्रस्तुत करणार आहोत. पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु करावा व तो फलदायी पद्धतीने कसा चालवावा याविषयी काही ठळक मुद्दे एका लेखमालिकेत प्रस्तुत केले जातील.
भावी लेख
५ आमची राज्य सेवा यातील भावी अंकात कोणत्या कल्पनांचा विचार करण्यात येईल? विविध प्रचारकांनी व पायनियरांनी पवित्र शास्त्राभ्यास कसे सुरु केले आणि विद्यार्थ्यांच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्यासाठी त्यांनी कोणती शिक्षणपद्धत वापरली याविषयीची चर्चा आम्ही करू. यहोवाच्या संस्थेविषयी रसिकता उभारण्याविषयीचे प्रस्ताव तसेच क्षेत्रकार्यात सहभागी होण्याची इच्छा कशी वाढवावी याविषयी देखील आम्ही माहिती देऊ. याचप्रमाणे तुमचा कौटुंबिक अभ्यास आणखी अर्थभरीत कसा बनवावा की ज्यामुळे तुमच्या मुलांना यहोवाबरोबर व्यक्तीगत नाते अधिक जवळून राखता येईल, त्याचेही प्रस्ताव त्यात असतील.
६ गेल्या चार कार्यवर्षात जगभरात ९,५९,८३४ लोकांचा बाप्तिस्मा झाला व यापैकी ८३६ जण भारतातील मंडळ्यातून होते. अशा या मोठ्या संख्येच्या लोकांना बाप्तिस्म्यापर्यंत प्रगति साध्य करता आली ती यामुळेच की कोणीतरी त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राभ्यास केला होता. स्मारकदिन तसेच आमच्या प्रांतिय अधिवेशनाची उपस्थिती दाखविते की, आणखी पुष्कळ जणांना बाप्तिस्म्याप्रत जाण्यास मदत देता येऊ शकेल. अशा लोकांसोबत पवित्र शास्त्राभ्यास सुरु करून ते चालविण्यात घेतलेले परिश्रम अधिक लोकांना शिष्य बनविण्यात व त्यांना ओघाओघाने सार्वकालिक जीवन देण्यामध्ये सफळ होऊ शकतील.—१ तीमथ्य ६:१२, १९.